मुंबई - नवी मुंबई मधील विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे नेते दि. बा. पाटील यांचे नाव दिले जावे म्हणून मोर्चा काढण्यात आला आहे. आज (गुरुवार) निघालेल्या मोर्चामध्ये मनसे नेते आणि पक्षाचे एकमेव आमदार राजू पाटील सहभागी झाले आहेत. तर या अगोदर मनसे नेते राज ठाकरे यांनी नवी मुंबई विमानतळाला छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव दिले जावे असे म्हटले होते. याबद्दल आमदार पाटील यांना विचारले असता, मोर्चाची ताकद वाढवण्यासाठी आपण या मोर्चात सहभागी झाल्याचे आमदार पाटील यांनी म्हटले आहे. सविस्तर वाचा..
ठाणे - मुंबई-नाशिक महामार्गावरील वाशिंद-खातीवली गावानजीक ट्रॅक्टर व दुचाकीमध्ये जोरदार धडक होऊन भीषण आपघात झाला. या अपघातात दुचाकीवरील ३ जण जागीच ठार झाले तर एक 9 वर्षीय मुलगी गंभीर जखमी झाली आहे. या मुलीला पुढील उपचारासाठी मुंबईतील सायन रुग्णायात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी वाशिंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून चालकाला ताब्यात घेतले आहे. लल्लन राय असे ट्रॅक्टर चालकाचे नाव आहे. तर मंजुळा सखाराम मुकणे, अजनूप शिरोळ, गणपत दगडू वाघे आणि बाबू मधू फसाळे असे अपघातातील मृतांची आणि जखमींची नावे आहेत. सविस्तर वाचा..
सिंधुदुर्ग - कोरोनाच्या महामारीमध्ये राज्यसरकार, जिल्हाप्रशासन तसेच सत्ताधारी पक्षाचे पालकमंत्री आणि आमदार यांच्याकडून सातत्याने बेजबाबदार कृत्य होत आहेत. एका बाजूला आरोग्यमंत्री रत्नागिरीत कोरोनाचा डेल्टा प्लस रुग्ण आढळल्याचे सांगत असताना रत्नागिरीचे स्थानिक आमदार आणि सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत हे सांगतात, की रत्नागिरीला पेशंटच नाहीत. परंतु, त्याचवेळी सिंधुदुर्गातही डेल्टा प्लसचा रुग्ण आढळून येतो. मग पालकमंत्री ही बाब लपवून का ठेवत आहेत ? असा सवाल भाजपा आमदार नितेश राणे यांनी केला आहे. सविस्तर वाचा..
बीड - सोने विक्री करताना सोनारांना आता हॉलमार्क असलेलेच सोने विक्री करता येणार आहे. विशेष म्हणजे सोन्याच्या शुद्धतेचे प्रमाणपत्र देणाऱ्या संस्थेचा देखील लोगो सोने खरेदी केलेल्या वस्तूवर राहणार आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे ग्राहकांना उत्तम दर्जाचे सोने मिळेल व ज्या ठिकाणाहून सोने घेतले त्या दुकानदाराच्या व्यतिरिक्त इतर ठिकाणी जरी ते सोने मोडले तरी हॉलमार्क असल्यामुळे सोन्याच्या वस्तु चे चांगले पैसे ग्राहकांना मिळू शकतील, अशी माहिती बीड येथील सचिन ज्वेलर्सच्या प्रमुख कल्पना डहाळे यांनी दिली. सविस्तर वाचा..
गोंदिया :- राज्य परिचारिका संघटनेने बुधवारपासून बेमुदत कामबंद आंदोलन पुकारले आहे. जुनी पेन्शन योजना लागू करावी, कोविड प्रार्दुभावात काम केल्याचा जोखीम भत्ता मिळावा, केंद्राप्रमाणे वेतन द्यावे, नवी पदभरती करावी, तसेच कोविड प्रार्दुभावात काम करतांना दगावलेल्या परिचारिकांना शासनाकडून ५० लाखांची मदत मिळावी, या मागण्यांसाठी गोंदियाच्या शासकिय वैद्यकीय महाविद्यालयात कामबंद आंदोलन पुकारण्यात आले आहे. १०० पेक्षा जास्त परिचारिका या आंदोलनात सहभागी झाल्या आहेत. महाराष्ट्र राज्य अधिपरिचारिका संघटनेकडून २१ व २२ जून रोजी २-२ तासांचे सांकेतिक आंदोलन करण्यात आले. तसेच बुधवारपासून संपूर्ण वेळ बेमुदत आंदोलन करण्यात येत आहे. सविस्तर वाचा..
गाझियाबाद - उत्तर प्रदेशच्या गाझियाबाद येथील लोणीतील वयोवृद्धाला मारहाण झालेल्या व्हायरल व्हिडिओ प्रकरणात ट्विटर इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक मनीष माहेश्वरी अडचणीत आले आहेत. आज मनीष माहेश्वरी लोणी पोलीस ठाण्यात हजेरी लावणार असून त्यांना पोलिसांच्या प्रश्नांना उत्तर द्यावी लागणार आहेत. मनीष माहेश्वरी चौकशीसाठी उपस्थित राहतील, अशी ट्विटरच्या वकिलांनी माहिती दिली. सविस्तर वाचा..
नवी दिल्ली - देशातील नव्या कोरोना रुग्णांचे दैनंदिन प्रमाण आता एक लाखाच्या खाली आले आहे. त्यामुळे देशातील कोरोनाची दुसरी लाट नियंत्रणात आल्याचे सांगितले जात आहे. मात्र, कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचा आकडा ही अद्यापही वाढत असल्याचे दिसत असल्याने चिंतेचे वातावरण आहे. यातच भारतात गेल्या 24 तासांत 54,069 जणांना कोरोना व्हायरसची लागण झालेली आहे. तर 1,321 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर दिलासादायक बाब म्हणजे, गेल्या 24 तासांत 68,885 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सविस्तर वाचा..
बार्सिलोना - अँटीव्हायरस सॉफ्टवेअरचे निर्माते जॉन मॅकफी स्पेनमधील तुरुंगात मृतावस्थेत आढळले आहेत. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. नुकतेच स्पेनच्या न्यायालयाने त्यांना कर चोरी प्रकरणात अमेरिकेकडे प्रत्यार्पण करण्यास मंजुरी दिली होती. स्पेनच्या बार्सिलोनातील ब्रायन्स तुरुंगात ते मृतावस्थेत आढळले. प्रत्यार्पणाच्या निराशेतून टोकाचे पाऊल उचलत मॅकफी यांनी आत्महत्या केली असल्याचे बोलले जात आहे. सविस्तर वाचा..
कोलकाता - बंगाल विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक चर्चित असलेला मतदारसंघ नंदीग्रामच्या निकालाला आव्हान देणाऱ्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या याचिकेवर आज उच्च न्यायालयात सुनावणी होईल. न्यायमूर्ती कौशिक चंदा यांचे एकल खंडपीठ सकाळी याचिकेवर सुनावणी घेईल. पश्चिम बंगालच्या मुख्यंत्री ममता बॅनर्जी यांनी सुवेंदू अधिकारी यांच्या विजयाला उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. ईव्हीएम मशीनसोबत छेडछाड आणि निकाल जाहीर झाल्यानंतर निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी फेरमोजणीची मागणी फेटाळून लावल्याचा आरोप मुख्यमंत्र्यांनी केला आहे. निकालानंतर नंदीग्राममधील मतदान आणि निवडणूक प्रक्रियेवर अनेक प्रश्न उपस्थित झाले होते. सविस्तर वाचा..
पुणे - आंबील ओढा परिसरातील अतिक्रमण हटवण्यासाठी आज सकाळी पोलीस बंदोबस्तात महापालिकेचे कर्मचारी हजर झाले. परंतु स्थानिक नागरिकांनी अतिक्रमण हटवण्यास विरोध केला. त्यामुळे नागरिक आणि पोलिसांमध्ये जोरदार झटापट झाली. काही नागरिकांनी महापालिकेच्या कारवाईला विरोध करत अंगावर रॉकेल ओतून जाळून घेण्याचाही प्रयत्न केला. सविस्तर वाचा..