- आज दिवसभरात -
- संतोष परब हल्ल्यातील आरोपी आमदार नितेश राणे व गोट्या सावंत यांच्या अटकपूर्व जामिनावर आज 30 डिसेंबरला निर्णय होणार असल्याचे जिल्हा प्रधान सत्र न्यायाधीश हांडे यांनी सांगितले. त्यामुळे नितेश राणे यांना जामीन मिळतो की नाही हे आज ठरणार आहे.
- सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या 19 जागांसाठी 39 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. आज 30 डिसेंबरला या जिल्हा बँकेची निवडणूक होत आहे. या निवडणुकीत 19 पैकी 18 प्रभागात एकास एक लढत तर कुडाळ तालुका शेती संस्थांमधून भाजपचे उमेदवार सुभाष मडव यानी बंडखोरीचे रणशिंग फुंकल्याने तिरंगी लढत आहे. 31 डिसेंबरला या जिल्हा बँकेच्या निवडणुकीची मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीत केंद्रीय मंत्री नारायण राणे स्वतः लक्ष घालून आहेत.
- केंद्रीय अर्थसंकल्प 2022-23 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण आज 30 डिसेंबरला आगामी अर्थसंकल्पाच्या आधी राज्यांच्या अर्थमंत्र्यांसोबत बैठक करणार आहे.
- भारत वि. दक्षिण आफ्रिका कसोटी सामन्याचा आज पाचवा दिवस. भारताला विजयाची संधी, दुसऱ्या डावात दक्षिण आफ्रिकेच्या 4 बाद 94 धावा.
- भारतीय क्रिकेटर सौरभ तिवारी याचा आज वाढदिवस आहे. त्याचा जन्म 30 डिसेंबर 1989मध्ये झाला आहे. आयपीएलमध्ये तो मुबई इंडियन्स या संघाकडून खेळतो.
काल दिवसभरात -
- मुंबई - कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर येत्या थर्टी फर्स्ट आणि नववर्षाच्या स्वागत सोहळ्यांसाठी राज्य शासनानं नवी नियमावली जाहीर केली आहे. यामध्ये खबरदारी म्हणून लोकांनी मोठ्या प्रमाणावर एकत्र न येता यंदा हे सोहळे अत्यंत साधेपणाने करणे अपेक्षित आहे, असं या नियमावलीत म्हटलं आहे. राज्य सरकारने खबरदारी म्हणून नववर्षाच्या पूर्वसंध्येला राज्य सरकारकडून नवीन नियमावली जाहीर करण्यात आली आहे. सविस्तर वाचा -
- मुंबई - राज्यात आज 3 हजार 900 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली असून 20 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 1 हजार 306 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्याचा रिकवरी रेट हा 97.61 टक्के इतका आहे. त्याचबरोबर, राज्यात आज 85 नव्या ऑमायक्रॉन रग्णांची नोंद झाली आहे. तसेच, आज मुंबईत (29 डिसेंबरला) 2 हजार 510 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. सविस्तर वाचा -
- मुंबई - मुंबईत एकीकडे कोरोना विषाणूचा प्रसार वाढत ( Covid Spread In Mumbai ) असताना नवीन व्हेरियंट असलेल्या ओमायक्रॉनचे रुग्ण आढळून येत ( Omicron In Mumbai ) आहेत. मुंबईत परदेश प्रवास केलेले ३३ प्रवासी विमानतळावरील चाचण्यांमध्ये ओमायक्रॉन पॉजिटिव्ह आढळून आले ( 33 Traveler Found Omicron Positive Mumbai ) आहेत. यामुळे मुंबईमधील ओमायक्रॉन रुग्णांची संख्या ११८ झाली आहे. सविस्तर वाचा -
- सिंधुदुर्ग - संतोष परब हल्ल्यातील (Santosh Parab Attack Case) आरोपी आमदार नितेश राणे (MLA Nitesh Rane) व गोट्या सावंत (Gotya Sawant) यांच्या अटकपूर्व जामिनावर 30 डिसेंबर रोजी निर्णय होणार असल्याचे जिल्हा प्रधान सत्र न्यायाधीश हांडे यांनी सांगितले. त्यामुळे नितेश राणे यांना जामीन मिळतो की नाही हे गुरुवारी ठरणार आहे. सविस्तर वाचा -
- मुंबई - कालच सूप वाजलेल्या हिवाळी अधिवेशनामध्ये ( Maharashtra Assembly Winter Session 2021 ) विधानसभा अध्यक्षपदावरून ( Assembly Speaker Election Maharashtra ) महाविकास आघाडी सरकार व राज्यपाल ( MVA Government Vs Governor ) यांच्यामध्ये कलगीतुरा रंगलेला पाहायला भेटला. परंतु अधिवेशन संपले असले तरी आता हा संघर्ष शिगेला पोहचला आहे. विधानसभा अध्यक्षपद निवडणूक घेण्यास मंजुरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांकडून जे पत्र राज्यपालांना पाठवण्यात आलं होतं ( CM Thackeray Reply To Governor Letter ) त्याची भाषा ही धमकीवजा असल्याच सांगत राज्यपालांनी या पत्रावर तीव्र दुःख व नाराजी व्यक्त केली आहे. अशा आशयाचे पत्र त्यांनी सरकारला पाठवले ( Governor Koshyari Letter To CM )आहे. सविस्तर वाचा -
- वाचा आजचे राशीभविष्य -