ETV Bharat / bharat

महाविकास आघाडीने पुकारलेला बंद, 'बिग बी'च्या वाढदिवसासह विविध टॉप न्यूज, वाचा एका क्लिकवर - महाराष्ट्र बंद

आज आणि कालच्या महत्त्वाच्या बातम्यांसाठी येथे जाणून घ्या. आजच्या बातम्या, ज्यांच्यावर आपली नजर असेल आणि कालच्या महत्त्वाच्या बातम्या, ज्यांच्याबाबत तुम्हाला माहिती घ्यायला नक्की आवडेल.

Top news on 11th October
Top news on 11th October
author img

By

Published : Oct 11, 2021, 4:58 AM IST

आज या घडामोडींवर असणार नजर

  • केंद्रीय गृहराज्य मंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्राने लखीमपूर खिरी येथे शेतकऱ्यांना गाडीने चिरडल्याचा आरोप आहे. या घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडी सरकारने 11 ऑक्टोबरला महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. या बंदमध्ये अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहेत. या सेवेमध्ये कुठलीही बाधा होणार नाही. यासंबंधी तिन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी दक्षता घ्यावी अशा सूचनाही तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी केल्या आहेत.
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी 11 ऑक्टोबर 2021 रोजी ‘इंडियन स्पेस असोसिएशन’ (ISpA) या भारतीय अंतराळ संघटनेचे उदघाटन करणार आहेत. सकाळी 11 वाजता पंतप्रधान मोदी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे याचे उदघाटन करणार आहेत. या महत्त्वाच्या प्रसंगी ते अंतराळ उद्योगाच्या प्रतिनिधींशीही संवाद साधणार आहेत.
  • बॉलीवुडचे महानायक, बादशाह, अँग्री यंग मॅन अमिताभ बच्चन आज ७८ वर्षांचे झाले आहेत. महानायक म्हणून ओळखले जाणाऱ्या अमिताभ बच्न यांना पद्मश्री, पद्मभूषण व पद्मविभूषणसहित अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. भारतीय सिनेमाध्ये सर्वोच्च पुरस्कार असलेला दादासाहेब फाळके अॅवार्डही अमिताभ बच्चन यांना देण्यात आला आहे.
  • महाराष्ट्र बंद दरम्यान कोणत्याही प्रकारची हिंसक घटना होऊ नये यासाठी मुंबई पोलिसांकडून शहरात जागो जागी बंदोबस्त लावण्यात आला आहे. मुंबई शहरात पोलिसांकडून गस्त घातली जाणार आहे. एसआरपीएफच्या 3 कंपन्या, 500 होमगार्ड, स्थानिक शास्त्रात्र युनिट मधील 700 जवान मोक्याच्या ठिकाणी तैनात करण्यात येणार आहेत. मुंबईमध्ये पोलिसांचा तगडा बंदोबस्त असणार आहे.
  • मराठवाड्यात शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याची मागणी करण्यात येत आहे. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी या मागणीसाठी आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी ‘७२ तास अन्नत्याग आंदोलन’ करण्याची घोषणा केली आहे. ११ ऑक्टोंब पासून या आंदोलनाला सुरूवात होणार आहे.
  • लखीमपूर खिरी हिंसाचार प्रकरणी महाविकास आघाडीमधील नेत्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. लखीमपूरमधील शेतकरी हत्याकांडाच्या निर्षेधार्थ महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. काँग्रेस नेते राजभवानासमोर मौनव्रत आंदोलनही करणार आहेत. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी या बंदमध्ये सहभागी होऊन बंद पूर्णपणे यशस्वी करावा, असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केले आहे
  • लखीमपूर खिरी हिंसाचार प्रकरणात मंत्रीपुत्र आशिष मिश्राला स्थानिक न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. चौकशीसाठी मिश्राला पोलीस कोठडी द्यावी, अशी पोलिसांनी मागणी केली आहे. या अर्जावर सोमवारी सुनावणी होणार आहे.

कालच्या महत्त्वाच्या बातम्या-

  • गलवान खोऱ्यात झालेल्या चकमकीनंतर भारत आणि चीनमध्ये तणावाचे वातावरण आहे. चर्चेच्या माध्यमातून दोन्ही देश समस्येवर तोडगा काढण्याचा प्रयत्न करत आहेत. आतापर्यंत भारत आणि चीनदरम्यान तब्बल चर्चेच्या 12 फेऱ्या पार पडल्या आहेत. पुन्हा कमांडर पातळीवर चर्चेची तेरावी फेरी सकाळी साडेदहा वाजता चीनकडील बाजूला प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ असलेल्या मोल्डो या ठिकाणी झाली. हॉट स्प्रिंग, डेमचोक आणि डेपसांग मैदानावर दोन्ही देशांमधील तणावाची स्थिती कायम आहे.

सविस्तर वाचा-सीमा विवाद : भारत-चीन सैन्यात आज चर्चेची तेरावी फेरी

  • वाशिम येथील युवा गिर्यारोहक यश इंगोले याने १५ ऑगस्ट २०२१ रोजी स्वातंत्र्य दिनी आफ्रिका खंडातील सर्वोच्च किलिमांजारो शिखर गाठले. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात तेथे भारतीय तिरंगा फडकविला. त्याने त्या सर्वोच्च ठिकाणी उणे २५ अंश सेल्सिअस तापमानात केशरी या चित्रपटातील देशभक्तीवर आधारित "तेरी मिट्टी मे मिल जावा, गुल बनके खील जावा, इतनी सी है दिल की आरजू" या गाण्यावर १ मिनिट ४५ सेकंद नृत्य केले. त्याच्या या नृत्याची नोंद हाय रेंज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड या संस्थेने घेऊन नव्या विक्रमाबाबतचे प्रमाणपत्र व पदक यशला दिले.

सविस्तर वाचा-किलीमांजारो शिखरावर भारतीय तरुणाचे 'तेरी मिट्टी मे मिल जावा' गाण्यावर नृत्य

  • लखनऊहून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या धावत्या पुष्पक एक्स्प्रेसमध्ये दरोडा पडल्याची घटना घडली होती. ही घटना इगतपुरी ते कसारा रेल्वे स्थानकादरम्यान घडली असून आठ दरोडेखोरांनी एक्स्प्रेसमध्ये अचानक प्रवेश करून 10 ते 20 प्रवाशांना धाक दाखवून रोकड, मोबाईल आणि दागिने लुटल्याचा प्रकार घडला. धक्कादायक बाब म्हणजे या दरोडेखोरांनी 20 वर्षीय विवाहितेवर तिच्या पती समोरच सामूहिक अत्याचार केला. ही घटना शुक्रवारी (8 ऑक्टोबर 2021) घडली होती. या घटनेमुळे पुन्हा एकदा रेल्वे प्रवाशांसह महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत आठ दरोडेखोरांना अटक केली आहे.

सविस्तर वाचा-पुष्पक एक्स्प्रेस घटना : अत्याचार अन् दरोडा प्रकरणी आठ जण अटकेत

  • शिर्डीतील साईबाबा आंतरराष्ट्रीय विमानतळ आजपासून सुरू झाले आहे. आज पहिल्याच दिवशी चेन्नईहून शिर्डी येथे आलेल्या विमानातून 168 प्रवासी आले आहे तर शिर्डीहून चेन्नईसाठी 38 प्रवासी गेले आहेत. साई मंदिर सुरू झाल्यानंतर विमानतळही सुरू झाल्याने साई भक्तांतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

सविस्तर वाचा-साईबाबा आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरू, पहिल्याच दिवशी प्रवाशांचा चांगला प्रतिसाद

  • एका गर्भवती महिलेला तब्बल दहा तास शासकीय रुग्णालयाच्या पायरीवर ताटकळत ठेवल्याचा आरोप करण्यात आला आहे. रोहिणी मारुती मुकणे ( वय २८ वर्षे ) असे गरोदर असलेल्या आदिवासी महिलेचे नाव आहे.

सविस्तर वाचा-धक्कादायक..! गर्भवती महिलेस 10 तास रुग्णालयाच्या पायरीवर ताटकळत ठेवल्याचा आरोप

जाणून घ्या आजचे राशीभविष्य-

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.