मुंबईत शाळा सुरू झाल्या आहेत. त्याबाबतचे नियम महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिले आहेत.
मुंबई - शाळा सुरू झाल्या आहेत. शाळा चालवण्यासाठी जुने नियम लागू आहेत. ज्या मुलांचे पालक परवानगी देतात, ती मुले शाळेत जातील. दोन्ही बेंचमध्ये 2 फूट अंतर असेल. वर्गातील मुलांची संख्या शाळा व्यवस्थापन ठरवेल अशी माहिती मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे.
मुंबईत कोरोना रुग्णांत मोठ्या प्रमाणात घट आढळून आली आहे
मुंबई - सोमवारी मुंबईत कोरोना रुग्णांची मोठ्या प्रमाणात घट आढळून आली आहे. यामध्ये दोन हजारांहून कमी कोरोना रुग्ण नोंदवले आहेत. याबाबत आरोग्य विभागाने माहिती दिली आहे. तसेच, लोकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.
आज देशभर राष्ट्रीय पर्यटन दिवस म्हणून साजरा केला जात आहे
देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी पर्यटनाच्या महत्त्वाबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी भारत सरकारने २५ जानेवारी हा राष्ट्रीय पर्यटन दिवस म्हणून साजरा केला. जागतिक समुदायामध्ये पर्यटनाचे महत्त्व आणि त्याचे सामाजिक, राजकीय, आर्थिक आणि सांस्कृतिक मूल्य याबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.
आज राष्ट्रीय मतदाता दिवस साजरा केला जातो
भारतीय निवडणूक आयोगाने 25 जानेवारी हा दिवास राष्ट्रीय मतदार दिवस साजरा करणार असल्याचे जाहिर केले होते. 1950 पासून स्थापन झालेल्या निवडणूक आयोगाच्या 61 व्या स्थापना वर्षापासून 25 जानेवारी हा मतदाता दिवस म्हणून साजरा केला जातो.
भाजप-शिवसेनेमध्ये राजकारण तापले आहे. एकमेकांवर आरोपांच्या फैरी सुरू आहेत त्यावर आज संजय राऊत बोलण्याची शक्यता
शिवसेना-भाजपमधील संघर्ष चिघळत असून आता ट्विटर वॉर रंगले आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी खुर्चीवर बसलेले बाळासाहेब ठाकरे आणि प्रमोद महाजन उभे असलेले कार्टून ट्विट करत कोण कोणामुळे वाढले,'उघडा डोळे बघा नीट' या मथळ्याखाली प्रसिद्ध केले आहे. दरम्यान, यावरप्रमोद महाजन यांच्या कन्या पूनम महाजन यांनी तिखट भाषेत प्रतिक्रिया दिली आहे.
उत्तरप्रदेशमध्ये भाजपची उमेदवार यादी जाहीर होण्याची शक्यता आहे. यामध्ये 80 आमदार वगळणार असल्याची चर्चा
उत्तरप्रदेशमध्ये भाजपची उमेदवार यादी जाहीर होण्याची शक्यता आहे. यामध्ये 80 आमदार वगळणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे यामध्ये कुणाचा नंबर लागतो हे आज कळू शकते.
- मोहन भागवत त्रिपुरा दौऱ्यावर
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत आजपासून चार दिवस त्रिपुराच्या दौऱ्यावर आहेत. 2017 नंतर त्यांचा हा दुसरा दौरा आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मोहन भागवत आगरतळा येथील सेवाधाम येथे मुक्काम करतील. या दौऱ्यादरम्यान ते विविध क्षेत्रांतील मान्यवरांशी संवाद साधणार आहेत.
- स्वामी प्रसाद मौर्य यांच्या अटक वॉरंट वर सुनावणी
उत्तर प्रदेशातील माजी मंत्री आणि ओबीसी नेतने स्वामी प्रसाद मौर्य यांच्याविरुद्ध सुलतानपूर येथील विशेष एमपी-एमएलए कोर्टाने अटक वॉरंट वर जारी केले. त्यावर आज सुनावणी पार पडणार आहे. धार्मिक तेढ निर्माण होईल असे विधान केल्याप्रकरणी हे अटक वॉरंट मौर्य यांना जारी केले होते. स्वामी प्रसाद मौर्य यांनी भाजपाला सोडचिठ्ठी देत सपात सामील झाले होते. त्याच्या दुसऱ्या दिवशीच त्यांना हे अटक वॉरंट जारी झाले होते.
- क्लबहाऊस अॅप प्रकरणी कोर्टात सुनावणी
सुल्ली डिल प्रमाणे क्लबहाऊस अॅपवरील चॅट्सच्या संदर्भात मुंबई पोलिसांनी 19 ते 22 वयोगटातील तीन तरुणांना हरियाणातून अटक केली होती. याप्रकरणातील 3 आरोपींना मुंबई न्यायालयाने 24 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. त्यावर आज सुनावणी होणार आहे. क्लबहाऊस अॅप मध्ये महिलांबाबत आक्षेपार्ह बोलल्याचे आढळले होते. ते महिलांच्या शरीराच्या अवयवांचा लिलाव करण्याबद्दलही बोलले असल्याची माहिती पोलिसांच्या हाती लागली आहे.