ETV Bharat / bharat

Spacecraft Crashed On Moon : जपानच्या अवकाश मोहिमेला धक्का, चंद्रावर उतरण्याच्या प्रयत्नात कोसळले अंतराळयान - आयस्पेस

टोकीयो कंपनीच्या आयस्पेस अंतराळयान चंद्रावर उतरताना क्रॅश झाल्याचे स्पष्ट झाले आहे. चंद्रावर उतरताना हे अंतराळयान क्रॅश झाल्याची शक्यता आयस्पेसच्या वतीने वर्तवण्यात आली आहे.

Spacecraft Crashed On Moon
अंतराळयानाबाबत माहिती घेताना संशोधक
author img

By

Published : Apr 26, 2023, 9:03 AM IST

Updated : Apr 26, 2023, 10:01 AM IST

टोकियो : चंद्रावर उतरण्याच्या प्रयत्नात जपानचे अंतराळयान कोसळल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. चंद्रावर पोहोचण्याच्या काही क्षण आधी या अंतराळयानाचा संपर्क तुटल्यानंतर काय घडले हे शोधण्याचा जपानच्यावतीने प्रयत्न करण्यात येत आहे. सहा तासांहून अधिक काळ अंतराळ यानाबाबत कोणतीही माहिती मिळत नसल्याने टोकियो कंपनीच्या आयस्पेसने शेवटी अंतराळयान चंद्रावर आदळल्याचे स्पष्ट केले आहे.

अंतराळ संशोधनाला हा धक्का : जपानने केवळ साडेचार महिन्याच्या मोहिमेनंतर आपले यान चंद्रावर पाठवले होते. मात्र चंद्रावर लँडींग करताना ते क्रॅश झाले. त्यामुळे जपानच्या संशोधकांना प्रचंड धक्का बसला आहे. या अगोदर फक्त तीन देशांनी चंद्रावर अंतराळयान पाठवले आहे. त्यामुळे ही मोहिम यशस्वी झाली असती, तर जपान चौथा देश ठरला असता. आयस्पेसचे संस्थापक आणि सीईओ ताकेशी हकामादा यांनी अंतराळयान 33 फूट खाली उतरल्याने संपर्क तुटल्यानंतरही आशा बाळगली आहे.

तर पहिला खासगी व्यवसाय ठरला असता : चंद्रावर जपानने पाठवलेले अंतराळयान क्रॅश झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. लँडिंग अयशस्वी झाल्याची घोषणा केल्यामुळे हकामादाला गंभीर झाले. लँडरने चंद्राच्या पृष्ठभागावर लँडिंग करताना संपर्क तुटल्यानंतर क्रॅश झाल्याचे नंतर जपानच्या वतीने जाहीर करण्यात आले. जर सर्व काही सुरळीत झाले असते, तर चंद्रावर उतरणारा आयस्पेस हा पहिला खासगी व्यवसाय ठरला असता. हकामदा यांनी पुन्हा प्रयत्न करण्याचे वचन दिले आहे. त्यामुळे जपान पुढील वर्षी नक्कीच दुसरा प्रयत्न करणार असल्याचे हकामदा यांनी जाहीर केले आहे.

आतापर्यंत केवळ तीन देशाला आले यश : आतापर्यंत चंद्रावर अंतराळयान पाठवण्यात फक्त तीन देशाला यश आले आहे. यात रशिया, अमेरिका आणि चीनचा समावेश आहे. 2019 मध्ये एका इस्रायली संस्थेच्या अंतराळयानाने चंद्रावर उतरण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांचे अंतराळयान आघाताने नष्ट झाले. जर जागा कठीण असेल तर लँडिंग करणे कठीण आहे. मला वैयक्तिक अनुभवावरून हे भयानक वाटत असल्याचे नासाच्या जेट प्रोपल्शन लॅबोरेटरीचे संचालक लॉरी लेशिन यांनी ट्विट करुन स्पष्ट केले आहे.

हेही वाचा - New Delhi Crime News : मॅट्रीमोनियल साईटवरून तब्बल 700 तरुणींची फसवणूक, दोन नायजेरियन भामट्यांना अटक

Last Updated : Apr 26, 2023, 10:01 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.