नवी दिल्ली - कोरोना महामारीविरोधात जगातील सर्वात मोठा लसीकरण कार्यक्रम भारतात आजपासून सुरू होत आहे. देशात आत्तापर्यंत १ कोटींपेक्षा जास्त नागरिकांना कोरोनाची लागण झाली तर १ लाखांपेक्षा जास्त रुग्णांचे कोरोनाने बळी घेतले. लसीकरणाच्या पहिल्या दिवशी देशभरातील ३००६ लसीकरण केंद्रांवर प्रत्येकी १०० लाभार्थ्यांना लसीचा डोस देण्यात येणार आहे. ३ कोटी आरोग्य कर्मचारी आणि पहिल्या फळीतील कर्मचाऱ्यांना प्राधान्याने लस देण्यात येणार आहे.
वाचा सविस्तर -COVID VACCINATION LIVE UPDATES: देशभरात आजपासून कोरोना लसीकरणास सुरुवात
हैदराबाद - देशभरात कोरोना लसीकरणाची सुरुवात आजपासून होत आहे. भारतीय बनावटीच्या दोन लसींना सरकारने आणीबाणीच्या वापरासाठी परवाना दिला आहे. सीरम कंपनीने तयार केलेल्या कोव्हिशिल्ड आणि भारत बायोटेकने तयार केलेल्या कोव्हॅक्सिन लसीला हा परवाना मिळाला आहे. भारत बायोटेक कंपनीने इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) आणि भारतीय विषाणू संस्थेशी (एनआयव्ही) सहकार्य करत लस तयार केली आहे.
वाचा सविस्तर - जाणून घ्या भारत बायोटेकच्या 'कोव्हॅक्सिन' लस निर्मितीचा प्रवास
मुंबई - मागील कित्येक महिन्यांपासून तमाम भारतीय ज्या दिवसाची वाट पाहत होते, तो दिवस अखेर आता आज उजाडणार आहे. देशभरात लसीकरण मोहिमेला आजपासून सुरुवात होणार आहे. या मोहिमेसाठी राज्याच्या आरोग्य विभागाने तयारी केली आहे. राज्यातील २८५ केंद्रांवरून आरोग्य कर्मचाऱ्यांना आज लस देण्यात येणार आहे.
वाचा सविस्तर - गो कोरोना गो! राज्यातील 285 केंद्रावर होणार आज लसीकरण
मुंबई - मार्च २०२० पासून संपूर्ण जगाला वेठीस धरणाऱ्या कोरोना विषाणूवर विजय मिळवण्याच्या दिशेने वाटचाल सुरू झाली आहे. शनिवारी १६ जानेवारीपासून देशात प्रत्यक्ष कोरोना लसीकरणाला प्रारंभ होत आहे. भारत सरकारने ऑक्सफर्ड-अॅस्त्राझेनेकाच्या 'कोविशिल्ड' आणि भारत बायोटेक कंपनीच्या 'कोव्हॅक्सिन' लसीला परवानगी दिली. यातील 'कोव्हिशिल्ड' लसीचा निर्मितीपासूनचा प्रवास कसा झाला हे आपण थोडक्यात पाहुया...
वाचा सविस्तर -लसीकरणाला आजपासून सुरुवात; जाणून घ्या 'कोविशिल्ड' लसीचा प्रवास
पणजी - 51व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन आज शनिवार (दि.16) ताळगाव पठारावरील गोवा विद्यापीठाच्या डॉ. शामाप्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडिममध्ये होणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध चित्रपट निर्माते सुदीप संजीव (सुदीप) प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असतील. तर, केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर उपस्थित राहणार आहेत.
वाचा सविस्तर -51व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे आज उद्घाटन
नागपूर - प्रभू राम हे हिमालया प्रमाणे धैर्यवान आहेत. सागराप्रमाणे गंभीर आहेत. राष्ट्राला एकसंध बांधण्याचे काम प्रभू रामांनी केले आहे. ते केवळ राम नाहीत, तर आपल्या सर्वांसाठी राष्ट्र आहेत, तसेच ते आपले राष्ट्रदेव असल्याची भावना राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी व्यक्त केली आहे. ते नागपूर येथील पोदारेश्वर मंदिरात बोलत होते.
वाचा सविस्तर-प्रभू श्रीराम म्हणजे राष्ट्रदेव; राज्यपाल कोश्यारींनी मंदिरासाठी दिला लाखाचा निधी
पणजी - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आयुष तथा संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांच्या तब्येतीची दूरध्वनीवरून चौकशी केली. मोदींनी त्यांना काळजी घेण्याचा सल्लाही दिला. नाईक यांनी आपल्याला कालच्या तुलनेने आज अधिक बरे वाटते आहे, असे सांगून पंतप्रधानांचे आभार मानले.
वाचा सविस्तर-पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दूरध्वनीवरून केली श्रीपाद नाईक यांच्या तब्येतीची चौकशी
मुंबई - मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर विदेशातून येणाऱ्या प्रवाशांना क्वारंटाइनमधून सूट देण्याच्या बहाण्याने फसवणूक करणाऱ्या दुय्यम अभियंत्याला बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने तत्काळ निलंबित केले आहे. या प्रकाराची तातडीने चौकशी देखील सुरू करण्यात आली आहे. याप्रकरणी मनपा कर्मचाऱ्यासह एकूण तीन जणांविरुद्ध महानगरपालिका प्रशासनाने पोलिसांत फिर्याद देखील दाखल केली आहे.
वाचा सविस्तर -विमानतळावर प्रवाशांकडून पैसे घेऊन क्वारंटाइनमधून सूट देणारा अभियंता निलंबित
मुंबई - पुण्यातील भोसरी एमआयडीसी परिसरामध्ये जमीन व्यवहार संदर्भात राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांना ईडीकडून चौकशीचे समन्स पाठवण्यात आले होते. याप्रकरणी एकनाथ खडसे यांची शुक्रवारी तब्बल 7 तास ईडीच्या अधिकाऱ्यांनी चौकशी केली. दरम्यान, ईडीच्या अधिकाऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं मी दिली असून, त्यांना हवी असलेली सर्व कागदपत्रे मी दिली आहेत.
वाचा सविस्तर - चौकशीसाठी ईडीला पूर्ण सहकार्य करणार - एकनाथ खडसे
ब्रिस्बेन - गाबा मैदानावर सुरू असलेल्या बॉर्डर-गावसकर मालिकेच्या चौथ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव ३६९ धावांवर आटोपला आहे. आज दुसऱ्या दिवशी यजमान संघाने ५ बाद २७४ धावांवरून पुढे खेळण्यास सुरुवात केली. शंभरपेक्षा कमी धावांची भर घालत ऑस्ट्रेलियाचे उर्वरित फलंदाज बाद झाले. भारताकडून शार्दुल ठाकूर, वॉशिंग्टन सुंदर, टी. नटराजन यांनी प्रत्येकी तीन बळी घेत ऑस्ट्रेलियाच्या डावाला सुरुंग लावला.
वाचा सविस्तर -गाबा कसोटी : ३६९ धावांवर आटोपला ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव