आज राज्य मंत्रीमंडळाची बैठक -
आज राज्य मंत्रीमंडळाची बैठक होणार असून या बैठकीत राज्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन राज्यातील कडक निर्बंध वाढवण्यासंदर्भात निर्णय होण्याची शक्यता आहे.
सेंट्रल विस्टाविरोधात आज दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणी -
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता केंद्र सरकारने सेंट्रल विस्टा प्रोजेक्ट रद्द करावा या संदर्भात दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. याबाबतची सुनावणी आज होणार आहे.
आजपासून नाशिक शहरात कडक लॉकडाऊन -
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता नाशिक शहरात कडक लॉकडाऊन लावण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनातर्फे घेण्यात आला आहे. 12 ते 22 मे दरम्यान हा लॉकडाऊन असणार आहे. यासंर्भातील माहिती महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी दिली.
औरंगाबाद : माजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांची पत्रकार परिषद -
आज औरंगाबादमध्ये विधानसभेचे माजी अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांची सकाळी साडे अकराच्या दरम्यान पत्रकार परिदष होणार आहे.
महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळासंदर्भात उच्च न्यायालयात सुनावणी
आज महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळासंदर्भात दाखल याचिकेबाबत उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.
आज मुंबई महापालिकेच्या स्थायी समिची बैठक -
आज मुंबई महापालिकेच्या स्थायी समिची बैठक होणार आहे. ही बैठक ऑनलाईन पद्धतीने घेतल्या जाईल.