ETV Bharat / bharat

चीनला रोखणार भारताचे त्रिशूल आणि वज्रस्त्र - भारतीय सैन्य

लडाखच्या पर्वतीय प्रदेशात चिनी सैनिकांनी अत्यंत अमानुषपणे भारतीय सैन्यावर हल्ला केला होता. चिनी सैन्याने भारतीय जवानांना मारायला खिळ्यांचे रॉड वापरले होते. चीनी सैनिकांना उत्तर देण्यासाठी भारतीय सैनिकांकरीता गैर प्राणघातक शस्त्रे तयार करण्यात आली आहेत.

To tackle Chinese Army's barbed clubs, tasers, non lethal weapons ready for Indian security forces
चीनला त्यांच्याच भाषेत उत्तर देणार भारतीय सैन्य; प्राणघातक शस्त्रे तयार
author img

By

Published : Oct 18, 2021, 11:19 AM IST

Updated : Oct 18, 2021, 11:57 AM IST

नवी दिल्ली - गलवान खोऱ्यात झालेल्या चकमकीनंतर भारत आणि चीनमध्ये तणावाचे वातावरण आहे. दोन्ही देशांदरम्यान आतापर्यंत चर्चेच्या अनेक फेऱ्या पार पडल्या आहेत. मात्र, चीनच्या आडमुठेपणामुळे समस्यांवर तोडगा निघालेला नाही. गलवान खोऱ्यातील चकमकीत चिनी सैन्याने भारतीय जवानांना मारण्यासाठी अणकुचीदार खिळे लावलेले रॉड वापरले होते. आता पुन्हा दोन्ही देशादरम्यान संघर्ष झाल्यास चीनला योग्य प्रत्त्युत्तर देण्यासाठी भारतीय सैन्यांकरीता दिल्लीमधील एका कंपनीने आपल्या पारंपारिक शस्त्रांद्वारे प्रेरित गैर प्राणघातक असणारी वज्र, त्रिशूल आणि इतर शस्त्रे तयार केली आहेत. या शस्त्राद्वारे शत्रूला जखमी करता येणार आहे.

  • #WATCH 'Trishul' and 'Sapper Punch'- non-lethal weapons-developed by UP-based Apasteron Pvt Ltd to make the enemy temporarily ineffective in case of violent face offs pic.twitter.com/DmniC0TOET

    — ANI (@ANI) October 18, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

नोएडामधील एका स्टार्ट-अप फर्मने सांगितले की, गलवान खोऱ्यातील चकमकीनंतर भारतीय सुरक्षा दलांकडून त्यांना चिनींशी सामना करण्यासाठी सक्षम उपकरणे पुरवण्याचे काम सोपवण्यात आले होते आणि त्यांनी पारंपारिक भारतीय शस्त्रे जसे भगवान शिव यांचे 'त्रिशूल' पासून प्रेरणा घेत शस्त्रे तयार केली आहेत.

आम्ही भारतीय सुरक्षा दलांसाठी आपल्या पारंपारिक शस्त्रांद्वारे प्रेरित प्राणघातक शस्त्रे विकसित केले आहेत. एका शस्त्राचे नाव वज्र, त्रिशूल असल्याचे त्यांनी सांगितले. वज्राद्वारे शत्रुच्या बुलेटप्रूफ वाहनांना पंक्चर करता येते. तसेच वज्रामध्ये खिळे देखील आहेत. यातून मर्यादित करंट सोडता येतो आणि समोरासमोर लढताना शत्रू सैनिकाला अप्रभावी करता येते, असे अपेस्टरॉन प्रायव्हेट लिमिटेडचे मुख्य तंत्रज्ञान अधिकारी मोहित कुमार यांनी सांगितले. तसेच त्यांनी भारतीय जवानांना पुरवल्या जाणाऱ्या विविध प्रकारच्या उपकरणांची माहिती दिली.

कुमार यांनी हे देखील स्पष्ट केले, की ही गैर-प्राणघातक शस्त्रे खाजगी व्यक्ती किंवा सामान्य जनतेला विकण्यासाठी उपलब्ध नाहीत. ती फक्त सुरक्षा दल आणि कायदा अंमलबजावणी एजन्सींसाठी उपलब्ध आहेत.

हेही वाचा - आर्यन खान प्रकरणातील NCB चा पंच किरण गोसावीवर फसवणुकीचा गुन्हा दाखल

Last Updated : Oct 18, 2021, 11:57 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.