पाटणा(बिहार) : बिहार राज्यातील नालंदा येथे खेळत असताना एक 3 वर्षाचा मुलगा बोअरवेलमध्ये पडल्याची घटना घडली होती. मुलाला बाहेर काढण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन राबवण्यात आले होते. रविवारी सकाळी हा मुलगा बोअरवेलमध्ये पडला होता. माहिती मिळताच स्थानिक पोलीस घटनास्थळी हजर झाले होते. जेसीबीच्या मदतीने मुलाला सुखरूप बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू होते. ही घटना नालंदामधील कूल गावात घडली. शिवम कुमार,असे बोअरवेलमध्ये पडलेल्या मुलाचे नाव आहे.
-
#WATCH | Bihar: The child who fell into a borewell in Kul village in Nalanda has been rescued. More details are awaited. https://t.co/G6FW8RDIJJ pic.twitter.com/KQouMHkffD
— ANI (@ANI) July 23, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">#WATCH | Bihar: The child who fell into a borewell in Kul village in Nalanda has been rescued. More details are awaited. https://t.co/G6FW8RDIJJ pic.twitter.com/KQouMHkffD
— ANI (@ANI) July 23, 2023#WATCH | Bihar: The child who fell into a borewell in Kul village in Nalanda has been rescued. More details are awaited. https://t.co/G6FW8RDIJJ pic.twitter.com/KQouMHkffD
— ANI (@ANI) July 23, 2023
मुलाला सुखरुप बाहेर काढले - स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार बोअरवेलमधून मुलाचा ओरडण्याचा आवाज येत होता. त्यानंतर लगेच याची माहिती स्थानिक प्रशासनाला देण्यात आली होती. लगेच पोलीस आणि अग्निशामन दलाचे जवान घटनास्थळी दाखल होत रेस्क्यू ऑपरेशन सुरू करण्यात आले होते. मेडिकल पथक घटनास्थळी दाखल झाले होते. मुलाला बोअरवेलमध्ये ऑक्सिजनही दिले जात होते.
बोअरवेलमध्ये सोडले होते कॅमेरे - बोअरवेलमध्ये पडलेल्या शिवमला दूध आणि पाणी पाईपच्या माध्यमातून देण्यात आले. परंतु, तो ते घेऊ शकला नाही. प्रशासनाकडून बोअरवेलमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा सोडण्यात आला होता. शिवमला वाचण्यासाठी जेसीबीच्या मदतीने बोअरवेलच्या आजुबाजुला खड्डा तयार करण्यात आला होता. अखेर रविवारी सायंकाळी मुलाला सुखरुप बाहेर काढण्यात आले आहे.
-
#WATCH Bihar: Rescue operation underway by NDRF team after a child fell into a borewell in Kul village in Nalanda. https://t.co/HdcCri8c7O pic.twitter.com/K4rB1OyjRB
— ANI (@ANI) July 23, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">#WATCH Bihar: Rescue operation underway by NDRF team after a child fell into a borewell in Kul village in Nalanda. https://t.co/HdcCri8c7O pic.twitter.com/K4rB1OyjRB
— ANI (@ANI) July 23, 2023#WATCH Bihar: Rescue operation underway by NDRF team after a child fell into a borewell in Kul village in Nalanda. https://t.co/HdcCri8c7O pic.twitter.com/K4rB1OyjRB
— ANI (@ANI) July 23, 2023
मी शेतात काम करत होती आणि माझा मुलगा खेळत होता. अचानक त्याचा पाय निसटला आणि तो बोअरवेलमध्ये पडला - शिवमची आई
मुलाला रुग्णालयात केले दाखल - एनडीआरएफ, एसडीआरएफ टीम, दोन पोकलेन मशीन, 6 जेसीबी यांच्या मदतीने रेस्क्यू ऑपरेशन राबवण्यात आले होते. तसेच मुलाला ऑक्सिजन आणि पिण्यासाठी दूध दिले जात होते. बोअरवेल 160 फूट खोल आहे. पण तो 61 फूट खड्ड्यात अडकला होता. तो मुलगा रडत रडत हालचाल करत होता. त्याला आता सुखरुप बाहेर काढले आहे. मुलाला उपचारासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. तसेच मुलाची प्रकृती आता ठीक आहे, अशी माहिती नालंदा एडीएम कृष्णकांत उपाध्याय यांनी दिली आहे.