हैदराबाद : लहानपणी बहुतेक मुले त्यांचा वेळ खोड्या करण्यात आणि खेळात घालवतात. पण काही मुलं अशीही असतात, ज्यांची प्रतिभा लहानपणापासूनच दिसू लागते. ते आपल्या कौशल्याने जगाला चकित करतात. असाच एक मुलगा आहे, जो फक्त 7 वर्षांचा आहे आणि त्याची वन्यजीवांबद्दलची आवड पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. या आवडीमुळेच त्याची एक नवी ओळख निर्माण झाली आहे. त्यामुळे त्याला नुकतेच ब्रिटनच्या राजाच्या राज्याभिषेकात बोलावण्यात आले होते. येथे त्याने ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांचीही भेट घेतली.
लहानपणापासूनच निसर्गाविषयी ओढ : आंध्र प्रदेशाच्या चित्तूर येथील कुंचला अनिल - स्नेहा सध्या ब्रिटनमध्ये राहतात. त्यांच्या सात वर्षांच्या मुलाचे नाव अनिश्वर आहे. वयाच्या चौथ्या वर्षापासून त्याने वन्यजीव संवर्धनात रस दाखवायला सुरुवात केली. घरातील लोकांशी आणि शाळेत मित्र - मैत्रिणींशी बोलताना त्याची निसर्गाविषयीची ओढ दिसून आली. अनिश्वरने टीव्हीवर पाहिले की कोरोना संकटाच्या काळात शंभर वर्षांचा माणूस ब्रिटनमध्ये वैद्यकीय सेवांसाठी देणगी गोळा करत आहे. हे पाहून त्याने आपली आवड आई - वडिलांना सांगितली.
'लिटल पेडलर्स चॅलेंज' पूर्ण केले : त्यानंतर त्यांनी देणगी गोळा करण्यासाठीही पावले उचलली. त्यांनी भारताच्या मदतीसाठी 3 हजार पौंड आणि पीपी किट दिले. याच अनुषंगाने या लहान मुलाने 'लिटल पेडलर्स चॅलेंज' सायकल चालवून लोकांना कोविडबद्दल जागरूक करून निधी गोळा करण्याचा प्रयत्न केला. त्याने आपल्या मित्रांना या चॅलेंजमध्ये सहभागी करून घेतले आणि ते बदलून 'लिटल पेडलर्स, अनिश आणि फ्रेंड्स' असे केले.
'ब्रिटन्स गॉट टॅलेंट' मध्येही आपली छाप पाडली : अनिश्वरने हे चॅलेंज 57 मुलांसह पूर्ण केले आणि अनेकांसाठी तो रोल मॉडेल बनला. अनिश्वर लहान वयात जनजागृती कार्यक्रम आणि पर्यावरण रक्षणात सहभागी होताना पाहून कुटुंबीय आणि नातेवाईकांना अभिमान वाटत आहे. याशिवाय, त्याने अमेरिका आणि यूकेमधील लोकप्रिय टीव्ही रिअॅलिटी शोमध्ये भाग घेतला आहे. अनिश्वर एक प्रवासी भारतीय म्हणून प्रसिद्ध टीव्ही शो 'ब्रिटन्स गॉट टॅलेंट'च्या अंतिम - 5 मध्ये गेला होता.
हेही वाचा :