नवी दिल्ली - ज्या घटनेने संपुर्ण देश हळहळला होता. ती घटना म्हणजे लखीमपूर खेरी येथील झालेला हिंसाचार. या हिसाचाराप्रकरणी केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्रा यांना अटक झाली होती. ( Union Minister Ajay Mishra ) त्यानंतर त्यांना जामीन मिळाला होता. आता दाखल असलेल्या याचिकेवर हा जामीन रद्द करण्याबाबत सर्वोच्च न्यायालय आज सोमवारी(दि. 18 एप्रिल)रोजी आपला आदेश देणार आहे. सरन्यायाधीश एन व्ही रमना यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठ निकाल सुनावण्याची शक्यता आहे.
अनावश्यक तपशीलांमध्ये जाऊ नये - आशिष मिश्रा यांचा जामीन रद्द करण्याची मागणी करणारी याचिका शेतकऱ्यांनी दाखल केलेली आहे. त्यावर झालेल्या सुनावणीनंतर सर्वोच्च न्यायालयाने (४ एप्रिल)रोजी निर्णय राखून ठेवला होता. सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वी अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या आशिष मिश्रा यांना जामीन देण्याच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित केले होते. (Chief Justice N. V. Ramana) त्यामध्ये त्यांनी म्हटले होते की, यामध्ये खटला सुरू व्हायचा असताना अनावश्यक तपशीलांमध्ये जाऊ नये.
प्रशांत भूषण यांच्या निवेदनाची दखल - न्यायमूर्ती सूर्यकांत आणि हिमा कोहली यांचा समावेश असलेल्या विशेष खंडपीठाने सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या एसआयटीने सुचविल्याप्रमाणे उच्च न्यायालयाच्या आदेशाविरुद्ध राज्य सरकारने अपील दाखल केले नाही याचीही तीव्र दखल घेतली होती. (Supreme Court Ashish Mishra Bail Cancellation) शेतकऱ्यांची बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील दुष्यंत दवे आणि प्रशांत भूषण यांच्या निवेदनाची खंडपीठाने दखल घेतली.
गाडीने चार शेतकऱ्यांना चिरडले होते - 10 मार्च रोजी मुख्य साक्षीदारावर झालेल्या हल्ल्याचा संदर्भ देत शेतकऱ्यांची बाजू मांडणाऱ्या वकिलांनी साक्षीदारांचे संरक्षण सुनिश्चित करण्याचे निर्देश राज्य सरकारला दिले होते. गेल्या वर्षी 3 ऑक्टोबर रोजी, उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांच्या या भागात शेतकरी निदर्शने करत असताना उसळलेल्या हिंसाचारात लखीमपूर खेरी येथे आठ जणांचा मृत्यू झाला होता. उत्तर प्रदेश पोलिसांच्या एफआयआरनुसार, एका गाडीने चार शेतकऱ्यांना चिरडले, ज्यामध्ये आशिष मिश्रा बसले होते.
काय आहे प्रकरण - उत्तरप्रदेशमधील लखीमपूर खिरी जिल्ह्यात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या अंगावर भाजपा कार्यकर्त्यांनी गाडी घातल्याने आठ जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे संपूर्ण देशभरातून याघटनेचा निषेध होत आहे. केंद्रीय मंत्री अजय मिश्र यांचा मुलगा आशिष मिश्र याने शेतकऱ्यांच्या आंदोलनस्थळी गाडी घातल्याचा आरोप केला जात आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अतिरिक्त पोलीस महासंचालकांना घटनास्थळी पाठवले आहे. दरम्यान, काँग्रेस महासचिव प्रियंका गांधी आज सकाळी सहा वाजता घटनास्थळी भेट दिली. तसेच माजी मुख्यमंत्री अखिलेख यादव देखील घटनास्थळी पोहोचणार आहे.
रविवरी नेमकं काय घडल? - रविवारी दुपारच्या सुमारास उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव मौर्य हे लखीमपूर खिरी येथे येणार होते. मात्र, त्यांचे हेलिकॉप्टर उतरण्यापूर्वीच शेतकऱ्यांनी हेलिपॅडला घेराव घातला. दरम्यान, केशव मौर्य हे आपला कार्यक्रम संपवून केंद्रीय राज्यमंत्री अजय कुमार मिश्रा तेनी यांच्या घराकडे रवाना झाले. याची माहिती मिळताच अजय कुमार यांचा मुलगा घाईघाईत घरी जायला निघाला. त्याच्या गाडीचा ताफा तिकोनिया येथील बनबीरपुर चौकात पोहोचताच तेथे आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी त्याचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र, गाडी न थांबवता ती थेट शेतकऱ्यांच्या अंगावर चढवण्यात आली. हा सर्व प्रकार जाणूनबूजून करण्यात आला, असा आरोप शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.
या घटनेत 8 जणांचा मृत्यू - दरम्यान, हा सर्व प्रकार घडल्यानंतर शेतकऱ्यांनी या वाहनांची तोडफोड करण्यास सुरुवात केली. तसेच कारमध्ये बसलेले भाजपा कार्यकर्ता आणि आशिष मिश्रा यांना घेरले. त्यानंतर आशिष मिश्रा यांनी परवानाधारक रिव्हॉल्वरने गोळीबार केला. या गोळीबारात एका शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याचाही आरोप करणात येत आहे. तर या घटनेत 8 जणांचा मृत्यू झाल्याचे जिल्हा प्रशासनातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.
हेही वाचा - Ramoji Rao Granddaughter Married : रामोजी रावांच्या नातीचा विवाह; देशभरातील मान्यवर उपस्थित