ETV Bharat / bharat

Oscars Awards 2022 : एंजेलिसमध्ये आज ऑस्कर पुरस्कार सोहळा;वाचा लाईव्ह कुठे पाहता येणार - ऑस्कर पुरस्कार सोहळा कसा पाहायचा

जगभरात अत्यंत मानाचा समजला जाणारा ऑस्कर पुरस्कार सोहळा कोरोनामुळे तब्बल ३ वर्षांनंतर आयोजित केला आहे. (Oscars Awards 2022) आज रविवार (२७ मार्च)रोजी हा 'ऑस्कर पुरस्कार'सोहळा लॉस एंजेलिस येथील डॉल्बी थिएटरमध्ये होणार आहे. भारतीय वेळेनुसार सोमवारी (२८ मार्च) पहाटे (५. ३०)वाजल्यापासून (Disney + Hotstar)वर हा सोहळा पाहता येणार आहे.

ऑस्कर पुरस्कार
ऑस्कर पुरस्कार
author img

By

Published : Mar 27, 2022, 9:46 AM IST

Updated : Mar 27, 2022, 9:54 AM IST

दिल्ली - ऑस्कर पुरस्कार २०२२चे तयारी सुरु झाली आहे. सिनेसृष्टीतील सर्वोच्च पुरस्कार म्हणून गौरवला जाणारा 'ऑस्कर पुरस्कार' सोहळ्याकडे मनोरंजनसृष्टीसह सिनेप्रेक्षकांचे लक्ष लागले आहे. ( Today Oscars Awards ) हा पुरस्कार कोरोनामुळ दोन वेळा पुढे ढकलण्यात आला होता. अखेर, आज रविवार (२७ मार्च)रोजी 'ऑस्कर पुरस्कार'सोहळा पार पडणार आहे. लॉस एंजेलिस येथील डॉल्बी थिएटरमध्ये 94 वा 'ऑस्कर पुरस्कार'सोहळा पार पडणार आहे.

'द पॉवर ऑफ डॉग' या सिनेमाला सर्वाधिक नामांकन - ऑस्कर हा जगभरात अत्यंत मानाचा समजला जाणारा पुरस्कार आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही लॉस एंजेलिस येथील डॉल्बी थिएटरमध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. (Oscar ceremony is taking place today) 'द पॉवर ऑफ डॉग' या सिनेमाला सर्वाधिक नामांकन मिळाले आहेत. तर, भारताच्या 'राइटिंग विथ फायर' या सिनेमाने सर्वोत्कृष्ट माहितीपटाच्या श्रेणीत स्थान मिळवले आहे.

भारतात ऑस्कर कधी आणि कसा पाहाल? - ऑस्कर पुरस्कार सोहळा आज रविवारी (२७ मार्च)रोजी रात्री ८ वाजल्यापासून लॉस एंजेलिसमध्ये सुरु होणार आहे. पण वेळेतील फरकामुळे भारतात सोमवारी (२८ मार्च) पहाटे (५. ३०)वाजल्यापासून हा सोहळा पाहता येणार आहे. हा सोहळा डिस्ने प्लस हॉटस्टार (Disney + Hotstar)वर लाइव्ह पाहता येणार आहे.

लाइव्ह स्ट्रीम संपल्यानंतर तो उपलब्ध असणार - हा सोहळा स्टार वर्ल्ड आणि स्टार मुव्हीजवर सकाळी ६.३० वाजता प्रसारित होईल. तसेच, ऑस्करच्या सोशल मीडिया अकाऊंटवर याबाबतचे लाइव्ह अपडेट देण्यात येणार आहेत. तुम्हाला जरी हा कार्यक्रम पाहता आला नाही तरी (Disney+Hotstar) वर लाइव्ह स्ट्रीम संपल्यानंतर तो उपलब्ध असणार आहे.

तब्बल ३ वर्षांनंतर पुरस्कारांचे आयोजन - मागील तीन वर्षापासून हा पुरस्कार सोहळा कोरोना महामारीमुळे ऑनलाईन पद्धतीने आयोजित करण्यात आला होता. मात्र, आता तब्बल ३ वर्षांनंतर अकादमी पुरस्कारांचे आयोजन केले जात आहे. त्यामुळे हा सोहळा कोणीही होस्ट करत नव्हते. मात्र, यंदा अखेर या सोहळ्याचे होस्ट परतले आहेत.

यांनी केले आयोजन - यंदा तीन सेलिब्रिटी हा शो होस्ट करताना दिसणार आहे. एमी पुरस्कार विजेती लेखिका आणि कॉमेडियन वांडा सायक्स, स्टँड-अप कॉमेडियन एमी शूमर आणि अभिनेत्री रेजिना हॉल या तिघीजणी मिळून ९४ व्या अकादमी पुरस्कारांचे आयोजन करणार आहेत.

'द पॉवर ऑफ डॉग' चित्रपटाला सर्वाधिक १२ नामांकने - ९४ व्या ऑस्कर पुरस्कार नामांकनांमध्ये हॉलिवूड अभिनेता बेनेडिक्ट कंबरबॅचची मुख्य भूमिका असलेल्या 'द पॉवर ऑफ डॉग' या चित्रपटाला सर्वाधिक १२ नामांकने मिळाली आहेत. (The Power of Dog) तर भारताच्या 'रायटिंग विथ फायर' या माहितीपटाचा समावेश झाला. मात्र, इतर कोणत्याही भारतीय चित्रपटाला यंदाच्या ऑस्करसाठी स्थान मिळालेले नाही.

हेही वाचा - CSK VS KKR, IPL 2022 : आयपीएलचा महासंग्राम आजपासून; रविंद्र जडेजा-श्रेयस अय्यर आमनेसामने

Last Updated : Mar 27, 2022, 9:54 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.