मुंबई - High Court ordered the Governmen : भारतातील प्रख्यात चित्रपट निर्माता मुश्ताक नाडियादवाला याची बायको कोरोना महामारी साथीच्या दरम्यान लॉकडाऊन मध्ये आपल्या दोन मुलांसह पाकिस्तानमध्ये माहेरी गेली. नंतर ती परतलीच नाही. या संदर्भात भारत सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयाचे अधिकारी आज उच्च न्यायालयात हजर झाले. त्यावेळेला न्यायालयाने आदेश दिले की," पाकिस्तानातून भारतीय नागरिकाची बायको कधी भारतात परत येऊ शकते आणि सद्यस्थिती काय याचा अहवाल उच्च न्यायालयात 20 डिसेंबर रोजी सादर करा, असे आदेश न्यायमूर्ती रेवती मोहिते -डेरे आणि न्यायमूर्ती गौरी गोडसे यांनी दिले आहेत.
परराष्ट्र विभागाच्या उच्च अधिकाऱ्यांनी लावली हजेरी:
कोरोना महामारीच्या काळामध्ये देशाच्या पंतप्रधानांनी लॉकडाऊन घोषित केला. त्यावेळेला चित्रपट निर्माता मुश्ताक नडियाद्वाला याची बायको माहेरी पाकिस्तानात दोन मुलांसह निघून गेली. नंतर ती परत आलीच नाही. त्यामुळे बायको आणि मुलांसह भारतात तिने परतावे, यासाठी न्यायालयाकडे मुश्ताक यांनी याचिका दाखल केली होती. यासंदर्भात न्यायालयाने सीबीआय आणि इंटरपोल यांना देखील या संदर्भात सहकार्य करण्याबाबत विचारणा केली होती. मात्र यातून मार्ग निघत नसल्यामुळे प्रत्यक्ष देशाच्या गृहमंत्र्यालयातील अधिकाऱ्याने न्यायालयात प्रत्यक्ष हजर राहून याचिका कर्त्याच्या पत्नीला पाकिस्तानातून भारतात कसे आणता येईल. याबाबत त्यांनी स्पष्टपणे सांगावे असे निर्देश खंडपीठाने दिले होते. आज उच्च अधिकाऱ्याने उच्च न्यायालयात हजेरी लावली होती.
परराष्ट्र विभागाने मांडली बाजू:
भारत सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयाचे उच्च अधिकारी आज न्यायालयात हजर झाले. त्यांच्या वतीने वकिलांनी बाजू मांडली की, "यासंदर्भात विविध कायदेशीर प्रक्रिया आणि प्रशासकीय प्रक्रिया करून मार्ग निघू शकतो. सरकार त्याबाबत सकारात्मक आहे. भारतीय नागरिकाची पत्नी जी पाकिस्तानात तिच्या माहेरी 2 मुलांसकट राहते, या संदर्भात पाकिस्तानात रीतसर संपर्क करून न्यायालयासमोर वस्तूस्थिती आम्ही मांडू."
सीबीआयची बाजू:
सीबीआयच्या वतीने वकील कुलदीप पाटील यांनी कोणत्या कायदेशीर प्रक्रिया आहेत आणि कोणत्या नियमांतर्गत ही प्रक्रिया केली जाऊ शकते याबाबत जुजबी माहिती न्यायालयाला दिली.
बायको पाकिस्तानातून भारतात कशी परत येईल त्याचा अहवाल सादर करा:
सीबीआय, परराष्ट्र मंत्रालय आणि याचिका करणारे या सर्व पक्षकारांची बाजू ऐकल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि न्यायमूर्ती गौरी गोडसे यांच्या खंडपीठाने भारत सरकारच्या परराष्ट्र विभागाला आदेश दिले की, भारतीय नागरिकाची बायको जी पाकिस्तानात माहेरी गेलेली आहे. तिच्यासोबत तिचे दोन लहान मुलं आहे. ती भारतात कशी परत येऊ शकते तसेच आणि आता तिची तिकडे सद्यस्थिती काय आहे याबाबत लेखी अहवाल 20 डिसेंबर पर्यंत सादर करा."
हेही वाचा -
2. महाराष्ट्राची अर्थव्यवस्था एक ट्रिलियन डॉलर करण्याचा मानस - अजित पवार
3. भाजपाच्या नैतिकतेबद्दल खिचडी चोरांच्या सल्ल्याची गरज नाही - नितेश राणे