हैदराबाद लोकांनी काळे झेंडे घेऊन निषेध केला. मदिना, अफजलगंज आणि चारमिनार चौकात अनेक लोक गटातटात जमले. चौकाचौकात आपली वाहने उभी केली आणि घोषणाबाजी केली. त्या भागात काळे झेंडे दाखवून निषेध रॅली काढण्यात आली. आंदोलकांनी हिंसाचार करू नये यासाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे. काल वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी भाजप आमदार टी राजा BJP MLA T Raja यांना अटक करण्यात आली होती.
पहाटे ४ वाजेपर्यंत आंदोलकांनी आंदोलन सुरूच ठेवले. दुसरीकडे, भाजप आमदार राजा सिंह यांच्या घरावर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. त्याच्या घराकडे इतर कोणी येऊ नये म्हणून बॅरिकेड्स लावण्यात आले होते.
हैदराबाद इस्लाम धर्माविरोधात वादग्रस्त वक्तव्य controversial remarks targeting Islam केल्याप्रकरणी भाजपचे तेलंगणातील आमदार टी राजा सिंग यांना मंगळवारी पक्षातून निलंबित करण्यात आले BJP Suspends MLA T Raja Singh आहे. तेलंगणाचे भाजप आमदार राजा सिंह यांना भाजप हायकमांडने निलंबित केले आहे. कथित वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी भाजप नेते राजा सिंह यांना मंगळवारी येथे अटक करण्यात BJP MLA RAJA SINGH BOOKED आली. या वादग्रस्त वक्तव्यांमुळे भाजपच्या केंद्रीय शिस्तपालन समितीने त्यांना निलंबित केले. भाजपने त्यांना 10 दिवसांत कारणे दाखवा नोटीस बजावून, त्यांना पक्षातून का काढले जाऊ नये, अशी विचारणा केली आहे.
प्रेषित मोहम्मद यांच्याबद्दल कथित अपमानास्पद टिप्पणी केल्याबद्दल त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. सोमवारी राजा यांनी शहरात आलेल्या स्टँडअप कॉमेडियन मुनव्वर फारुकी Stand Up Comedian Munawwar Farooqui यांच्यावर टीका करणारा व्हिडिओ जारी केला. सिंह हे त्यात धर्माविरोधात काही भाष्य करताना दिसत आहेत. राजा यांना त्यानंतर गुन्हा दाखल करून अटकही करण्यात आली. त्यानंतर शहरातील वातावरण तणावपूर्ण बनले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सिंह यांच्याविरोधात दक्षिण, पूर्व आणि पश्चिम विभागांतर्गत अनेक पोलिस ठाण्यात तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. डबीरपूरचे पोलिस निरीक्षक जी कोटेश्वर राव यांनी सांगितले की, त्यांना सिंह यांच्याविरुद्ध तक्रार प्राप्त झाली आहे, ज्यामध्ये भाजप आमदाराने धर्माविरुद्ध अपमानास्पद टिप्पणी केल्याचा आरोप केला आहे.
हेही वाचा BJP MLA RAJA SINGH BOOKED भाजप आमदार टी राजा यांना वादग्रस्त वक्तव्यप्रकरणी अटक