ETV Bharat / bharat

तृणमूल काँग्रेसला झटका; सुवेंदू अधिकारी यांनी दिला पक्षाचा राजीनामा - Suvendu Adhikari

तृणमूल काँग्रेसचा ग्रामीण चेहरा मानले जाणारे सुवेंदू अधिकारी यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी पक्ष सोडल्याने बंगालच्या राजकारणात खळबळ उडाली असून ते भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे.

सुवेंदू अधिकारी
सुवेंदू अधिकारी
author img

By

Published : Dec 17, 2020, 3:31 PM IST

Updated : Dec 17, 2020, 4:11 PM IST

कोलकाता - पश्चिम बंगालमध्ये नव्या वर्षात विधानसभा निवडणुका असून राजकीय घडामोडींना वेग आला आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना मोठा धक्का बसला आहे. तृणमूल काँग्रेसचा ग्रामीण चेहरा मानले जाणारे सुवेंदू अधिकारी यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी पक्ष सोडल्याने बंगालच्या राजकारणात खळबळ उडाली असून ते भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगली आहे.

सुवेंदू अधिकारी यांनी आमदारकीचा राजीनामा बुधवारी दिला होता. तर काही दिवसांपूर्वीच त्यांनी कॅबिनेट मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. सुवेंदू अधिकारी हे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय मंत्री व विद्यमान खासदार शिशिर अधिकारी यांचे थोरले पुत्र आहेत. सुवेंदू अधिकारी यांचे वडिल आणि भाऊ दोघेही खासदार आहेत. सुवेंदू यांनी पक्ष सोडल्यानंतर आता वडील आणि दोन भावांनी त्याच मार्गाचा अवलंब केल्यास 16 व्या विधानसभा मतदारसंघात तृणमूलचे भविष्य अंधकारमय आहे.

आमदार ते कॅबिनेट मंत्री -

सुवेंदू अधिकारी राजकारणाचे बाळकडू घरातूनच मिळाले असून त्यांनी 1989 मध्ये त्यांनी छात्र परिषदेच्या माध्यमातून राजकीय कारकिर्दीचा श्रीगणेशा केला. त्यानंतर वयाच्या 36 व्या वर्षी पहिल्यांदा ते 2006 मध्ये कांता दक्षिणमधून विधानसभेवर निवडून गेले. त्यानंतर 2009 आणि 2014 मध्ये सलग दोनदा तमलूक मतदारसंघाचे संसदेत प्रतिनिधित्व केले. तसेच 2016 मध्ये नंदिग्राममधून निवडून गेल्यानंतर ते कॅबिनेट मंत्री झाले.

भाजपात प्रवेश ?

सुवेंदू अधिकारी 18 डिसेंबरला भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती आहे. त्यांच्या भाजपा प्रवेशावेळी गृहमंत्री अमित शाह उपस्थित असणार असल्याची माहिती आहे. गेल्या काही दिवसांपासूने ते पक्षावर नाराज होते. तृणमूलच्या वरिष्ठ नेत्यांनी सुवेंदू यांचे मन वळवण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याला यश आले नाही.

भाजपाचे ध्येय -

विधानसभा निवडणुकीसाठी भाजपानं जोरात मोर्चबांधणी सुरू केली आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत अमित शाह यांनी बंगालमधील 42 पैकी 22 जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेवले होते. निकालात भाजपाने 18 जागा जिंकल्या होत्या. तर टीएमसीला 22 आणि काँग्रेसला 2 जागा मिळाल्या होत्या. अशा परिस्थितीत 2021 च्या विधानसभा निवडणुकीत बंगालमध्ये मोठा संघर्ष पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

हेही वाचा - भाजपाच्या नेत्याचा गौप्यस्फोट; 'कमलनाथ यांचे सरकार पाडण्यात मोदींची मुख्य भूमिका'

Last Updated : Dec 17, 2020, 4:11 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.