प्रयागराज (उत्तर प्रदेश) Suheldev Express Derailed : प्रयागराज इथं मंगळवारी रात्री गाझीपूरहून आनंद विहार टर्मिनलकडे जाणारी सुहेलदेव एक्स्प्रेस रुळावरून घसरून मोठा रेल्वे अपघात टळला. प्रयागराज जंक्शनवरून गाडी बाहेरच्या क्रॉसिंगवर येताच प्रवाशांनी भरलेल्या या ट्रेनच्या इंजिन आणि जनरेटर डब्यात मोठा आवाज झाला. त्यानंतर रेल्वेची चाकं रुळावरून घसरली. जोरात आवाज आणि धक्क्यानं चालती गाडी रुळावरून घसरल्यानं प्रवाशांमध्ये घबराट पसरली. कोणतीही जीवितहानी झाली नसल्यानं रेल्वे अधिकाऱ्यांसह प्रवाशांनीही सुटकेचा नि:श्वास सोडला. घटनेनंतर सुहेलदेव एक्स्प्रेस अडीच तासांनंतर दिल्लीकडे रवाना करण्यात आली. तर रुळावरून घसरलेले इंजिन व जनरेटर वाहन पुन्हा रुळावर आणण्याचं काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.
-
#WATCH | Uttar Pradesh: Suheldev Superfast Express going from Ghazipur City to Anand Vihar derailed at the Prayagraj outer area pic.twitter.com/1yvIjLTPvm
— ANI (@ANI) October 31, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">#WATCH | Uttar Pradesh: Suheldev Superfast Express going from Ghazipur City to Anand Vihar derailed at the Prayagraj outer area pic.twitter.com/1yvIjLTPvm
— ANI (@ANI) October 31, 2023#WATCH | Uttar Pradesh: Suheldev Superfast Express going from Ghazipur City to Anand Vihar derailed at the Prayagraj outer area pic.twitter.com/1yvIjLTPvm
— ANI (@ANI) October 31, 2023
कोणत्याही गाड्यांवर परिणाम नाही : उत्तर मध्य रेल्वेचे वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी डॉ. अमित मालवीय यांनी सांगितलं की, या अपघातामुळं कोणतीही जीवितहानी झाली नाही किंवा इतर कोणत्याही गाड्यांना याचा फटका बसला नाही. अपघाताचं कारण शोधण्यासाठी तज्ज्ञांच्या पथकाकडून तपास करण्यात येणार आहे. रात्री उशिरापासून घटनास्थळी तपासाचं काम सुरू झालं. तपास अहवाल आल्यानंतर अपघाताचं कारण समजू शकेल, असंही उत्तर मध्य रेल्वेचे वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी डॉ. अमित मालवीय सांगितलंय.
सर्व वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल : मंगळवारी रात्री 9 वाजताच्या सुमारास सुहेलदेव एक्स्प्रेस प्रयागराज जंक्शनवरून दिल्लीकडे रवाना झाली. मात्र काही क्षणांतच जोराचा धक्का आणि आवाज झाल्यानं ट्रेन थांबली. यानंतर ट्रेनमधील प्रवासी घाबरून बोगीतून बाहेर आले. तेव्हा त्यांना रेल्वेचे इंजिन आणि जनरेटर वाहनाची चार चाके रुळावरून घसरल्याचं समजलं. गाडी रुळावरून घसरल्याची माहिती मिळताच उत्तर मध्य रेल्वेचे डीआरएम हिमांशू बडोनी आणि इतर रेल्वे अधिकारी घटनास्थळी पोहोचले. तसंच या अपघाताची माहिती मिळताच बचाव पथक आणि रेल्वे अभियंते घटनास्थळी पोहोचले.
इंजिन बदलल्यानंतर गाडी रवाना : गाझीपूरहून दिल्लीच्या आनंद विहार टर्मिनलकडे जाणारी सुहेलदेव एक्स्प्रेस प्रयागराज जंक्शनवरून पुढे जात असताना रुळावरून घसरल्याची माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी मदतकार्य सुरू करण्यात आलं. ट्रेनचं इंजिन आणि जनरेटर गाडी रुळावरून घसरल्यानंतर दुसऱ्या इंजिनच्या मदतीनं रेल्वेच्या प्रवासी बोगी मागे खेचण्यात आल्या. त्यानंतर दुसऱ्या इंजिनच्या मदतीने सुहेलदेव एक्स्प्रेस सुमारे अडीच तासांनी पुढील प्रवासासाठी पाठवण्यात आली.
या प्रकरणाची चौकशी सुरू : उत्तर मध्य रेल्वेचे वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी डॉ. अमित मालवीय यांनी सांगितलं की, या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. ट्रेनमधील सर्व प्रवासी आणि रेल्वे कर्मचारी पूर्णपणे सुरक्षित आहेत. रेल्वे रुळावरून घसरण्याच्या कारणाचा तपास सुरू करण्यात आला आहे. रेल्वे तज्ज्ञ या घटनेची चौकशी करून अहवाल सादर करणार आहेत. यात अपघाताचं कारण स्पष्ट होऊ शकेल. या अपघातामुळं फक्त सुहलदेव एक्स्प्रेस उशिरा धावत आहे. याशिवाय, अपघात झालेल्या रेल्वे ट्रॅकवर सध्या रेल्वे गाड्यांची वाहतूक बंद आहे. परंतु, इतर कोणत्याही गाड्यांच्या वेळेवर याचा परिणाम झालेला नाही.
हेही वाचा :
- Ahmednagar Burning Train Fire Video : अहमदनगरमध्ये 'द बर्निंग ट्रेनचा थरार'; पाहा धगधगत्या आगीचा व्हिडिओ..
- Andhra Pradesh Train Accident : आंध्र प्रदेशात रेल्वेचा भीषण अपघात; दोन ट्रेनची टक्कर; 8 प्रवाशांचा मृत्यू
- Madurai Train Fire : मदुराई रेल्वेतील आगीच्या दुर्घटनेनंतर धक्कादायक माहिती समोर, ट्रॅव्हल एजन्सीकडून 22 वर्षांपासून नियमांचे उल्लंघन