नवी दिल्ली: काँग्रेसने शुक्रवारी सांगितले की, पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांना कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर श्वसनमार्गाच्या संसर्गावर आणि कोविड-19 नंतरच्या गुंतागुंतांवर उपचार सुरू ( Sonia Gandhi undergoes treatment ) आहेत. त्या डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहेत. पक्षाचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी सांगितले की, काँग्रेस अध्यक्षांच्या खालच्या श्वसनमार्गामध्ये 'फंगल इन्फेक्शन' ( Fungal infections of the respiratory tract ) आढळून आले आहे.
-
Congress President Sonia Gandhi is currently being treated for a fungal infection detected in her lower respiratory* tract, along with other post-COVID symptoms. She continues to be under close observation and treatment: Congress party issues a statement pic.twitter.com/YS1C4hw9j4
— ANI (@ANI) June 17, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Congress President Sonia Gandhi is currently being treated for a fungal infection detected in her lower respiratory* tract, along with other post-COVID symptoms. She continues to be under close observation and treatment: Congress party issues a statement pic.twitter.com/YS1C4hw9j4
— ANI (@ANI) June 17, 2022Congress President Sonia Gandhi is currently being treated for a fungal infection detected in her lower respiratory* tract, along with other post-COVID symptoms. She continues to be under close observation and treatment: Congress party issues a statement pic.twitter.com/YS1C4hw9j4
— ANI (@ANI) June 17, 2022
ते म्हणाले की, हा संसर्ग आणि कोविड-19 संसर्गानंतरची गुंतागुंत ( post-Covid symptoms ) लक्षात घेऊन त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. कोविड-19 नंतर झालेल्या गुंतागुंतीमुळे काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना 12 जून रोजी सर गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 2 जून रोजी सोनिया गांधी (75 वर्षीय) यांना कोरोना विषाणूची लागण झाल्याचे आढळून आले. नॅशनल हेराल्डशी संबंधित कथित मनी लाँड्रिंग प्रकरणात 23 जून रोजी चौकशीसाठी हजर राहण्यासाठी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) काँग्रेस अध्यक्षांना नवीन समन्स जारी केले आहेत.
सोनिया गांधी यांना यापूर्वी 8 जून रोजी हजर राहण्यास सांगण्यात आले होते, परंतु त्यांना कोरोना विषाणूची लागण झाल्यामुळे त्यांना तपास यंत्रणेसमोर हजर राहण्यासाठी नवीन तारीख देण्यास सांगण्यात आले.
ईडीला सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांचे जबाब नोंदवायचे- काँग्रेसशी संबंधित 'यंग इंडियन'मधील कथित आर्थिक अनियमिततेची चौकशी ईडी करत आहे. 'नॅशनल हेराल्ड' हे असोसिएटेड जर्नल्स लिमिटेड ( Associated Journals Limited ) द्वारे प्रकाशित केले जाते. ही कंपनी यंग इंडियन प्रायव्हेट लिमिटेडच्या मालकीची आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, एजन्सीला मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्याच्या (पीएमएलए) फौजदारी कलमांतर्गत सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांचे जबाब नोंदवायचे आहेत.