ETV Bharat / bharat

Sidharth Kiara Marriage : कियारा अन् सिद्धार्थचे लग्न! जुही चावलाही आपल्या पतीसह सूर्यगढ येथे पोहचली

बॉलीवुड कपल सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि कियारा अडवाणी 7 फेब्रुवारीला सूर्यगढ पॅलेसमध्ये लग्नबंधनात अडकणार आहेत. जैसलमेरमधील सूर्यगढ पॅलेस हॉटेलची सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. राजवाड्याभोवती शस्त्रांसह पहारेकरी तैनात करण्यात आले आहेत. सिड-कियाराने सुरक्षा व्यवस्था हाताळण्याची जबाबदारी तीन एजन्सींवर सोपवली आहे.

Sidharth Kiara Wedding Securit
सिड- कियाराच्या लग्नात दीडशेहून अधिक सुरक्षा रक्षक तैनात
author img

By

Published : Feb 6, 2023, 9:44 AM IST

Updated : Feb 6, 2023, 11:05 PM IST

जयपूर : कियारा अडवाणीचे वडील जगदीश अडवाणी यांची खास मैत्रीण आणि अभिनेत्री जुही चावला पतीसह चार्टर विमानाने जैसलमेर विमानतळावर पोहोचली आणि तेथून कारमधून हॉटेलकडे रवाना झाली आहे. यादरम्यान, जुही चावलाने विमानतळावर मीडियाशी संवाद साधताना सांगितले की - 'मी खूप आनंदी आहे आणि माझ्या वतीने कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा ​​यांना आनंदी होण्यासाठी आशीर्वाद देण्यासाठी मी येथे पोहोचले आहे.

अभिनेता शाहिद कपूर पत्नी मीरासोबत पोहचला : 6 फेब्रुवारीची रात्र ही कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा ​​यांची संगीत रात्र आहे. तो अविस्मरणीय क्षण बनवण्यासाठी ध्वनी प्रकाशाच्या सजावटीची जबरदस्त व्यवस्था करण्यात आली आहे. वधू-वर आणि पाहुण्यांसाठी खास फुलांची सजावट करण्यात आली आहे. अभिनेता शाहिद कपूर पत्नी मीरासोबत या म्युझिकलमध्ये परफॉर्म करणार आहे. याशिवाय करण जोहरचा एक परफॉर्मन्सही येथे होणार आहे. दरम्यान, उद्या (७ फेब्रुवारी)ला, कियारा आणि सिद्धार्थ सूर्यगड पॅलेसच्या बावडी नावाच्या सुंदर ठिकाणी सात फेरे घेणार आहेत.

हॉटेलमध्ये प्रवेश करणे जवळपास अशक्य : जैसलमेरच्या सूर्यगढ पॅलेस हॉटेलचे तीन सुरक्षा यंत्रणांचे सशस्त्र रक्षक किल्ल्याच्या अवतीभवती आहे. हे हॉटेल 65 एकरमध्ये असून त्यात अनेक बागा आहेत. सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि कियारा अडवाणी यांच्या लग्नाला ईशा अंबानीनेही हजेरी लावली आहे. हॉटेलमध्ये आणि आजूबाजूला कडक सुरक्षा आहे. सूर्यगड पॅलेसभोवती शस्त्रांसह रक्षक तैनात आहेत आणि मोबाइल फोन वापरण्यास मनाई आहे. तीन सुरक्षा यंत्रणा वापरण्यात आली आहेत. आमंत्रणाशिवाय हॉटेलमध्ये प्रवेश करणे जवळपास अशक्य आहे. दोघांच्या लग्नाचे फोटो लीक होऊ नयेत याकडे टीमचे संपूर्ण लक्ष आहे.

सुरक्षा रक्षकांची स्वतंत्र टीम : सिड-कियाराने सुरक्षा व्यवस्था हाताळण्याची जबाबदारी तीन एजन्सींवर सोपवली आहे. एक शाहरुख खानचा माजी अंगरक्षक यासिन खान चालवतो. या एजन्सीचे 100 हून अधिक रक्षक हॉटेलमध्ये तैनात करण्यात आले आहेत. लग्नाला येणाऱ्या सुमारे दीडशे पाहुण्यांच्या सुरक्षेची जबाबदारी त्यांच्यावर असेल. प्रत्येक गेस्ट रूमच्या बाहेर आणि हॉटेलच्या प्रत्येक कोपऱ्यावर रक्षक तैनात करण्यात आले आहेत. सिड-कियारा येण्यापूर्वी तिन्ही यंत्रणांच्या प्रमुखांनी सूर्यगढाची पाहणी केली होती. मुंबईहून 15 ते 20 सुरक्षा रक्षकांची स्वतंत्र टीम शनिवारी जैसलमेरला पोहोचली. त्याचबरोबर ईशा अंबानीच्या सुरक्षेसाठी 25 ते 30 अतिरिक्त रक्षकही तैनात आहेत. या सर्वांशिवाय हॉटेलच्या आजूबाजूला कोणत्याही वेळी गर्दी होणार नाही याची काळजी स्थानिक पोलिस घेत आहेत.

टॉप वेडिंग डेस्टिनेशन्स : रात्री सोन्यासारखा चमकणारा सूर्यगढ पॅलेस हा भारतातील टॉप वेडिंग डेस्टिनेशन्सपैकी एक आहे. आलिशान आणि प्रसन्न वातावरणामुळे या जोडप्याने सूर्यगड निवडला. सुमारे 10 किमी परिसरात लोकवस्ती नाही. सुमारे 65 एकरमध्ये बांधलेला हा महाल रात्री सोन्यासारखा चमकतो. या वाड्यात दोन मोठ्या हवेल्याही बांधल्या आहेत. संपूर्ण हॉटेलला राजपुतानाचा लुक देणार्‍या भिंतींवर उत्कृष्ट नक्षीकाम देखील दिसून येते. राजवाड्याच्या आजूबाजूला मोकळ्या जागा, उद्याने आणि लोककलाकार गाणी गाणारे आहेत. लक्झरीबद्दल बोलायचे तर, पॅलेसमध्ये 84 खोल्या, 92 बेडरूम, दोन मोठे गार्डन, एक कृत्रिम तलाव, जिम, बार, इनडोअर स्विमिंग पूल, पाच मोठे व्हिला, दोन मोठे रेस्टॉरंट्स, इनडोअर गेम्स, घोडेस्वारी, मिनी प्राणीसंग्रहालय आणि ऑर्गेनिक गार्डन आहे.

100 ते 150 लोक उपस्थित राहण्याची शक्यता : मिळालेल्या माहितीनुसार, लग्नात दीडशेहून अधिक सुरक्षा रक्षक तैनात आहेत. त्यांच्याकडे खास शस्त्रेही आहेत. चाहत्यांची गर्दी आणि पाहुण्यांच्या सुरक्षेसाठी हॉटेलबाहेर पोलिस जप्ताही तैनात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सलमान खानसह अनेक बॉलिवूड स्टार्स लग्नाला उपस्थित राहू शकतात. यासोबतच अमिताभ बच्चन, रोहित शेट्टीही लग्नासाठी जैसलमेरला पोहोचू शकतात. सिद्धार्थ आणि कियारा यांच्या लग्नाला जवळपास 100 ते 150 लोक उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

हेही वाचा : Grammy Award 2023 : अभिनेत्री व्हायोला डेव्हिसने तिच्या आत्मचरित्राच्या ऑडिओ बुकसाठी जिंकला ग्रॅमी अवॉर्ड

Last Updated : Feb 6, 2023, 11:05 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.