मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारांना सोबत घेत शिवसेनेत बंड केले. त्यावेळी ते सर्व आमदारांंना घेऊन सुरत आणि त्यानंतर ते गुवाहाटी गेले होते. त्यानंतर तीथेच असताना महाराष्ट्रातील सरकार पडले आणि पुढील घटना घडल्या. दरम्यानच्या काळाता या सर्व आमदारांना घेऊन शिंदे यांनी गुवाहाटी येथी कामाख्या देवीचे दर्शन घेतले होते. त्यानंतर ते अयोध्येलाही जाणार अशी चर्चा होती. दरम्यानच्या काळाता ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून विराजमान झाले आणि ही चर्चा मागे पडली होती. मात्र, शिंदे यांनी आपण सर्व अयोध्येला जाणार असल्याचे बोलत होते. फक्त तारीख जाही नव्हती. ती आता झाली असून अखेर ९ एप्रिला हा अयोध्या दौरा आयोजीत करण्यात आला आहे.
दौऱ्याचे नियोजन कसे असेल: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ९ एप्रिलला पहाटे ६ वाजता शरयू नदीच्या तीरावर पूजा, आरती करणार आहेत. त्यानंतर रामल्ला आणि हनुमानगढीचे दर्शन घेतील. यावेळी शिवसेनेचे सर्व आमदार, खासदार, सर्व नेते, पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. तसेच, यावेळी मोठे शक्तिप्रदर्शन केले जाणार आहे. दौऱ्यासाठी एक दिवस अगोदरच नेत्यांना मुंबईत हजर राहण्याचे निर्देशही दिले आहेत. तर, पदाधिकाऱ्यांना ७ एप्रिलला अयोध्येला निघण्याचे आदेश दिल्याचे समजते.
अयोध्या दौऱ्याकडे सर्वांचे लक्ष : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह सर्व आमदारांचा आम्हीच खरी शिवसेना असून, बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाचे विचार आम्ही पुढे नेत असल्याचा दावा केला आहे. या पार्श्वभूमीवर होणाऱ्या अयोध्या दौऱ्याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. अशातच, आगामी निवडणुका तोंडावर आल्या आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा अयोध्या दौरा कितपत फलदायी ठरणार हे पाहणे देखील महत्त्वाचे ठरणार आहे.
राज यांच्या अयोध्या दौऱ्याला कडाडून विरोध : मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी हिंदुत्वाचा मुद्दा उचलून धरल्यानंतर अयोध्या दौऱ्यावर जाणार असल्याची घोषणा केली. भाजप खासदार ब्रीजभूषण यांनी, राज यांच्या अयोध्या दौऱ्याला कडाडून विरोध केला. उत्तर भाषिक युवकांना मारहाणप्रकरणी जोपर्यंत बिहारमधील जनतेची राज ठाकरे माफी मागत नाही तोपर्यंत त्यांना अयोध्येत पाऊल ठेवून दिला जाणार नाही, असा इशारा ब्रिज भूषण यांनी दिला होता. राज ठाकरे यांना यामुळे हा दौरा गुंडाळावा लागला होता.
हेही वाचा : संजय राऊतांसह पवार आणि ठाकरेंना अपेक्षित ती ही तीच दंगल आहे का? - किरीट सोमैय्यांचा सवाल