गुरुग्राम - ज्येष्ठ काँग्रेस नेते आणि सोनिया गांधींचे माजी सल्लागार अहमद पटेल यांचे निधन झाले आहे. त्यांना ऑक्टोबर महिन्यात कोरोनाची लागण झाली होती. तेव्हापासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. उपचारादरम्यान बुधवारी (दि. 25 नोव्हेंबर) पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. अहमद पटेल यांचा मुलगा फैजल पटेल याने ट्विटरवरून याबाबत माहिती दिली आहे.
-
@ahmedpatel pic.twitter.com/7bboZbQ2A6
— Faisal Patel (@mfaisalpatel) November 24, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">@ahmedpatel pic.twitter.com/7bboZbQ2A6
— Faisal Patel (@mfaisalpatel) November 24, 2020@ahmedpatel pic.twitter.com/7bboZbQ2A6
— Faisal Patel (@mfaisalpatel) November 24, 2020
पटेल यांना 1 ऑक्टोबरला कोरोनाची लागण झाली होती. तेव्हापासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. मात्र, त्यांची तब्येत आणखी खालावली त्यानंतर ते उपचारास प्रतिसाद देत नव्हते. अखेर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
यानंतर त्यांचा मुलगा फैजल पटेलने याबाबत ट्वीट करत माहिती दिली. तसेच त्याने कोरोनापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी सर्व नियमांचे पालन करा, सामाजिक अंतराचे पालन करा, असे सर्वांना आवाहन केले आहे.
हेही वाचा - 'ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड'चे उपाध्यक्ष मौलाना कल्बे सादिक यांचे निधन