ETV Bharat / bharat

अफगाणिस्तानात बघा, काय झालं? मेहबुबा मुफ्तींचा केंद्राला थेट इशारा

author img

By

Published : Aug 21, 2021, 7:50 PM IST

पीडीपी नेत्या मेहबुबा मुफ्ती यांनी अफगाणिस्तानातील परिस्थितीचा हवाला देत केंद्र सरकारला थेट इशारा दिला आहे. जागतिक महासत्ता असलेल्या अमेरिकेलाही अफगाणिस्तानातून परत जावं लागलं, हे जरा बघा आणि तुमची चूक दुरूस्त करा. अन्यथा खूप उशीर होईल असे मेहबुबा मुफ्ती यांनी म्हटले आहे. त्यांच्या या विधानावरून आता नवे वादंग सुरू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

अफगाणिस्तानात बघा, काय झालं? मेहबुबा मुफ्तींचा केंद्राला थेट इशारा
अफगाणिस्तानात बघा, काय झालं? मेहबुबा मुफ्तींचा केंद्राला थेट इशारा

जम्मू : पीडीपी नेत्या मेहबुबा मुफ्ती यांनी अफगाणिस्तानातील परिस्थितीचा हवाला देत केंद्र सरकारला थेट इशारा दिला आहे. जागतिक महासत्ता असलेल्या अमेरिकेलाही अफगाणिस्तानातून परत जावं लागलं, हे जरा बघा आणि तुमची चूक दुरूस्त करा. अन्यथा खूप उशीर होईल असे मेहबुबा मुफ्ती यांनी म्हटले आहे. त्यांच्या या विधानावरून आता नवे वादंग सुरू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

सहनशक्तीचा अंत पाहू नका

कुणाच्याही सहनशक्तीचीही एक मर्यादा असते. जेव्हा या सहनशीलतेचा अंत होईल तेव्हा तुम्ही राहणार नाही. मी वारंवार म्हणत आहे आमची परीक्षा घेऊ नका, सुधारा. शेजारी बघा काय होत आहे. अमेरिकेसारख्या महाशक्तीला तिथून परत जावं लागलं असं मेहबुबा मुफ्ती काश्मीरच्या कुलगाममध्ये आयोजित एका कार्यक्रमात बोलताना म्हणाल्या. अटल बिहारी वाजपेयींनी जशी चर्चा सुरू केली होती, तसेच तुम्ही जम्मू-काश्मिरात चर्चा सुरू करा. जम्मू-काश्मीरची जी लूट केली. काश्मीरची प्रतिमा बिघडवली, ही चूक दुरूस्त करा. अन्यथा खूप उशीर होईल असे मेहबुबा मुफ्ती यावेळी म्हणाल्या.

रवींद्र रैनांची टीका

जम्मूतील भाजपचे नेते रवींद्र रैना यांनी मुफ्तींच्या या विधानावर टीका केली आहे. मुफ्तींचा मोठा गैरसमज झाला आहे. भारत एक शक्तिशाली देश आहे. जो बायडेन हे भारताचे पंतप्रधान नाही, शक्तिशाली नेते नरेंद्र मोदी भारताचे पंतप्रधान आहे. तालिबानचा बापही आला तरी ते भारताचं काहीही वाकडं करू शकणार नाही असे रैना यांनी म्हटले आहे.

भाजपकडून मुफ्तींना प्रत्युत्तर

हेही वाचा - राकेश अस्थाना हे मोदींचे ब्रम्हास्त्र..मनीष सिसोदिया यांनी पंतप्रधानांवर केला 'हा' गंभीर आरोप

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.