हैदराबाद seized 46 Kgs of Ganja - सिकंदराबाद रेल्वेस्थानकावर नियमित तपासणी करताना रेल्वे पोलिसांनी मोठी ड्रग्जची तस्करी उघडकीस आणली आहे. काल दुपारी २ च्या सुमारास पोलीस निरीक्षक डी. रमेश यांच्यासह त्यांचे सहकारी नियमित तपासणी करत होते. प्लॅटफॉर्म क्रमांक 6 वर सामान्य तपासणी करत असताना सिल्पा नाईक नावाच्या महिलेची तपासणी केली. त्यावेळी तिच्याकडे ४व संशयित बॅगा सापडल्या. तिच्या बॅगची तपासणी केली असता 23 पाकिटे सुक्या गांजाची आढळली. प्रत्येकी सुमारे 2 किलो असा एकूण 46 किलो गांजा तिच्याकडे सापडला. ही महिला ओडिशातील गजपती जिल्ह्यातील असल्याचं तपासात आढळून आलं आहे. ती हा गांजा मुंबईला नेत होती.
कशा आवळल्या मुसक्या - सिल्पाची चौकशी केली असता, तिनं सांगितलं की, तिचं 2016 साली लग्न झालं होतं. तिला 6 वर्षांचा मुलगा आहे. तिचा पती शरीफ यांचा 2018 मध्ये आजारपणामुळे मृत्यू झाला. तेव्हापासून ती आई-वडिलांसोबत राहते. तिच्या कुटुंबात तिचे आई-वडील वृद्धापकाळामुळे कोणतेही काम करत नाहीत. त्यामुळे तिने कुटुंबाला आर्थिक मदत करण्याचा निर्णय घेतला. पुढे, तिला राजीव नाईक यांच्या मार्फत कळले की मोहना वनक्षेत्रातून मुंबईला गांजा पुरवठा केल्यास ते अधिक पैसे कमवू शकतात. त्यानंतर ती राजीव नाईक सोबत मोहना वनपरिक्षेत्रात गेली आणि एका अज्ञाताकडून 46 किलो गांजा विकत घेतला. तेथे असलेल्या व्यक्तीने प्रत्येक बॅगेत 23 पॉकेट्स पॅक केले. त्याच दिवशी दोघेही गांजाच्या पिशव्या घेऊन पलासा रेल्वे स्थानकावर आले आणि स्वतंत्रपणे जनरल तिकीट काढून फलकनुमा एक्स्प्रेस ट्रेनच्या जनरल बोगीत रात्री चढले. काल ते सिकंदराबाद रेल्वे स्थानकावर पोहोचले आणि प्लॅटफॉर्म क्रमांक 6 वर उतरले. देवगिरी एक्स्प्रेस गाडीने मुंबईला जाण्यासाठी त्यांच्या नियोजनानुसार ते त्याच प्लॅटफॉर्मवर थांबले. दरम्यान राजीव नाईक तिला गांजाच्या पिशव्या देऊन प्लॅटफॉर्मवर सोडून जेवणासाठी बाहेर पडला. दुपारी २ वाजण्याच्या सुमारास त्यांनी तिला संशयास्पदरीत्या ताब्यात घेतले.
अभिनंदनास पात्र कामगिरी - या घटनेनंतर सिल्पा आणि फरार राजीव कुमार याचावर NDPS कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. तेलंगाणा राज्याचे रेल्वे आणि रस्ता सुरक्षा विभागाचे एडीजीपी महेश भागवत यांच्या सूचनेनुसार ही कारवाई करण्यात आली. सिकंदराबाद रेल्वे पोलीस अधीक्षक सलीमा शेख, तसंच पोलीस अधिकारी ए.नरसैया, एस.ए. इमॅन्युएल, यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली. के. नागेश्वर राव, श्रीनिवासुलू, आणि RPS सिकंदराबादच्या जी. रामय्या यांनी रेल्वे पोलिसांच्या समन्वयाने आरोपींना पकडले. GRP सिकंदराबादचे अधिकारी आणि पोलिसांचं कौतुक करुन, त्यांना योग्य बक्षीस देण्यात येईल असं भागवत यांनी सांगितलं.
हे वाचलत का...