नवी दिल्ली - देशात 12 ते 18 वर्ष वयोगटातील मुलांसाठी कोर्बेव्हॅक्स ( Corbevax Vaccine In India ) या लसीच्या आपत्कालीन वापरास मंजुरी देण्यात यावी, अशी शिफारस डीसीजीआयच्या कमेटीने दिली आहे. या लसीला मान्यता मिळाली तर 12 ते 18 वर्ष वयोगटातील मुलांच्या लसीकरणाचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता आहे.
-
SEC recommends COVID-19 vaccine Corbevax for 12-18 year age group: Sources
— ANI Digital (@ani_digital) February 14, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Read @ANI Story | https://t.co/NVoRfPHFj2#Corbevax #COVID19Vaccine pic.twitter.com/PHxnppeYyD
">SEC recommends COVID-19 vaccine Corbevax for 12-18 year age group: Sources
— ANI Digital (@ani_digital) February 14, 2022
Read @ANI Story | https://t.co/NVoRfPHFj2#Corbevax #COVID19Vaccine pic.twitter.com/PHxnppeYyDSEC recommends COVID-19 vaccine Corbevax for 12-18 year age group: Sources
— ANI Digital (@ani_digital) February 14, 2022
Read @ANI Story | https://t.co/NVoRfPHFj2#Corbevax #COVID19Vaccine pic.twitter.com/PHxnppeYyD
कॉर्बेवॅक्स ही लस हैदराबादच्या 'बायोलॉजिकल ई' (Biological E) कंपनीने बनवली आहे. ही लस आरबीडी प्रोटीन सब-युनिटवर आधारीत लस आहे. बायोलॉजिकल ईने काही दिवसांपूर्वीच 5-12 वर्षे आणि 12-18 वर्षे वयोगटासाठीच्या क्लिनिकल चाचण्या पूर्ण केल्या आहेत.
देशात 15 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांचे लसीकरण सुरू आहे. कोर्बेव्हॅक्स या लसीला मंजुरी मिळाल्यास 12 ते 15 वर्षे वयोगटातील मुलांच्या लसीकरणाचा मार्ग मोकळा होणार आहे.
हेही वाचा - Goa Election 2022 : गोव्यात मतदान शांततेत; पोस्टल मतांसह एकूण 78.94 टक्के मतदान