जम्मू (जम्मू आणि काश्मीर) : जम्मू - काश्मीरची व्हायरल गर्ल म्हणून प्रसिद्धीझोतात आलेली इयत्ता तिसरीची विद्यार्थिनी सीरत नाजने पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानले आहे. जम्मू काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यातील विद्यार्थिनी सीरत नाजने एका व्हिडिओ संदेशाद्वारे पंतप्रधान मोदींना तिच्या शाळेच्या वाईट परिस्थिती बाबत सांगितले होते. त्यानंतर जम्मू आणि काश्मीर प्रशासनाने आता तिच्या शाळेचे नुतनीकरण करण्यास सुरुवात केली आहे.
प्रशासन अॅक्शन मोडमध्ये : इयत्ता तिसरीच्या विद्यार्थिनी सीरत नाजचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर जम्मू - काश्मीर प्रशासनाने त्यावर लगेच अॅक्शन घेतली. शिक्षण विभागाचे संचालक रविशंकर शर्मा यांनी स्वत: कठुआ जिल्ह्यातील लोहाई मल्हार शाळेला भेट देऊन शाळेच्या कायापालटाबाबत स्थानिक अधिकाऱ्यांना निर्देश दिले. शाळेच्या नूतनीकरणासाठी 91 लाखांचा प्रकल्प मंजूर झाला होता, मात्र प्रशासनाकडून मंजुरी न मिळाल्याने काम रखडले होते, असे शर्मा यांनी सांगितले.
भाजपने ट्विट करत दिली माहिती : भारतीय जनता पक्षाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून एक पोस्ट करण्यात आली आहे. या पोस्टमध्ये असे म्हटले आहे की, 'जम्मू काश्मीरमधील कठुआच्या लोहिया मल्हार गावातील सरकारी शाळेतील विद्यार्थिनी सीरत नाजने पंतप्रधान मोदींना शाळेच्या वाईट परिस्थितीबद्दल माहिती देऊन शाळेत सुधारणा करण्याची विनंती केली होती. आता तिच्या विनंतीवरून शाळेची स्थिती सुधारत आहे'.
-
कठुआ जिले के लोहिया मल्हार गांव में स्थित सरकारी स्कूल की छात्रा सीरत नाज़ ने पीएम मोदी से गुज़ारिश की थी कि उनके स्कूल को बेहतर कर दें।
— BJP (@BJP4India) April 20, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
बच्ची की अपील ने पीएम मोदी को प्रभावित किया और सीरत के स्कूल में अब व्यवस्थाएं बेहतर हो रही हैं। pic.twitter.com/YO5II4Tg1B
">कठुआ जिले के लोहिया मल्हार गांव में स्थित सरकारी स्कूल की छात्रा सीरत नाज़ ने पीएम मोदी से गुज़ारिश की थी कि उनके स्कूल को बेहतर कर दें।
— BJP (@BJP4India) April 20, 2023
बच्ची की अपील ने पीएम मोदी को प्रभावित किया और सीरत के स्कूल में अब व्यवस्थाएं बेहतर हो रही हैं। pic.twitter.com/YO5II4Tg1Bकठुआ जिले के लोहिया मल्हार गांव में स्थित सरकारी स्कूल की छात्रा सीरत नाज़ ने पीएम मोदी से गुज़ारिश की थी कि उनके स्कूल को बेहतर कर दें।
— BJP (@BJP4India) April 20, 2023
बच्ची की अपील ने पीएम मोदी को प्रभावित किया और सीरत के स्कूल में अब व्यवस्थाएं बेहतर हो रही हैं। pic.twitter.com/YO5II4Tg1B
सीरत नाझचे पंतप्रधान मोदींना भावनिक आवाहन : सीरत नाझने 4 मिनिटांच्या व्हिडिओमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींना भावनिक आवाहन केले होते. ती तिच्या व्हिडिओमध्ये म्हणाली की, तुम्ही पंतप्रधान म्हणून सर्वांचे ऐकता. आज माझेही ऐका. नाजने व्हिडीओच्या माध्यमातून आपल्या शाळेतील मूलभूत सुविधांचा उल्लेख केला होता. तसेच जमिनीवर बसावे लागत असल्यामुळे शाळेचा ड्रेस खराब होतो असेही म्हटले होते. या सोबतच तीने शाळेतील स्वच्छतागृहांची दुर्दशाही सांगितली होती.