लखनऊ Sarsanghchalak Mohan Bhagwat : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत उत्तरप्रदेशच्या दौऱ्यावर जात आहेत. सरसंघचालक मोहन भागवत लखनऊमध्ये तीन दिवसांच्या दौऱ्यावर जाणार आहेत. राष्ट्रीय स्वयं सेवक संघाचा विस्तार, राष्ट्रवाद आदी महत्त्वाच्या विषयांवर सरसंघचालक मोहन भागवत संघ कार्यकर्त्यांशी चर्चा करणार आहेत. मात्र लोकसभा निवडणुकीच्या अगोदर संरसंघचालक मोहन भागवत यांचा हा दौरा होत असल्यानं त्यांच्या दौऱ्याला महत्व प्राप्त झालं आहे.
![Sarsanghchalak Mohan Bhagwat](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/22-09-2023/19576096_ni.jpg)
राम मंदिराच्या उद्घाटन कार्यक्रमावर होणार चर्चा : सरसंघचालक मोहन भागवत यांचा लखनऊ दौरा लोकसभेच्या पार्श्वभूमीवर महत्वाचा मानला जात आहे. आपल्या लखनऊ दौऱ्यात सरसंघचालक स्वयं सेवकांची भेट घेऊन त्यांच्या कामाचा आढावा घेणार आहेत. यावेळी भविष्यातील रणनीती तयार करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.राष्ट्रीय स्वयं सेवक संघाच्या शताब्दी वर्षात संघाचे विचार प्रत्येक गावापर्यंत पोहोचवण्याची रणनीती आखली जात आहे. जानेवारी महिन्यात राम मंदिराच्या उद्घाटन कार्यक्रमांवरही या बैठकीत विचारमंथन होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
![Sarsanghchalak Mohan Bhagwat](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/22-09-2023/19576096_ni111.jpg)
भविष्यातील कार्यक्रमांची ठरविण्यात आली रणनीती : सरसंघचालक मोहन भागवत यांचं लखनऊ इथं आगमन होण्यापूर्वीच सरकार्यवाह अरुण कुमार यांनी 19 सप्टेंबरला समन्वय बैठक आयोजित केली होती. या बैठकीत सरसंघचालक मोहन भागवत यांच्या कार्यक्रमाची रुपरेषा ठरवण्यात आली. यावेळी भविष्यातील कार्यक्रमांची रणनीती ठरविण्यात आली. भाजपचे प्रदेशाध्यक्ष भूपेंद्र सिंह चौधरी, राज्य संघटन मंत्री धरमपाल सिंह, उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य आणि उपमुख्यमंत्री ब्रिजेश पाठक यांनीही या बैठकीत भाग घेतला. त्यमुळे राष्ट्रीय स्वयं सेवक संघाच्या या बैठकीत 2024 च्या लोकसभा निवडणुकीची रणनीती ठरवण्यात येणार असल्याची चर्चा आता रंगत आहे.
असा असेल सरसंघचालकांचा लखनऊ दौरा : सरसंघचालक मोहन भागवत हे शनिवारी सकाळी निराला नगर इथल्या सरस्वती शिशु मंदिर इथून आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करणार आहेत. त्यानंतर आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत सरसंघचालक मोहन भागवत हे राष्ट्रवाद, संघ विस्तार आणि हिंदुत्ववाद या मुद्द्यांवर संघाच्या स्वयं सेवकांना मार्गदर्शन करतील. राष्ट्रीय स्वयं सेवक संघाच्या अवध प्रांतात 13 प्रशास्कीय जिल्हे, 26 केंद्रीय जिल्हे, 174 ब्लॉक, 1819 विभाग आहेत. यात राष्ट्रीय स्वयं सेवक संगाच्या 1765 ग्रामीण भागात शाखा आहेत, तर 442 शहरी भागात शाखा कार्यरत आहेत.
हेही वाचा :