पाटणा (बिहार) : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा बिहार दौरा आजपासून सुरू झाला आहे. पाटणा विमानतळावर त्यांच्या स्वागतासाठी भाजप नेते आणि कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. अमित शाह आज पाटण्यात रात्रीची विश्रांती घेणार आहेत. दरम्यान, उद्या ते रविवारी नवादा येथे कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी रवाना होतील. कायदा आणि सुव्यवस्थेच्या प्रश्नामुळे त्यांची सासारामची भेट आधीच रद्द करण्यात आली आहे.
अमित शहांची सासारामची दौरा रद्द : सम्राट चौधरी म्हणाले की, अमित शहांचा कार्यक्रम ज्या ठिकाणी होणार होता त्या ठिकाणी कलम 144 लागू करण्यात आली आहे. अमित शहा या कार्यक्रमाला उपस्थित राहणार होते. परंतु, अमित शाह तरी पाटण्याला येत आहेत. ते नवाडा येथील कार्यक्रमाला उपस्थिती लावणार आहेत. सध्या आमच्या लोकांना सुरक्षा मिळत नाही, त्यांच्यावर हल्ले होत आहेत. तसेच, आमच्या कार्यक्रमालाही सुरक्षा मिळताना दिसत नाही. आणि आमचे काही कार्यक्रम असले तर तेव्हा सरकार 144 लावणार मग आम्ही कार्यक्रम कसे करणार? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.
नवाडा येथे कार्यक्रम होणार : आम्ही मुख्यमंत्री नितीश कुमार यांना स्पष्टपणे सांगातो की सम्राट अशोक आमचे होते, आहेत आणि राहतील. बिहारमध्ये आपण सम्राट अशोकाची स्थापना केली आहे, हेही त्यांना माहीत नसावे असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला आहे. 2015 पूर्वी नितीश यांनी बिहारमध्ये सम्राट अशोकासाठी कोणतेही काम केलेले नाही. मी त्यांना खुले आव्हान देतो. ते 2016 मध्ये जागा झाले. त्यापूर्वी आम्ही अशोकाची स्थापना केली होती. म्हणूनच आज अत्यंत दुःखाने सांगावे लागत आहे की, सम्राट अशोकाच्या जयंती दिनाचा कार्यक्रम आम्ही रद्द करत आहोत. अमित शहा यांचा नवाडा येथे कार्यक्रम असेल, तेथे 144 नाही. असही त्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.
सासाराममध्ये झाला होता गोंधळ : नुकत्याच पार पडलेल्या रामनवमीला सासाराममध्ये दोन गट एकमेकांशी भिडले होते. दोन्ही बाजूंनी जोरदार दगडफेक झाली. यावेळी हल्लेखोरांनी अनेक वाहनांना आग लावली आणि दुकानांसह दोन घरेही जाळली. शुक्रवारपासून पोलीस येथे तळ ठोकून असून शहरात कलम 144 लागू करण्यात आले आहे.
हेही वाचा : Naxal Attack Dantewada : दंतेवाड्यात नक्षलवाद्यांनी प्रवासी बस पेटवली, जीवितहानी नाही