कुल्लू (हिमाचल प्रदेश) Russian Citizen Dead Body : हिमाचल प्रदेशातील कुल्लूमध्ये एक अत्यंत धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. जिल्ह्यातील मणिकर्णजवळ गुरुवारी (१६ नोव्हेंबर) संध्याकाळी एका तरुण आणि तरुणीचा विवस्त्र मृतदेह तलावात सापडला. स्थानिक लोकांनी याची माहिती दिल्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी दोन्ही मृतदेह तलावातून बाहेर काढले. मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आले आहेत. या प्रकरणाचा तपास केल्यानंतर हे दोघंही रशियन नागरिक असल्याचं समोर आलं. पोलिसांनी रशियन दूतावासाला याबाबत माहिती दिली आहे.
हत्या की आत्महत्या : १६ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ही घटना घडली. कुल्लूचे एएसपी संजीव चौहान घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला. कुल्लू पोलिसांनी मृत तरुण आणि तरुणीचं सामान जप्त केलं आहे. त्यांच्याकडे सापडलेल्या कागदपत्रांच्या आधारे ते रशियन नागरिक असल्याचं समोर आलं. या दोघांनी आत्महत्या केली, की त्यांची हत्या करण्यात आली आहे, हे अद्याप समजू शकलेलं नाही. कुल्लू पोलिसांचं पथक या प्रकरणाचा तपास करत आहे.
पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत. हे प्रकरण आत्महत्येचं असल्याचं दिसतं. पोलिसांचं याकडे विशेष लक्ष आहे. रशियन दूतावासालाही याबाबत माहिती देण्यात आली आहे. - संजीव चौहान, एएसपी कुल्लू
अंगावर जखमेच्या खुणा : पोलीस तपासात या दोघांच्याही अंगावर जखमेच्या खुणा आढळून आल्या. तेगडी येथील ज्या गरम पाण्याच्या तलावात हे मृतदेह आढळून आले, ती एक प्रसिद्ध कॅम्पिंग साईट आहे. मात्र आजकाल तिथलं कॅम्पिंग बंद आहे. अशा परिस्थितीत, हे दोन रशियन नागरिक तिथे कसे पोहोचले आणि ही घटना कशी घडली, याचा तपास कुल्लू पोलीस करत आहेत.
हेही वाचा :