मुंबई : आज दिवसभरात कोठे काय असणार, आजच्या महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेऊया या माध्यमातून. देशभरासह राज्यातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा वाचा एका क्लिकवर. (Read Top News Today )
- संजय राऊतांच्या जामिनावरील स्थगितीच्या याचिकेवर आज उच्च न्यायालयात सुनावणी ( Sanjay Raut ) : तब्बल 100 दिवसानंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांची बुधुवारी (9 नोव्हेंबर) तुरुंगातून सुटका झाली. मात्र, या जामिनाला ईडीचा (ED) विरोध कायम आहे. या विरोधात ईडीने उच्च न्यायालयात अपिल केलं आहे. त्यावर न्यायालयात आज सुनावणी होणार आहे. दरम्यान, पत्राचाळ प्रकरणात संजय राऊत यांची अटक बेकायदेशीर असल्याचे सांगत पीएमएलए कोर्टानं ईडीच्या तपासावर प्रश्न उपस्थित केले आहे. दिवाणी खटल्यासाठी पीएमएलए कायदा लागू केला असल्याचे ताशेरे कोर्टाने ओढले आहेत. ( Hearing on Sanjay Raut's bail plea in High Court today )
- भारत जोडो यात्रेचा आज राज्यात चौथा दिवस ( Bharat Jodo Yatra ) : राहुल गांधींनी सुरू केलेल्या पदयात्रेचा आज 64 वा आणि महाराष्ट्रातला आज चौथा दिवस आहे. सकाळी 6 वाजल्यापासून राहुल गांधी पदयात्रेला नांदेडच्या लोहा येथून सुरूवात करतील. दुपारी 4 वाजता देगलूर नाका येथून पुन्हा पदयात्रेला सुरूवात होईल. संध्याकाळी 6 वाजता न्यू मुंडा मैदान येथे राहुल गांधीची सभा होणार आहे. राष्ट्रवादीचे जयंत पाटील, सुप्रिया सुळे, जितेंद्र आव्हाड आणि रोहित पवार आज यात्रेत सहभागी होणार आहेत.
- स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत आज सुप्रीम कोर्टात सुनावणी ( Supreme Court ): राज्यातील 92 नगरपरिषदांमध्येसुद्धा ओबीसी राजकीय आरक्षण लागू होणार का? महानगरपालिकामधल्या प्रभाग पद्धतीच्या बदलांना मान्यता मिळणार का? या बाबतच्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रलंबित निवडणुका नेमक्या कधी होणार याचे भवितव्य या सुनावणीवर अवलंबून आहे. या प्रकरणाची सुनावणी आज नवे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या पीठासमोर 21 व्या क्रमांकावर होणार आहे. ( Hearing in the Supreme Court today regarding the election of local bodies )
- भारत- इंग्लंड सेमिफायनल सामना ( India-England semi-final match ) : टी 20 विश्व चषकातला आज दुसरा सेमी फायनल सामना भारत आणि इग्लंड दरम्यान होणार आहे. आज जर भारत जिंकला तर विश्व चषकाच्या अंतिम फेरीत भारत पोहोचणार असून त्याचा सामना पाकिस्तानसोबत होणार आहे.
- जागितक विज्ञान दिवस (World Science Day ) : 10 नोव्हेंबर हा दिवस जगभरात जागतिक विज्ञान दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. सयुंक्त राष्ट्र संघाने 2002 मध्ये हा दिवस 'जागतिक विज्ञान दिवस' म्हणून घोषित केला होता. सामान्य जनमानसात विज्ञानाबद्दल जागृती वाढावी, विज्ञानाचा शांततेसाठी आणि विकासासाठी वापर व्हावा यासाठी हा दिवस साजरा करण्यात येतो. दरम्यान, भारतामध्ये 28 फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय विज्ञान दिवस म्हणून सारजा केला जातो. प्रसिद्ध वैज्ञानिक डॉ. सिव्ही रमन यांनी आपले शोध 1928 जगापुढे मांडले होते. म्हणून त्या निमित्ताने 28 फेब्रुवारीला भारतात राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा केला जातो.