ETV Bharat / bharat

Story of Padala Rupadevi : रामोजी राव आले धावून! दिव्यांग बॅडमिंटनपटूला केली 3 लाखांची मदत

आंध्र प्रदेशातील श्रीकाकुलम जिल्ह्यातील पडाला रूपा देवी हिने वयाच्या २३ व्या वर्षी पॅरा बॅडमिंटन स्पर्धांमध्ये अनेक पदके जिंकली आहेत. आता तीची नजर मे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात थायलंडमध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय पॅरा बॅडमिंटन स्पर्धेवर आहे. ज्याच्या तयारीसाठी तीला पैशांची गरज होती. अशा परिस्थितीत रामोजी राव ग्रुपचे चेअरमन रामोजी राव रुपाला मदत करण्यासाठी पुढे आले. त्यांनी रूपाला तीन लाख रुपयांची आर्थिक मदत दिली आहे.

Story of Padala Rupadevi
Story of Padala Rupadevi
author img

By

Published : Apr 29, 2023, 10:01 PM IST

श्रीकाकुलम (आंध्र प्रदेश): शारीरिक आणि आर्थिक अडचणी असूनही, आंध्र प्रदेशातील श्रीकाकुलम जिल्ह्यातील पडाला रूपा देवी देशाच्या विविध भागात आयोजित पॅरा बॅडमिंटन स्पर्धांमध्ये आपली प्रतिभा सिद्ध करत आहे. 2019 मध्ये वयाच्या 19 व्या वर्षी, 2019 मध्ये तिच्या नातेवाईकांच्या घराच्या दुसऱ्या मजल्यावरून ती पडली. त्यानंतर तीची पायाची हालचाल बंद झाली आहे. परंतु, तीची जिद्ध कायम आहे. लहानपणापासूनच हुशार विद्यार्थिनी असलेल्या रूपाने यानंतरही बॅडमिंटनची आवड कायम ठेवली आहे. तसेच, त्यामध्ये तीने नवेनवे शिखर गाठली आहेत. दरम्यान, आतापर्यंत तीच्याकडे एकेरी (व्हीलचेअर प्रकारात) सुवर्ण आणि एक रौप्य (दुहेरी) अशी एकूण चार पदके आहेत. लखनौ येथील डॉ. शकुंतला मिश्रा राष्ट्रीय पुनर्वसन विद्यापीठात २३ ते २६ मार्च दरम्यान झालेल्या ५व्या राष्ट्रीय पॅरा-बॅडमिंटन स्पर्धेत तीने हे सुवर्णपदक जिंकले. यापूर्वी त्याने विशाखापट्टणम येथे झालेल्या राज्यस्तरीय पॅरा-बॅडमिंटन स्पर्धेत दोन सुवर्णपदके जिंकली होती.

म्हैसूरमध्ये प्रशिक्षण : आई यशोदा यांच्या पाठिंब्याने ती म्हैसूरमध्ये प्रशिक्षण घेत आहे. रुपा म्हणाली की मी बेडवर बंदिस्त होते. माझ्यावर उपचार करण्यासाठी माझी आई विजयवाडा, श्रीकाकुलम, बंगलोर आणि वेल्लोर येथील अनेक हॉस्पिटलमध्ये गेली. शेवटी, वेल्लोर येथील ख्रिश्चन मेडिकल कॉलेजमधील डॉक्टरांनी मला माझे जीवन स्वतंत्रपणे जगण्यासाठी व्हीलचेअर वापरण्याचे प्रशिक्षण दिले.

आंतरराष्ट्रीय पॅरा बॅडमिंटन स्पर्धेवर लक्ष : यावर बोलताना रुपा म्हणाली की, माझ्या आईने मला शिक्षण देण्यासाठी आणि माझी स्वप्ने पूर्ण करण्यासाठी खूप कष्ट केले. ती म्हणाला की मी यूट्यूबवर व्हीलचेअरचे काही तंत्र शिकले आणि माझ्या मित्रांच्या मदतीने 2021 मध्ये बेंगळुरू येथे होणाऱ्या स्टेट ओपन पॅरा-बॅडमिंटन स्पर्धेत भाग घेतला. या 23 वर्षीय मुलीने ऑगस्ट 2022 मध्ये बेंगळुरू येथे झालेल्या पॅरा बॅडमिंटन राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेतही सुवर्णपदक जिंकले आहे. आता माझे लक्ष मे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात थायलंडमध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय पॅरा बॅडमिंटन स्पर्धेवर आहे असही ती म्हणाली आहे.

रामोजी राव यांनी केली मदत : काही दिवसांपूर्वी रुपा यांच्याकडे स्पर्धांमध्ये भाग घेण्यासाठी पैसे नव्हते. त्यानंतर काही हितचिंतकांनी त्यांना नवी दिल्ली आणि म्हैसूरसह विविध ठिकाणी प्रवास आणि प्रशिक्षणासाठी आवश्यक रक्कम दिली. मात्र, रूपाला तिची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी आणखी पैशांची गरज आहे. याबद्दल रोमोजी राव ग्रुपचे चेअरमन रामोजी राव यांना ही गोष्ट माहिती झाली. त्यानंतर त्यांनी रुपाला तीन लाख रुपयांची देणगी दिली आहे. रूपाला भारतीय क्रीडा प्राधिकरणाकडून (SAAP) ३ लाख रुपये मिळणार आहेत, ज्याचे वाटप अद्याप मिळालेले नाही. यासोबतच रोमोजी राव ग्रुपचे चेअरमन रामोजी राव यांनी रूपाला तीन लाख रुपयांची देणगी दिली आहे त्यामळे तीचा प्रवास सुखर झाला आहे.

तुम्हाला मदत करताना अभिमान वाटतो : ईटीव्ही भारतमध्ये तुमच्या इच्छाशक्ती विषयी आणि प्रकृतीची बातमी पाहून वाईट वाटले असे म्हणत रामोजी राव यांनी थायलंडला जाण्यासाठी लागणारे 3 लाख रुपये त्यांनी तातडीने दिले आगेच. तसेच, दोन्ही पाय गमावल्यानंतरही प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर पॅरा-बॅडमिंटनच्या क्षेत्रात पुढे जाणाऱ्या रुपादेवीला आशीर्वाद देणारे पत्र त्यांनी लिहिले आहे. रामोजी रावांनी पत्रात लिहिले आहे की, ज्यांना असे वाटते की आपण काहीही करू शकत नाही त्यांच्यासाठी ही कथा डोळे उघडवणारी आहे. एकीकडे क्रीडा क्षेत्रातील तुझी उत्कृष्ठ कामगिरी आणि नंतर पुढे अभ्यास सुरू ठेवण्याची तुझी महत्त्वाकांक्षा यामुळे माझ्यात नवा उत्साह संचारला आहे असही रामोजी राव म्हणाले आहेत. तसेच, थायलंडमध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय पॅरा-बॅडमिंटन स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी मी आपल्याला 3 लाख रुपयांची मदत देत आहे. तुमच्यासारख्या धाडसी स्त्रीला मदतीचा हात पुढे करताना मला अभिमान वाटतो असही ते म्हणाले आहेत.

हेही वाचा : CM Kejriwal Meet Wrestlers: केजरीवाल कुस्तीपटूंना भेटले! म्हणाले, भाजप बलात्काऱ्यांना का वाचवतय?

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.