नवी दिल्ली - दरवर्षी दिल्लीत राजपथावर प्रजासत्ताक दिनानिमित्त खास परेडचं आयोजन करण्यात येतं. 2021 प्रजासत्ताक दिनानिम्मित्त राजपथावरील परेड कार्यक्रमात उत्तर प्रदेशच्या चित्ररथामध्ये अयोध्या राम मंदिर दाखवण्यात येणार आहे. तसेच श्री राम यांच्या संबधित काही कथाही दाखवण्यात येणार आहेत.
दिल्लीत राजपथावरील परेडमध्ये दरवर्षी निवडक राज्यांच्या चित्ररथांना पथसंचलनाची संधी मिळते. कला, संस्कृती, चित्रकला, शिल्पकला, संगीत, स्थापत्यकला, नृत्याचे चित्ररथाद्वारे सादरीकरण केले जाते. यंदा उत्तर प्रदेशच्या चित्ररथामध्ये अयोध्या राम मंदिर आणि दीपोत्सव परंपरेची झलक पाहायला मिळणार आहे.
ऐतिहासिक राम मंदिर -
भगवान श्री राम मंदिर अयोध्येत बांधले जावे, यासाठी जगातील ऐतिहासिक मंदिर बनविण्यासाठी एक विशेष कृती योजना तयार केली आहे. या मंदिराच्या रचनेपासून ते पाया घालण्यापर्यंत सर्व बाबींमध्ये हे मंदिर शेकडो नव्हे तर, हजारो वर्षे हवामान आणि नैसर्गिक आपत्तींचा सामना करू शकेल, अशा मजबुतीकडे विशेष लक्ष दिले गेले आहे. तसेच, विशेष सौंदर्यासह बांधण्यात येत असलेले हे राम मंदिर श्रद्धा आणि पर्यटनाचे केंद्र बननार आहे.
हेही वाचा - राम मंदिर भूमिपूजन म्हणजे 'ऐतिहासिक सुवर्णक्षण'!