ETV Bharat / bharat

इंदिरा गांधींचा आणीबाणी लागू करण्याचा निर्णय चुकीचा - राहुल गांधी - देशातील आणीबाणी

देशात माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा देशात आणीबाणी लागू करण्याचा निर्णय चुकीचा होता आणि माझ्या आजीने (इंदिरा गांधी) हे मान्य केले होते. मात्र, काँग्रेसने कधीही भारताची घटनात्मक संरचना काबीज करण्याचा प्रयत्न केला नाही, असे राहुल गांधी यांनी म्हटलं.

राहुल गांधी
राहुल गांधी
author img

By

Published : Mar 3, 2021, 7:43 AM IST

नवी दिल्ली - देशात माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी 1975 ते 1977 म्हणजेच 21 महिने आणीबाणी लागू केली होती. हा आणीबाणीचा निर्णय चुकीचा होता. आणि त्या काळात जे घडले. ते चुकीचेच होते, असे इंदिरा गांधी यांचे नातू आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. त्या काळात जे झालं आणि आज देशात जे होतंय, या दोन्हीत फरक असल्याची त्यांनी म्हटलं. कॉर्नेल विद्यापीठाच्या आयोजित कार्यक्रमात प्रख्यात अर्थशास्त्रज्ञ कौशिक बासु यांच्याशी बोलत होते.

राहुल गांधी यांची प्रख्यात अर्थशास्त्रज्ञ कौशिक बासु यांच्याशी चर्चा

आणीबाणी काळामध्ये घटनात्मक हक्क आणि नागरी स्वातंत्र्य निलंबित केले गेले होते. तसेच प्रसारमाध्यमांच्या अधिकारांवर गदा आणली होती आणि राजकीय विरोधकांना तुरूंगात टाकण्यात आले होते. मात्र, ती परिस्थिती सध्याच्या परिस्थितीपेक्षा भिन्न आहे, असेही राहुल गांधी म्हणाले.

मला वाटते की ती एक चूक होती आणि माझ्या आजीने (इंदिरा गांधी) हे मान्य केले होते. मात्र, काँग्रेसने कधीही भारताची घटनात्मक संरचना काबीज करण्याचा प्रयत्न केला नाही. अगदी स्पष्टपणे सांगायचे झाले, तर काँग्रेस पक्षाची रचना ते करण्याची परवानगी देत नाही, असं राहुल गांधी म्हणाले.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ देशातील संस्थामध्ये आपल्या लोकांची भरती करत आहे. भाजपाला निवडणुकीमध्ये पराभूत केले. तरी आपण त्या लोकांपासून मुक्त होऊ शकत नाही, असे राहुल गांधी म्हणाले. तसेच त्यांनी मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांच्यासोबतची एक आठवण सांगितली. मध्य प्रदेश सरकारचे वरिष्ठ अधिकारी त्यांचे म्हणणे ऐकत नव्हते. कारण, ते आरएसएसचे होते. त्यामुळे सध्या जे काही घडत आहे. ते पूर्ण वेगळे आहे, असे ते म्हणाले.

आणीबाणीवरून शाह यांची टीका -

काही दिवसांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ट्वीट करून आणीबाणीवरून काँग्रेस पक्षावर जोरदार प्रहार केला होता. 45 वर्षांपूर्वी सत्तेसाठी एका कुटुंबाने देशावर आणीबाणी लादली. एका रात्रीत देशाला कारागृहमध्ये बदलून टाकले. पत्रकार परिषद, न्यायालय, व्याख्याने सर्व प्रकारच्या गोष्टी थांबल्या. गरिब आणि दलितांवर अत्याचार करण्यात आले. त्यानंतर लाखो लोकांच्या प्रयत्नांमुळे ही आणीबाणी उठवण्यात आली. देशाला पुन्हा लोकशाही मिळाली. काँग्रेसने लावलेली आणीबाणी केवळ एका परिवाराच्या फायद्यासाठी होती. आजही काँग्रेस तसेच वागत आहे, असे ते म्हणाले होते.

भारतातील आणीबाणी -

देशाच्या इतिहासामध्ये 25 जून हा दिवस वादग्रस्त घडामोडींमुळे चर्चिला जातो. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी 25 जून 1975 ला भारतामध्ये आणीबाणी लागू केली होती. भारताच्या इतिहासातील सर्वात काळ्या दिवसांमध्ये या घटनेची गणना होते. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी रातोरात न्यायालयाचा आदेश धुडकावून राष्ट्रपती फखरुद्दीन अली अहमद यांच्यामार्फत आणीबाणीची घोषणा केली. भारतीय संविधाच्या कलम 352(1)नुसार लागू झालेली ही आणीबाणी 21 महिने चालली. अखेर 21 मार्च 1977 रोजी त्याची समाप्ती झाली होती.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.