ETV Bharat / bharat

Air Asia Flight Emergency Landing : पुण्याकडे जाणाऱ्या विमानाला धडकला पक्षी, भुवनेश्वरमध्ये इमर्जन्सी लँडिंग! - भुवनेश्वरमध्ये विमानाचे इमर्जन्सी लँडिंग

पुण्याकडे जाणार्‍या एका विमानाचे भुवनेश्वर विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. उड्डाणानंतर या विमानाला पक्षाने धडक दिली होती. झालेल्या नुकसानाची पाहणी केल्यानंतर विमानाला उड्डाणासाठी परवानगी देण्यात आली.

Air Asia Flight
एअर एशिया विमान
author img

By

Published : Mar 3, 2023, 7:19 AM IST

भुवनेश्वर (ओडिशा) : पुण्याला जात असलेल्या एअर एशियाच्या विमानाला पक्षी धडकल्याने विमानाचे भुवनेश्वरच्या बिजू पटनायक आंतरराष्ट्रीय विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करावे लागले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भुवनेश्वरहून उड्डाण घेतल्यानंतर लगेचच तांत्रिक बिघाडाचे कारण देत विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. या घटनेनंतर विमानातील सर्व प्रवासी सुखरूप असल्याचे सूत्रांनी सांगितले.

सर्व प्रवासी सुरक्षित : विमानाच्या इमर्जन्सी लँडिंगनंतर लगेचच झालेल्या नुकसानीचे मूल्यांकन करण्यात आले. नंतर कसून चौकशी केल्यानंतर विमानाला उड्डाणासाठी परवानगी देण्यात आली. विमानतळ प्राधिकरणाने सांगितले की, 'पुण्याकडे जाणार्‍या एअर एशियाच्या विमानाचे पक्षी धडकण्याच्या घटनेनंतर लगेचच भुवनेश्वरच्या बिजू पटनायक आंतरराष्ट्रीय विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. विमानाचे मूल्यांकन केले जात असून, सर्व प्रवासी सुरक्षित आहेत'. एअर एशियाने सांगितले की, 'भुवनेश्वरहून पुण्याला जाणाऱ्या विमानाला टेक-ऑफनंतर पक्ष्याने धडक दिली. विमानाच्या सविस्तर तपासणीसाठी ते भुवनेश्वरला परतले. आम्ही प्रवाशांची काळजी घेत आहोत आणि इतर नियोजित ऑपरेशन्सवर होणारा परिणाम कमी करण्यासाठी पावले उचलत आहोत.'

नागपूरात एका विमानाचे इमर्जन्सी लँडिंग : बुधवारी अशाच एका घटनेत मस्कतला जाणाऱ्या सलामेअर विमानाचे रात्री उशिरा नागपूर विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. पायलटला इंजिनमधून धूर निघत असल्याचे आढळून आल्यावर त्याने हवाई वाहतूक नियंत्रणाला इशारा दिला. त्यांनी त्याला नागपूरला जाण्यास सांगितले. इमर्जन्सी लँडिंगच्या वेळी विमानात पायलटसह 200 प्रवासी आणि कर्मचारी होते. विशेष म्हणजे, गेल्या महिन्यात नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) एअर एशियाचे विमान पुण्यातील धावपट्टीवर टायरला तडा गेल्याने उभे केले होते.

पक्षी धडकण्याच्या घटना वाढल्या : गेल्या काही महिन्यांपासून विमानाला पक्षी धडकण्याच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे दिसून आले आहे. 26 फेब्रुवारीला अशाच एका घटनेत सुरतहून दिल्लीला जाणाऱ्या इंडिगो विमानाचे अहमदाबादमध्ये इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले आहे. विमानाला पक्षी धडकल्या नंतर या विमानाचे आपत्कालीन लँडिंग करण्यात आल्याचे सांगण्यात आले. पक्षाच्या धडकेने विमानाच्या इंजिनच्या पंख्याचे ब्लेड खराब झाले होते. नागरी उड्डयन महासंचालनालयाने एक निवेदन जारी करून म्हटले होते की, 'इंडिगो एअर लाइन्सच्या A320 या सूरत दिल्ली विमानाला टेकऑफ करताच एक पक्षी धडकला. त्यानंतर विमानाचे अहमदाबाद विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले आहे'.

हेही वाचा : Flight Emergency Landing: सुरतहून दिल्लीला जाणाऱ्या इंडिगो विमानाचे अहमदाबादमध्ये इमर्जन्सी लँडिंग, इंजिनला धडकला पक्षी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.