हैदराबाद (तेलंगना) : शहरातील हैदराबाद सेंट्रल युनिव्हर्सिटीमध्ये (एचसीयू) अत्याचाराची घटना (HCU student rape incident) घडली आहे. एचसीयूच्या एका प्राध्यापकाने थायलंडमधील विद्यार्थिनीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न (professor attempted to rape a Thailand student ) केला. त्यावेळी विद्यार्थ्याने तेथून पळ काढला. याप्रकरणी पीडितेने गचीबोवली पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी प्राध्यापकाविरुद्ध कलम 354 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पीडितेचा जबाब नोंदवून आणखी कलमे दाखल करण्यात येणार असल्याचे गचीबोवली पोलिसांनी सांगितले. हा प्राध्यापक सध्या पोलिसांच्या ताब्यात (professor currently in police custody) आहे.Professor Attempted To Rape, latest news from Hyderabad, Hyderabad crime
प्राध्यापकाच्या विरुद्ध निदर्शने : विद्यापीठातील या घटनेने विद्यार्थी हादरले आहेत. गैरकृत्य करणाऱ्या प्राध्यापकावर तातडीने कडक कारवाई करण्याची मागणी करत धरणे आंदोलन केल्याने तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती. विद्यापीठाच्या गेटसमोर त्यांनी प्राध्यापकाच्या विरोधात घोषणाबाजी करत निदर्शने केली. अभाविपच्या विद्यार्थ्यांनी या प्राध्यापकाला त्यांच्या कर्तव्यावरून हटवण्याच्या मागणीसाठी मोठ्या प्रमाणावर आंदोलन सुरू केले.
न्याय कोणाकडे मागायचा?
विद्यार्थ्यांच्या आंदोलनामुळे पोलिसांनी एचसीयूमध्ये अतिरिक्त फौजफाटा तैनात केला होता. ज्या प्राध्यापकांनी जबाबदारीने वागायचे असेल त्यांनीच अत्याचार केले तर ते कोणाला सांगायचे, अशी चिंता अनेक विद्यार्थिनींनी व्यक्त केली. जोपर्यंत एचसीयूचे व्यवस्थापन प्रतिसाद देत नाही आणि प्राध्यापकांवर कारवाई करत नाही तोपर्यंत थांबणार नसल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले.