ETV Bharat / bharat

Phone tapping: पेगासस स्पायवेअरद्वारे नेते, मंत्री आणि पत्रकारांचे फोन टॅप, वाचा संपूर्ण प्रकरण - इस्रायली एनएसओ ग्रुप

इस्रायली एनएसओ ग्रुपकडून पेगासस स्पायवेअरची जगभरात विक्री केली जाते. या पेगासस स्पायवेअरच्या माध्यमातून भारतातील राजकीय पक्षांचे नेते, संरक्षण संबंधित अधिकारी, न्यायव्यवस्था व व्यावसायिक वर्गांतील महत्त्वाच्या व्यक्तींवर पाळत ठेवली जात असल्याचे उघडकीस आले आहे. 2019 मध्ये याच प्रकारचे व्हॉट्सअॅप हेरगिरी प्रकरण समोर आले होते.

Phone tapping
फोन टॅपींग
author img

By

Published : Jul 19, 2021, 8:13 AM IST

Updated : Jul 19, 2021, 9:43 AM IST

नवी दिल्ली - इस्रायली स्पायवेअरने देशातील दोन केंद्रीय मंत्री, 40 हून अधिक पत्रकार, तीन विरोधी नेते, एक न्यायाधीश, भारतातील 300 व्यापारी आणि मानवाधिकार कार्यकर्त्यांचे फोन टॅप केल्याची माहिती एका आंतरराष्ट्रीय मीडिया संघटनेने समोर आणली आहे. केवळ सरकारी संस्थांना विकल्या जाणाऱ्या इस्रायली गुप्तचर स्पायवेअरने हेरगिरी केली आहे. इस्रायली सॉफ्टवेअर पेगाससच्या माध्यमातून भारतीय नेते, पत्रकार आणि इतरांचे फोन हॅक केल्याचे म्हटलं आहे. हा दावा मीडिया रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे. यामुळे देशाच्या राजकारणात खळबळ उडाली होती. तथापी, भारत सरकारने या दाव्यांना निराधार म्हटले आहे.

भारतातील न्यूज पोर्टल ‘द वायर’सह जगभरातल्या 16 वृत्तसंस्थांनी पेगाससकडून पाळत ठेवली जात असल्याची खातरजमा केली आहे. फ्रान्समधील फॉरबिडन स्टोरीज या मीडिया नॉन प्रॉफिट संस्था आणि अॅम्नेस्टी इंटरनॅशनल या मानवाधिकार संघटनेकडे एनएसओच्या फोन नंबरचा डेटा होता. त्यांनी 'पेगासस प्रोजेक्ट' नामक मोहिम राबवून जगभरातील मीडिया संस्थांना ही माहिती दिली. यात भारातील द वायर तसेच ल माँद, द गार्डियन, वॉशिंग्टन पोस्ट, सुडडोईच झाईटुंग, दाई झैट व मेक्सिको, लेबनॉन व युरोपातील अन्य वृत्तसंस्थांना दिली आहे. या शोधपत्रकारितेला या सर्वांनी ‘पेगासस प्रोजेक्ट’ असे नाव दिले आहे. इस्रायली कंपनी एनएसओने पेगासस सॉफ्टवेअरच्या माध्यमातून हॅकिंग केली आहे.

न्यूज पोर्टल ‘द वायर’ने म्हटलं आहे, की पेगाससद्वारे पाळत ठेवण्यात आलेल्या व्यक्तीच्या फोनची फोरेन्सिक चाचणी केली असता 37 फोनमध्ये पेगाससच्या स्पायवेअरने शिरकाव केल्याचे दिसून आले. या 37 जणांमध्ये 10 भारतीय आहेत. द वायरच्या माहितीनुसार या लीक झालेल्या आकडेवारीत हिंदुस्तान टाईम्स, इंडिया टुडे, नेटवर्क 18, द हिंदू, इंडियन एक्सप्रेस यासारख्या प्रमुख माध्यम संघटनांच्या प्रमुख पत्रकारांचा समावेश आहे.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी टि्वट करून हेरगिरी प्रकरणावरून केंद्रावर निशाणा साधला आहे.

पेगासस सॉफ्टवेअरकडून हेरगिरी केल्याच्या बातम्या निराधार -

केंद्रीय इस्रायली कंपनीने तयार केलेल्या गुप्तचर सॉफ्टवेअर पेगाससच्या माध्यमातून पत्रकार आणि देशातील इतर उच्चभ्रू व्यक्तींवर हेरगिरी केल्याच्या मीडिया रिपोर्टला भारत सरकारने नकार दिला आहे. हे आरोप निराधार असल्याचे भारत सरकार म्हटलं. भारतीय लोकशाहीची प्रतिमा डागाळण्याचा हा प्रयत्न आहे. भारत आपल्या नागरिकांच्या गोपनीयतेच्या हक्काचे संरक्षण करण्यासाठी वचनबद्ध आहे. हेरगिरी प्रकरणारवर रविवारी रात्री माहिती व तंत्रज्ञान मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव डॉ. राजेंद्र कुमार यांनी केंद्र सरकारची बाजू मांडली.

पेगासस सॉफ्टवेअर -

पेगासस हे एक स्पायवेअर आहे. इस्त्रायलच्या NSO ग्रुपने हे स्पायवेअर बनवलं आहे. ज्याद्वारे आयफोन आणि अँड्रॉइड डिव्हाइस हॅक केले जाऊ शकतात. यासह, मालवेअर पाठविणारे त्या फोनचे संदेश, फोटो आणि अगदी ई-मेल पाहू शकतात.

व्हॉट्सअॅप हेरगिरी प्रकरण -

वर्ष 2019 मध्ये व्हॉट्सअॅप हेरगिरी प्रकरण समोर आले होते. इस्रायलमधील कंपनी व्हॉट्स्अॅप हॅक करत असल्याचे उघड झाले होते. इस्रायलच्या स्पायवेअर पेगाससच्या माध्यमातून भारतीय पत्रकार आणि मानवाधिकार कार्यकर्त्यांची हेरगिरी करण्यात आल्याचे व्हॉट्सअॅपकडून सांगण्यात आले होते. इस्रायलच्या स्पायवेअर पिगासस भारतामध्ये सक्रिय होता. इस्राईलमधील एनएसओ ग्रुपने तंत्रज्ञानाचा वापर करत जगभरातील 1 हजार 400 लोकांच्या स्मार्टफोनला लक्ष्य केल्याचे व्हॉट्सअॅपने सांगितले होते. टोरोंटो विद्यापीठामधील सिटीजन लॅबने हॅकिंग प्रकार उघडण्यासाठी व्हॉट्सअॅपला मदत केली होती. व्हॉट्स अॅपनं यासंदर्भात एनएसओ या कंपनीला कोर्टात खेचल्यानंचर संपूर्ण जगाच लक्ष याकडे वेधलं गेलं.

Last Updated : Jul 19, 2021, 9:43 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.