नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 23 जानेवारीला पश्चिम बंगाल आणि आसामच्या दौर्यावर आहेत. या दरम्यान पंतप्रधान मोदी कोलकाता येथे नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या 12 व्या जयंतीनिमित्त आयोजित 'पराक्रम दिवस' समारंभाला संबोधित करतील.
या व्यतिरिक्त पंतप्रधान आसामच्या शिवसागरमधील जेरेंगा पाथरलाही भेट देतील. येथे पीएम मोदी 1.06 लाख लोकांना जमीन भाडेपट्टी प्रमाणपत्र वाटप करतील. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा दौऱ्या येत्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आयोजीत करण्यात आल्याचे बोलले जात आहे. यंदा पश्चिम बंगाल आणि आसमा मध्ये निवडणूका होणार आहेत.
निवडणूक आयोगाचं पथक आसाम दौऱ्यावर -
मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांच्या नेत़ृत्वाखाली निवडणूक आयोगाचं पथक आजपासून तीन दिवसांचा आसाम दौरा करणार असून राज्य विधानसभा निवडणुका घेण्याच्या अनुषंगानं परिस्थितीचा आढावा घेणार आहेत. हे पथक या दौऱ्यात विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांना तसंच अधिकाऱ्यांना भेटून त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर विधानसभा निवडणुकांच्या तारखा निश्चित करणार आहे.
पश्चिम बंगाल निवडणूक -
भाजपाने विधानसभा निवडणुकीसाठी जोरात मोर्चबांधणी सुरू केली आहे. विधानसभेच्या 294 जागांसाठी पश्चिम बंगालमध्ये 2021 मध्ये निवडणूक घेतली जाणार आहे. राज्यात भाजपने ममता बॅनर्जींच्या सरकारला आव्हान दिले आहे. गेल्या दहा वर्षांपासून बंगालच्या मुख्यमंत्रीपदी ममता बॅनर्जी आहेत. 2016 च्या विधानसभा निवडणुकीत टीएमसीला 211 जागा मिळाल्या होत्या तर भाजपला फक्त 3 जागा जिंकता आल्या होत्या. अशा परिस्थितीत 2021 च्या विधानसभा निवडणुकीत बंगालमध्ये मोठा संघर्ष पाहायला मिळण्याची शक्यता आहे.
आसाम निवडणूक -
एप्रिल 2021 मध्ये आसामच्या विधानसभा निवडणुका होण्याची शक्यता आहे. आसाम विधानसभा निवडणूक 2016 मध्ये पार पडली होती. गेल्या निवडणुकीमध्ये आसाम विधानसभेमधील सर्व 126 जागांसाठी नवे आमदार निवडले गेले. भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील रालोआने 86 जागांवरील विजयासह सपशेल बहुमत मिळवले व आसाममधील कॉंग्रेस पक्षाची प्रदीर्घ सत्ता संपुष्टात आणली.