ETV Bharat / bharat

कोरोना खेड्यात पोहोचला, तर रोखणं कठीण, मोदींनी मुख्यमंत्र्यासोबतच्या बैठकीत व्यक्त केली चिंता

author img

By

Published : Mar 17, 2021, 2:06 PM IST

Updated : Mar 17, 2021, 2:33 PM IST

मोदी
मोदी

14:17 March 17

'दवाई भी, कडाई भी' या मंत्राचा विसर नको

पंतप्रधान मोदींचा मुख्यमंत्र्यांशी संवाद

कोरोना लस वाया जाण्याचे प्रकार थांबवावे लागतील. राज्यामध्ये जीनोम चाचणी वाढवावी, असे मोदी म्हणाले. तसेच त्यांनी मास्क वापरासंदर्भात चिंता व्यक्त केली. लसीकरण व्यवस्थेचा आढावा घ्यावा आणि छोट्या शहरांमध्ये कोरोना चाचण्याचे प्रमाण वाढवावे. 'दवाई भी, कडाई भी' या मंत्राचा विसर पडू देऊ नका, असे ते म्हणाले. 

14:10 March 17

कोरोनाची नागरिकांमध्ये भीती पसरू नये, यासाठी काळजी घेणे गरजेचे आहे. खेडेगावांमध्ये कोरोनाचा प्रसार झाला. तर तो आटोक्यात आणणे कठिण जाईल. त्यामुळे आताच त्यावर नियंत्रण मिळवणे गरजेचे आहे.

14:09 March 17

ममता बॅनर्जी, योगी आदित्यनाथ बैठकीत उपस्थित नाहीत

आसाममधील भाजपाच्या मेळाव्यात सहभागी झाल्यामुळे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथदेखील उपस्थित नाहीत.  तथापि, केंद्र सरकारच्या वतीने आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन, गृहमंत्री अमित शहा उपस्थित आहेत. या बैठकीत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल हजर राहिले नाहीत.  

14:05 March 17

भारतात मृत्यू कमी - मोदी

आज भारतात 96 टक्क्यांपेक्षा जास्त कोरोना रुग्ण बरे झाले आहेत. ज्या देशांमध्ये मृत्यूचे प्रमाण सर्वात कमी आहे. त्यापैकी एक भारत आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी  मुख्यमंत्र्यांसमवेत बैठकीत म्हटलं. 

12:11 March 17

कोरोनाविरुद्ध रणनीती? पंतप्रधान मोदींची मुख्यमंत्र्यांशी चर्चा

नवी दिल्ली - कोरोना विषाणूचा पुन्हा प्रसार होत आहे. वाढती कोरोनाबाधितांची संख्या आणि पुढील नियोजन याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसमवेत चर्चा केली.  कोरोना विषाणूचा उद्रेक झाल्यानंतर पंतप्रधानांनी वेळोवेळी अशा प्रकारे राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला आहे. काही राज्यांमध्ये सध्या कोरोनाची दुसरी लाट दिसून येत आहे, या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्त्वाची आहे. आज भारतात 96 टक्क्यांपेक्षा जास्त कोरोना रुग्ण बरे झाले आहेत. ज्या देशांमध्ये मृत्यूचे प्रमाण सर्वात कमी आहे. त्यापैकी एक भारत आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं.  

यापूर्वी जानेवारीमध्ये झाली होती बैठक..

कोरोना विषाणूचा उद्रेक झाल्यानंतर पंतप्रधानांनी वेळोवेळी अशा प्रकारे राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला आहे. यापूर्वी त्यांनी जानेवारीमध्ये अशा प्रकारची बैठक बोलावली होती. यावेळी त्यांनी लसीकरणासाठी राज्ये कितपत तयार आहेत याचा आढावा घेतला होता. तसेच, लसीकरणाच्या टप्प्यांबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आली होती.

राज्यांमध्ये कोरोनाची दुसरी लाट..

दरम्यान, महाराष्ट्रासह काही राज्यांमध्ये कोरोनाच्या रुग्णांची संख्या पुन्हा झपाट्याने वाढत आहे. या राज्यांमध्ये कोरोनाची दुसरी लाट आली असल्याचे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे. त्यामुळे बऱ्याच ठिकाणी लॉकडाऊनसारखे निर्बंध काही प्रमाणात लागू करण्यास सुरुवात करण्यात आली आहे.

Last Updated : Mar 17, 2021, 2:33 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.