ETV Bharat / bharat

प्रियंका गांधी यांना भेटल्यावर काय वाटले? राजीव गांधींच्या हत्येचा आरोप असलेल्या नलिनीने 'हे' दिले उत्तर

नलिनी श्रीहरन ( Nalini Sriharan ) यांची शनिवारी 12 नोव्हेंबरला सुटका करण्यात आली. त्यानंतर पत्रकार परिषद पार पडली. त्यात नलिनी श्रीहरन यांना प्रियंका गांधी आणि राजीव गांधी यांची हत्या यावर प्रश्न विचारण्यात आले.

author img

By

Published : Nov 14, 2022, 10:04 AM IST

Nalini Sriharan
नलिनी श्रीहरन

चेन्नई : 1991 मध्ये राजीव गांधी यांची हत्या करण्यात आली. त्यावेळी सहा दोषींना अटक करण्यात आल होती. त्यातील नलिनी श्रीहरन यांची शनिवारी 12 नोव्हेंबरला सुटका करण्यात ( Rajiv Gandhi Assassination Convicts released ) आली. त्यानंतर पत्रकार परिषद पार ( Nalini Sriharan Press Conference ) पडली. त्यात नलिनी श्रीहरन यांना प्रियंका गांधी आणि राजीव गांधी यांची हत्या यावर प्रश्न विचारण्यात आले.

नलिनी श्रीहरन यांची सुटका : नलिनी श्रीहरन यांना प्रियंका गांधी आणि राजीव गांधी यांची हत्या यावर प्रश्न विचारण्यात आले. तेव्हा त्यांनी अनेक गोष्टींचा उलगडा केला. यावेळी त्या भावूक झाल्या. नलिनी यांनी प्रियंका यांना हत्ये संदर्भात जे काही माहित होते ते ( Priyanka Vadra Reaction On Rajiv Gandhi Death)सांगितले. असे त्या पत्रकार परिषदेत म्हणाल्या.

भावनिक प्रियंका वाड्रा : त्यावेळी प्रियंका वाड्रा रडल्या का असे विचारले असता नलिनी यांनी होय त्या खूप भावनिक होत्या असे म्हटले. वेळ जरी निघून गेली तरी, वडिलांच्या हत्येच्या जखमा बऱ्या झाल्या नाहीत. राजीव गांधी यांची 1991 मध्ये हत्या झाली. त्यानंतर प्रियंका 2008 मध्ये तामिळनाडूतील वेल्लोर सेंट्रल तुरुंगात नलिनी यांना भेटल्या. त्या भेटीत घडलेल्या इतर गोष्टी प्रियांकाच्या वैयक्तिक विचारांशी संबंधित असल्याचे उघड करता येणार नाही, असे पत्रकार परिषदेत त्या म्हणाल्या. गांधी घराण्यातील इतर सदस्यांशी भेटण्यात काही संकोच होतो का असे विचारले असता, गांधी घराण्यातील, हत्येच्या प्रकरणाची पार्श्वभूमी लक्षात घेता ती द्विधा मनस्थिती असली तरी त्यांची इच्छा असल्यास मी त्यांना भेटेन असे त्या म्हणाल्या.

१२ नोव्हेंबर रोजी सुटका : 30 वर्षांहून अधिक काळ तुरुंगात घालवल्याने तिथे अनेक गोष्टी शिकायला ( 30 years in prison ) मिळाल्या. तुरुंगातील जीवन संघर्ष यावर आत्मचरित्र पुस्तक लिहिण्याची योजना आहे का असे विचारले असता, पती श्रीहरन आणि मुलासोबत एकत्र राहण्याचा विचार आहे असे त्यांनी म्हटले. 1999 मध्ये, सर्वोच्च न्यायालयाने नलिनी, तिचा पती श्रीहरन आणि इतर दोघांना फाशीची शिक्षा सुनावली होती. तामिळनाडू सरकारने 2000 मध्ये नलिनीची फाशीची शिक्षा जन्मठेपेत बदलली होती. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर १२ नोव्हेंबर रोजी सुटका करण्यात आलेल्या सहा दोषींमध्ये नलिनी आणि श्रीहरन यांचा समावेश होता.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.