पोरबंदर Porbandar Murder : पोरबंदरमधील रोकडिया हनुमान मंदिराच्या मागे राहणाऱ्या एका व्यक्तीची क्षुल्लक कारणावरून हत्या झाल्याची घटना समोर आलीय. नवरात्रीच्या दिवशी बक्षीस देण्यावरून मृताच्या पत्नीचे दोन महिलांसोबत भांडण झालं होतं. त्यानंतर दोन महिलांसह 9 जणांनी त्याच्या घरी जाऊन त्याला मारहाण केली. यात त्या व्यक्तीचा मृत्यू झालाय. सरमन ओडेद्रा असं मृताचं नाव असून हा दारू तस्कर होता.
नवरात्रीनिमित्त बक्षीससारख्या क्षुल्लक कारणावरून झालेल्या भांडणातून आरोपींनी सरमन नागाभाई ओडेद्रा यांचा घराजवळ खून केला. विशेष म्हणजे त्याच दिवशी मृत सरमन ओडेद्राचा मुलगा करणचा वाढदिवस होता. मुलाच्या वाढदिवशीच वडिलांचा खून झाल्यानं वाढदिवसाच्या दिवशी घरावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
काय होती संपूर्ण घटना : मृत सरमन नागाभाई ओडेद्रा यांची मुलगी कृपा ही पोरबंदरच्या रोकडिया हनुमान मंदिराच्या मागे असलेल्या शीतल पार्कमध्ये नवरात्रीच्या काळात गरबा खेळायला जात होती. तेव्हा 23 तारखेच्या रात्री त्यांची आई आणि सरमन ओडेद्राच्या पत्नीचं त्यांच्या मुलीला बक्षीस न मिळाल्यानं काही लोकांशी भांडण झालं. त्यानंतर दोन महिलांसह नऊ जण सरमन ओडेद्राच्या घरी गेले आणि भांडण झालं. दरम्यान लोक त्यांच्या घरात घुसले. त्यांच्यावर शस्त्रांनी हल्ला केला. यात गंभीर मारहाणीमुळं सरमन ओडेद्रांचा मृत्यू झालाय.
मयत होता दारू तस्कर : पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या घटनेबाबत मृताच्या पत्नीनं उद्योगनगर पोलिसात राजा मुरु कुछाडिया, राजू भिखू केशवाला, रामदे हर्शी बोखिरिया, प्रतीक किशन गोरानिया, राजू केशवाला यांची पत्नी, राजा मुरुण यांची पत्नी आणि अन्य 3 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. तक्रारीच्या आधारे एसपी भगीरथसिंग जडेजा यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय एमएल सोळंकी यांनी पुढील तपास सुरू केलाय.
हेही वाचा :