डेहराडून- पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज (१२ ऑक्टोबर) उत्तराखंडमधील मानस खंड येथील प्रसिद्ध कुमाऊं मंडलला पोहोचले. कुमाऊं मंडलमधील पिथौरागड जिल्ह्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आदि कैलाशचे दर्शन घेतले. आदि कैलाश येथील पार्वती कुंडमध्ये पंतप्रधानांनी पुजादेखील केली.
- पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज सकाळी साडेआठ वाजता पिथौरागढ येथे पोहोचले. सर्वप्रथम पंतप्रधानांनी प्रसिद्ध आदि कैलाश येथे दर्शन घेतले. पंतप्रधान येण्यापूर्वी रस्ते मार्गावर सुशोभीकरण करण्यात आले. मार्गाच्या दोन्ही बाजुला फुलांची सजावट करण्यात आली. मार्गातील फुलांची सजावट पाहत मोदी हे दर्शन घेण्यासाठी पोहोचले.
-
शिव-शक्ति को नमन,
— BJP (@BJP4India) October 12, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
आदि कैलाश के दर्शन... pic.twitter.com/42j84xE21n
">शिव-शक्ति को नमन,
— BJP (@BJP4India) October 12, 2023
आदि कैलाश के दर्शन... pic.twitter.com/42j84xE21nशिव-शक्ति को नमन,
— BJP (@BJP4India) October 12, 2023
आदि कैलाश के दर्शन... pic.twitter.com/42j84xE21n
पंतप्रधान मोदींनी कैलाश मंदिरात घेतले दर्शन- पंतप्रधान यांनी भक्तीभावानं कैलाशाचे दर्शन घेतले. त्यांनी हात जोडत मंत्र जप केला. त्यानंतर दोन्ही हात उंचावत हर हर महादेवचा जयघोष केला. पंतप्रधान मोदींनी पार्वती तालजवळ ध्यान केले. त्यांच स्थानिक लोकांनी जोरदार स्वागत केलं. मोदींनी पारंपारिक पोषाख घातल्याचं दिसून आलं. अल्मोडा येथील प्रसिद्ध मंदिर जागेश्वर धाम येथेदेखील पूजा केली. जोगेश्वर मंदिरात भोलेनाथाची पूजा करून आशिर्वाद घेतला. यावेळी पंतप्रधान ११ ब्राम्हणांचे यजमान झाले. स्थानिक पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी पंतप्रधान मोदींचा हा दौरा महत्त्वपूर्ण आहे.
भगवान शंकरावर पंतप्रधान मोदींची आहे श्रद्धा- पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम घोषित झाल्यानंतर पंतप्रधान मोदी हे पुन्हा एकदा शंकराच्या दर्शनाला पोहोचल्याचं दिसून आले. यापूर्वीदेखील मोदी हे केदारधाम येथे पोहोचले होते. त्यानंतर भाजपाची निवडणुकीत चांगले यश मिळाले होते. जेव्हा पंतप्रधान मोदींना वेळ मिळतो, तेव्हा ते उत्तराखंड येथील केदारनाथ धामला भेट देऊन शंकराचे दर्शन घेतात.
- पंतप्रधान मोदींनी वाजवला डमरू : मंदिराच्या आत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी डमरू वाजवून भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा केली. तसेच पंतप्रधान मोदींनी पूजेची ज्योतही प्रज्वलित केली. यानंतर मोदींनी शंख फुंकत पुजा केली. पूजा आटोपल्यानंतर पुजार्याने पंतप्रधानांना कलव बांधला. त्यानंतर मोदींनी पुजाऱ्याला दक्षिणा दिली.
हेही वाचा-