हैदराबाद (तेलंगणा): पंतप्रधान नरेंद्र मोदी 19 जानेवारीला तेलंगणाला भेट देणार होते. त्या दरम्यान ते अनेक विकास प्रकल्प सुरू करणार होते. हैदराबाद ते विशाखापट्टणम दरम्यान धावणाऱ्या वंदे भारत ट्रेनलाचाही शुभारंभ पंतप्रधान करणार होते. मात्र हा दौरा पुढे ढकलण्यात आला असून, आता या कार्यक्रमाची नवीन तारीख लवकरच जाहीर होणार आहे. केंद्रीय पर्यटन आणि सांस्कृतिक मंत्री जी. किशन रेड्डी यांना बुधवारी पंतप्रधान कार्यालयाकडून (पीएमओ) स्थगितीची माहिती मिळाली. मोदींच्या दौऱ्याचा सुधारित कार्यक्रम लवकरच जाहीर केला जाईल, असे तेलंगणा भाजपचे अध्यक्ष बंदी संजय कुमार यांनी सांगितले. PM Modi Telangana Tour
सिकंदराबाद रेल्वे स्थानकाचे 699 कोटी रुपये खर्चाचे आधुनिकीकरण, काझीपेठ येथे 521 कोटी रुपये खर्चून रेल्वे पीरियडिक ओव्हरहॉलिंग वर्कशॉप यासह विविध प्रकल्पांची पायाभरणी पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते होणार आहे. याशिवाय राष्ट्रीय महामार्ग 167N च्या महबूबनगर-चिंचोली विभागाच्या 60 किमी 2/4 लेनचे रुंदीकरण व मजबुतीकरणाच्या कामाचेही उदघाटन त्यांच्या हस्ते करण्यात येणार होते. हे काम अंदाजे 704 कोटी रुपये खर्चून केले जाणार आहे.
यासह सध्याच्या महबूबनगर-चिंचोली विभागाच्या ४२.५७ किमी लांबीच्या रुंदीकरण आणि मजबुतीकरणासाठीही पायाभरणी मोदींच्या हस्ते केली जाणार आहे. या प्रकल्पाची अंदाजे किंमत 632 कोटी रुपये आहे. PM मोदी NH-161B च्या निजामपेट-नारायणखेड-बिदर सेक्शनला 45.95 किमीने दोन लेनमध्ये रुंद करण्यासाठी 513 कोटी रुपयांच्या प्रकल्पाची पायाभरणी करणार आहेत. हा प्रकल्पही महत्त्वाचा आहे.
किशन रेड्डी यांनी सोमवारी घोषणा केली होती की, पंतप्रधान मोदींच्या भेटीदरम्यान 7,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या अनेक प्रकल्पांची पायाभरणी करण्यात येणार असून, हे प्रकल्प राष्ट्राला समर्पित करणार आहेत. ते सिकंदराबाद-महबूबनगर या 85 किलोमीटर लांबीच्या रेल्वे दुहेरीकरण मार्गाचे राष्ट्राला समर्पित करतील. या प्रकल्पाची किंमत 1,410 कोटी रुपये आहे. हैदराबाद येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT) येथे 2,597 कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे अनावरणही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.