बेंगळुरू: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सोमवार (दि. 6 जानेवारी)रोजी सोमवारी कर्नाटकातील तुमाकुरू जिल्ह्यात हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडच्या देशातील सर्वात मोठ्या हेलिकॉप्टर उत्पादन युनिटचे उद्घाटन केले. बेंगळुरू-मुख्यालय असलेल्या (HAL)ने गुब्बी तालुक्यातील या कारखान्यात 20 वर्षांच्या कालावधीत 3-15 टन रेंजमध्ये 1,000 हून अधिक हेलिकॉप्टर तयार करण्याची योजना आखली आहे, ज्याची एकूण उलाढाल 4 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.
उत्पादनात स्वावलंबी होण्याचा मान : 2016 मध्ये पंतप्रधानांच्या हस्ते या कारखान्याची पायाभरणी करण्यात आली होती. हा कारखाना ६१५ एकरात आहे. सुरुवातीला ते लाइट युटिलिटी हेलिकॉप्टर तयार करणार आहे. या केंद्रामुळे, भारताला हेलिकॉप्टरची संपूर्ण गरज स्वदेशी पूर्ण करता येईल, आणि हेलिकॉप्टरची रचना, विकास आणि उत्पादनात स्वावलंबी होण्याचा मान मिळेल. यावेळी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई आणि संरक्षण मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
जी-20 उपक्रमाचा एक भाग : 6-8 फेब्रुवारी दरम्यान होणार्या इंडिया एनर्जी वीकचे उद्दिष्ट भारताचे ऊर्जा संक्रमण पॉवरहाऊस म्हणून प्रदर्शन करणे आहे, असे पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने आपल्या निवेदनात म्हटले आहे. कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान जागतिक तेल आणि वायू सीईओंसोबत गोलमेज संवादात सहभागी होतील. हरित ऊर्जेच्या क्षेत्रातही ते अनेक उपक्रम सुरू करणार आहेत. इंडिया एनर्जी वीक कार्यक्रम जी-20 तील उपक्रमाचा एक भाग आहे.
इथेनॉलच्या 20 टक्के मिश्रणाचे उद्दिष्ट : या कार्यक्रमात 30,000 हून अधिक प्रतिनिधी, 1,000 प्रदर्शक आणि 500 वक्ते भारताच्या ऊर्जा भविष्यातील आव्हाने आणि संधींवर चर्चा करण्यासाठी एकत्र येतील. पंतप्रधान मोदी 12 राज्यांमधील तेल विपणन कंपन्यांच्या 84 रिटेल आउटलेटवर ई 20 इंधन लाँच करणार आहेत. ई 20 म्हणजे पेट्रोलमध्ये 20 टक्के इथेनॉलचे मिश्रण. 2025 पर्यंत इथेनॉलचे 20 टक्के मिश्रण साध्य करण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे.
ग्रीन मोबिलिटी रॅलीला हिरवा झेंडा : मिश्रणाची ही प्रक्रिया सुलभ करण्यासाठी तेल विपणन कंपन्या इथेनॉल प्रकल्प उभारत आहेत. स्वच्छ इंधनाबाबत जनजागृती करण्यासाठी पंतप्रधान ग्रीन मोबिलिटी रॅलीला हिरवा झेंडा दाखवतील. ते इंडियन ऑइलच्या इनडोअर सोलर कुकिंग सिस्टीमचे ट्विन-कूक टॉप मॉडेल देखील समर्पित करतील. हे एक क्रांतिकारी इनडोअर सोलर कुकिंग सोल्यूशन आजे जे एकाच वेळी सौर आणि सहाय्यक ऊर्जा स्त्रोतांवर कार्य करते.
कॉंग्रेसची मोदींवर टिका : हिंडेनबर्ग रिसर्चच्या अदानी समूहावरील आरोपांवरून काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी रविवारी केंद्र सरकारवर हल्ला चढवला. काँग्रेसने आरोप केला की, मोदी सरकारचे या मुद्द्यावरचे मौन संशयास्पद आहे. गेल्या अनेक वर्षांपासून अदानी समूहावर करण्यात आलेल्या आरोपांची चौकशी कधी झाली आहे का, असा सवाल रमेश यांनी केला. अमेरिकास्थित हिंडेनबर्ग रिसर्चने गौतम अदानी यांच्या नेतृत्वाखालील अदानी समूहावर फसवे व्यवहार आणि शेअरच्या किमतीत फेरफार यासह अनेक गंभीर आरोप केल्यानंतर अदानी समूहाच्या शेअरच्या किमतीत मोठी घसरण झाली आहे.
हेही वाचा : Jairam Ramesh On Adani : मोदी सरकार अदानींवरील प्रश्नांपासून पळ काढू शकत नाही - जयराम रमेश