ETV Bharat / bharat

'सत्य आत्मनिर्भर', राहुल गांधींची महात्मा गांधींना श्रद्धांजली

author img

By

Published : Jan 30, 2021, 7:36 PM IST

काँग्रेस नेता राहुल गांधी यांनी बापूंना आदरांजली वाहिली. राहुल गांधींनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये त्यांचे वडिल म्हणेजच भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधीही पाहायला मिळत आहेत.

राहुल गांधी
राहुल गांधी

नवी दिल्ली - राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची आज (30 जानेवारी) पुण्यतिथी असून काँग्रेस नेता राहुल गांधी यांनी बापूंना आदरांजली वाहिली. त्यांनी गांधींच्या आठवणीमध्ये एक व्हिडिओ टि्वट केला. 'सत्य लोकांच्या समर्थनाशिवायही उभं राहतं. ते आत्मनिर्भर आहे' हे महात्मा गांधींचं वचन वापरून राहुल गांधींनी श्रद्धांजली अर्पण केली आहे.

राहुल गांधींनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये त्यांचे वडिल म्हणजेच भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधीही पाहायला मिळत आहेत. राहुल गांधी यांनी काही दिवसांपूर्वी शेतकरी आंदोलनाबाबत महात्मा गांधी यांच्या वचनाचा हवाल देत एक टि्वट केले होते.

राहुल गांधी यांच्यासहीत अनेक नेत्यांनी बापूंना आदरांजली वाहिली आहे. 'महान बापूंना पुण्यतिथीनिमित्तानं श्रद्धांजली. त्यांचे आदर्श लाखो लोकांना प्रेरणा देत आले आहेत' असं ट्विट पंतप्रधान मोदींनी केले आहे. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनीदेखील महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहिली.

जगभरातून गांधीजींच्या आठवणींना उजाळा -

आज महात्मा गांधी यांची 73 वी पुण्यतिथी आहे. या दिनी देशासह जगभरातून गांधीजींच्या आठवणींना उजाळा देण्यात येत आहे. 30 जानेवारी 1948 रोजी कट्टर हिंदुत्ववादी नथुराम गोडसे याने महात्मा गांधींची गोळ्या घालून हत्या केली. महात्मा गांधींना सोशल मीडियावरूनही मोठ्या प्रमाणात आदरांजली वाहण्यात येत आहे. तर अनेक ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.