ETV Bharat / bharat

Parliament Budget Session : लोकसभेत आजही कामकाज नाही, राज्यसभेचे कामकाज 3 एप्रिलपर्यंत तहकूब - लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला

राहुल गांधींच्या निलंबनाच्या मुद्यावरून सततच्या गदारोळामुळे आजही लोकसभेत कामकाज झाले नाही. तर राज्यसभेचेही कामकाज 3 एप्रिल सकाळी 11 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले आहे.

Parliament
संसद
author img

By

Published : Mar 29, 2023, 12:55 PM IST

Updated : Mar 29, 2023, 2:17 PM IST

नवी दिल्ली : संसदेच्या कामकाजात आजही गोंधळ पाहायला मिळाला. लोकसभेत विरोधी पक्षांनी काळे कपडे परिधान करून निषेध व्यक्त केला. त्यामुळे आजही दोन्ही सभागृहाचे कामकाज होऊ शकले नाही.

लोकसभा अध्यक्षांविरोधात अविश्वास प्रस्ताव : काँग्रेस पक्षाने सकाळी 10:30 वाजता सीपीपी कार्यालय, संसद भवन येथे लोकसभा आणि राज्यसभेच्या खासदारांची बैठक घेतली. या बैठकीत काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांनी पुढील आठवड्यात लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव आणण्याबाबत चर्चा केली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, काँग्रेस नेत्यांच्या बैठकीत यासंदर्भात एक प्रस्ताव ठेवण्यात आला होता. या प्रकरणी विरोधी पक्षांत परस्पर समन्वय असल्यास सोमवारी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्लांविरोधात अविश्वास प्रस्ताव आणला जाऊ शकतो. काँग्रेस पक्ष याबाबत इतर विरोधी पक्षांशी चर्चा करत आहे.

लाल किल्ल्याजवळ लोकशाही वाचवा मोर्चा : बदनामीच्या खटल्यात काँग्रेस नेते राहुल गांधी दोषी ठरल्याच्या एका दिवसानंतर, विरोधकांनी संसदेत अदानी मुद्दा मांडण्याची संधी मिळत नसल्याचा दावा केला आहे. मात्र, सभापतींविरुद्ध अविश्वास प्रस्ताव आणण्यासाठी त्यांना किमान ५० सदस्यांच्या पाठिंब्याची आवश्यकता आहे. राहुल गांधींच्या अपात्रतेच्या विरोधात त्यांच्या समर्थनार्थ काँग्रेस खासदार, नेते आणि कार्यकर्त्यांनी काल लाल किल्ल्याजवळ 'लोकशाही वाचवा मोर्चा' काढला होता. यावेळी, पोलिसांनी पक्षातील अनेक नेते व कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले होते.

'शांततापूर्ण आंदोलन रोखू शकत नाही' : काँग्रेसचे सरचिटणीस के सी वेणुगोपाल यांनी आंदोलकांना ठिकठिकाणी रोखण्यात आल्याचा आरोप केला आहे. ते म्हणाले की, देशातील लोकशाहीची स्थिती दयनीय आहे. काँग्रेस पक्ष आणि कार्यकर्ते शांततेत आंदोलन करत आहेत. या संदर्भात पोलिसांनी आंदोलनाची परवानगीही दिली होती. मात्र आज त्यांनी आंदोलन करणाऱ्या आमच्या समर्थकांना ठिकठिकाणी रोखले. अशाप्रकारे शांततापूर्ण निषेध करण्यापासून कोणालाही रोखता येऊ शकत नाही. ते म्हणाले की, लोकशाहीत आंदोलन करण्याचा प्रत्येक नागरिकाकडे हक्क आहे.

हेही वाचा : No Confidence Motion In Lok Sabha : विरोधी पक्ष लोकसभा अध्यक्षांविरुद्ध आणणार अविश्वास प्रस्ताव? काँग्रेसकडून तयारी

Last Updated : Mar 29, 2023, 2:17 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.