ETV Bharat / bharat

आंध्र प्रदेशमध्ये कथित आयुर्वेदिक औषधासाठी तुफान गर्दी; गावात प्रतिबंध लागू - आंध्र प्रदेश कोरोना अपडेट

कोरोनापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी लोक आता वेगवेगळ्या उपायांचा अवलंब करत आहेत. आंध्र प्रदेशातल्या नेल्लूरमध्ये कोरोना लस घेण्यासाठी जशा रांगा लागतात. तशा रांगा कोरोनाच्या एका कथित आयुर्वेदिक औषधासाठी लागत आहेत. गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी कृष्णपट्टणम येथे कलम 144 लागू करण्यात आला आहे.

आंध्र प्रदेश
आंध्र प्रदेश
author img

By

Published : May 26, 2021, 6:58 PM IST

हैदराबाद - देशात कोरोनाने अक्षरशः कहर केला आहे. दिवसेंदिवस रेकॉर्ड तोडणारी कोरोना रुग्ण संख्या समोर येत आहे. कोरोनामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी लोक आता वेगवेगळ्या उपायांचा अवलंब करत आहेत. आंध्र प्रदेशातल्या नेल्लूरमध्ये कोरोना लस घेण्यासाठी जशा रांगा लागतात. तशा रांगा कोरोनाच्या एका कथित आयुर्वेदिक औषधासाठी लागत आहेत. गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी कृष्णपट्टणम येथे कलम 144 लागू करण्यात आला आहे.

परवानगीशिवाय गावात कोणी प्रवेश केल्यास कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलीस उपअधीक्षक हरिनाथ रेड्डी यांनी दिला.

नेल्लोरच्या कृष्णपट्टणम गावातील बोगिनी आनंदय्या यांनी कोरोना उपचारासाठी आयुर्वेदिक औषध तयार केले आहे. हे औषध घेण्यासाठी दूरवरून लोक या गावी येत आहेत. हे औषध कोरोनापासून मुक्त करते, असा दावा आनंदय्या यांनी केला आहे. त्यांचा हा दावा सोशल मीडियावर व्हायरल झाला असून औषधांसाठी इतर राज्यातून लोक कृष्णपट्टणम गाव गाठत आहेत. मात्र, ही गर्दी कोरोनाच्या विस्फोटाला आमंत्रण ठरतीयं.

कथित आयुर्वेदिक औषधासाठी लोक कोरोना नियमांचे उल्लघंन करून गावात गर्दी करत असल्याची माहिती मिळताच मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांनी या प्रकरणाची दखल घेतली होती. त्यांनी औषधाची सत्यता तपासण्यासाठी आयसीएमआर सदस्यांची विशेष टीम पाठवली होती. या टीमने आनंदय्या यांच्याकडे औषधासंदर्भात चौकशी केली आणि तसेच हे औषध कोणत्या गोष्टीपासून तयार करण्यात आले, याची तपासणी केली. आयसीएमआर आणि आयुष यांना आयुर्वेदिक औषधाचा अहवाल लवकरच सादर करणार आहेत.

संशोधकांनी आयुर्वेदिक औषधाची प्रभावीता तपासण्यास सुरुवात केली आहे. सीसीआरएएसने ही जबाबदारी विजयवाड्यातील प्रादेशिक आयुर्वेद संशोधन केंद्र आणि तिरुपतीमधील एसव्ही आयुर्वेद रुग्णालयाकडे सोपविली आहे. या औषधाच्या संशोधनाअंती हाती काय येतं, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.