ETV Bharat / bharat

NewsToday : आज या घडामोडींवर असणार खास नजर

या घडामोडींवर असणार खास नजर

newstoday 12 july 2021 etv bharat
आज या घडामोडींवर असणार खास नजर
author img

By

Published : Jul 12, 2021, 6:24 AM IST

  • आज भगवान जगन्नाथ रथयात्रा निघणार

आज ओडिशातील जगन्नाथ पुरी येथे भगवान जगन्नाथ रथयात्रा निघणार आहे. कोरोनाच्या नियमावलींचे पालन करत ही रथयात्रा निघणार आहे. 20 जुलैला ही रथयात्रा संपन्न होणार आहे.

  • गोव्यातील लॉकडाऊनचा आज शेवटचा दिवस

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे गोव्यात 12 जुलै 2021 पर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आले होते. आज या लॉकडाऊनचा शेवटचा दिवस आहे. राज्यातील परिस्थिती पाहता राज्य सरकार आता लॉकडाऊनबाबत काय निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

  • इग्नुच्या जून TEE 2021 परीक्षा अर्ज करण्याचा शेवटचा दिवस

इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाच्या (IGNOU) जून TEE 2021 (Term End Examination) परीक्षेसाठी अर्ज करण्याचा आज शेवटचा दिवस आहे. विद्यापीठाच्या वेबसाईटवर जाऊन हा अर्ज परिक्षार्थींना करता येणार आहे.

  • तामिळनाडूमधील लॉकडाऊनचा आज शेवटचा दिवस

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे तामिळनाडूमध्ये 12 जुलै 2021पर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आले होते. आज या लॉकडाऊनचा शेवटचा दिवस आहे. राज्यातील परिस्थिती पाहता राज्य सरकार आता लॉकडाऊनबाबत काय निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

  • तामिळनाडूत आजपासून स्फुटनिक लसीकरण मोहीम

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तामिळनाडूत आजपासून स्फुटनिक लसीकरण मोहीम आजपासून सुरू होणार आहे. कोईम्बतुरच्या एजीएस हेल्थ केअर लसीकरण केंद्रावर हे लसीकरण होणार आहे. एजीएस हेल्थ केअरला लसीकरण केंद्र म्हणून तामिळनाडू सरकारकडून मान्यता मिळाली आहे. कोविन पोर्टलवर जाऊन लसीरकरणासाठी नोंदणी करता येणार आहे.

  • आंबेडकर विद्यापीठातील प्रवेशासाठी आजपासून अर्ज करता येणार

दिल्लीतील आंबेडकर विद्यापीठातील पदवी प्रवेश प्रक्रियेला आजपासून सुरुवात होत आहे. विद्यापीठातील पदवी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना आजपासून ऑनलाइन अर्ज करता येईल. विद्यार्थ्यांची निवड ही मेरिटच्या आधारावर होणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.