ETV Bharat / bharat

Corona Update : कोरोना नवीन व्हेरिएंटच्या पार्श्वभूमीवर अनेक राज्यांत आढावा बैठकांचे सत्र सुरू

author img

By

Published : Dec 22, 2022, 4:19 PM IST

चीनमुळे जगातील अनेक देशांमध्ये कोरोनाने कहर केला ( new corona variant cases in world ) आहे. जगभरात 1300 हून अधिक मृत्यू झाले ( worldwide 1300 Corona deaths ) आहेत. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदीही या मुद्द्यावर बैठक घेणार ( PM Narendra Modi meeting on Corona ) आहेत.

new corona variant
नवीन कोरोना व्हेरिएंट

नवी दिल्ली : जगभरात कोरोनाचा कहर पुन्हा एकदा पहायला मिळत आहे. गेल्या 24 तासांत जगभरात 1300 हून अधिक मृत्यू झाले ( worldwide 1300 Corona deaths ) आहेत. दरम्यान, कोरोनाची भीती लक्षात घेता देशातील सर्व राज्यांमध्ये आढावा बैठका घेण्यात येत आहेत. आज पंतप्रधान नरेंद्र मोदीही या मुद्द्यावर बैठक घेणार ( PM Narendra Modi meeting on Corona ) आहेत.

अरविंद केजरीवालांची बैठक : अनेक देशांमध्ये कोविडच्या रुग्णांमध्ये अचानक वाढ होत असताना दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज तातडीची बैठक ( Arvind Kejriwal Meeting On Corona ) बोलावली. दिल्ली सरकार कोविड -19 च्या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे आणि मुख्यमंत्र्यांनी आरोग्य विभागाला त्याबाबतचे निर्देश दिले ( new corona variant cases world ) आहेत. कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी आवश्यक इतर पावले उचलण्याचे निर्देश दिले आहेत. एका अधिकाऱ्याने बुधवारी सांगितले की, दिल्ली सरकार सतर्क आहे. मुख्यमंत्री केजरीवाल यांनी उद्या कोरोना व्हायरसबाबत तातडीची बैठक बोलावली आहे.

उत्तराखंडमध्ये लवकरच कोविड एसओपी जारी होणार : उत्तराखंडमध्ये आरोग्य विभागाच्या आढावा बैठकीत आरोग्य मंत्री धनसिंग रावत म्हणाले की, चीनमध्ये कोरोनाची वाढती प्रकरणे पाहता चिंता पुन्हा वाढली ( Uttarakhand health department Review meeting ) आहे. उत्तराखंडमध्येही मार्गदर्शक तत्त्वे ठरवली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. उत्तराखंडमध्ये कोरोनासारखी कोणतीही समस्या नाही, परंतु सावधगिरीचा SOP जारी करून तो प्रभावी केला जाईल. बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आरोग्य विभागाच्या आढावा बैठकीत आरोग्यमंत्री डॉ.धनसिंग रावत म्हणाले.

ओमायक्रोन बीएफ सेवन आढळला ओडिशामध्ये : 30 सप्टेंबर रोजी ओडिशामध्ये Omicron BF.7 कोवीड सब-व्हेरियंटचे प्रकरण आढळून आले. संक्रमित महिलेच्या नमुन्याची चाचणी सकारात्मक आली ती आता अमेरिकेत आहे. राज्याच्या आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी ही माहिती दिली. अधिकाऱ्यांनी सांगितले की, खोरधा जिल्ह्यातील एका महिलेची आरटी-पीसीआर चाचणी तिच्या मागणीवरून करण्यात आली होती. ओडिशा सरकारने सर्व जिल्हाधिकारी, जिल्हा मुख्य वैद्यकीय अधिकारी आणि आरोग्य संस्थांच्या प्रमुखांना चीन, जपान, अमेरिका, दक्षिणेतील वाढत्या कोविड प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर कोविड-19 व्यवस्थापनासाठी पाळत ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.

कोविडचा सामना करताना शिकलेल्या धड्यांचा वापर : केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी बुधवारी सर्व लोकांना सतर्क राहण्याचा सल्ला दिला. अनेक देशांमध्ये कोविड प्रकरणांच्या पुनरुत्थानाच्या अहवालाच्या पार्श्वभूमीवर याला सामोरे जाण्यासाठी शिकलेल्या धड्यांचा पुनरुच्चार केला. केंद्र सरकारने काही देशांमध्ये विषाणूचा प्रादुर्भाव झाल्याचे निदर्शनास आणून दिले आहे. भूतकाळात कोविडशी सामना करताना आपण शिकलेले धडे आता पुन्हा वापरात आणले पाहिजेत. विजयन म्हणाले की केरळमध्ये सध्या कोणतीही नवीन प्रकरणे आढळून आलेली नाहीत ही दिलासादायक बाब आहे. परंतू सर्दी आणि खोकल्यासारखी लक्षणे आढळल्यास सर्व खबरदारी घेतली जाईल याची काळजी घेतली पाहिजे.

उत्तर प्रदेशमध्ये कोरोना प्रोटोकॉलसह नाइट शेल्टर्स : चीनमध्ये कोरोनाचा धोका वाढत असल्याच्या बातम्यांमुळे उत्तर प्रदेशचे योगी सरकारही सतर्क झाले ( Night Shelters with Corona Protocol in UP ) आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावतीने कोरोना मार्गदर्शक तत्त्वांनुसार रात्र निवारागृहे चालविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. विशेषत:निराधार लोकांचे कोरोनापासून आणि थंडीच्या लाटेपासून संरक्षण करण्यासाठी. नाईट शेल्टरमध्ये स्वच्छतेसह कोरोना प्रोटोकॉलचे पालन करावे, असे जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.