ETV Bharat / bharat

अफगाणिस्तानबाबत काय होती पंडीत नेहरुंची भूमिका, वाचा...

author img

By

Published : Aug 22, 2021, 5:51 PM IST

देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी 14 सप्टेंबर 1959 रोजी अफगाणिस्तानमध्ये भाषण दिले होते. यावेळी ते म्हणाले होते की, 'भारत अफगाणिस्तानवर दबाव आणतो. तसेच भारताने अफगाणिस्तानसोबत गुप्त करार केला आहे, असा आरोप पाकिस्तानतर्फे करण्यात येतो. मात्र, वास्तविकता वेगळी आहे. आम्ही या भेटीद्वारे अफगाणिस्तान आणि भारताची जुनी मैत्री अजून पक्की केली आहे. भारताचे आणि अफगाणिस्तानचे हजारो वर्ष जुने संबंध आहेत.'

india afghanistan wait and watch
india afghanistan wait and watch

हैदराबाद - अफगाणिस्तानतील परिस्थितीवर भारताची भूमिका काय आहे, हे अद्यापही भारत सरकारने स्पष्ट केलेले नाही. यासंदर्भात विरोधीपक्षाद्वारेदेखील सरकारला प्रश्न विचारण्यात येत आहे. तसेच भारत सरकार याबाबत भूमिका स्पष्ट का करत नाही, अशा प्रश्न अनेकांना पडला आहे. मात्र, देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी अफगाणिस्तानबाबत कोणते धोरण स्वीकारले होते? जाणून घेऊया.

नेहरूंनी 14 सप्टेंबर 1959 रोजी काबूलमध्ये भाषण दिले होते. त्यांचे ते भाषण वाचल्यावर नेहरुंचे अफगाणिस्तानबाबत काय धोरण होते. याचा अंदाज येतो. यावेळी ते म्हणाले होते की, 'भारत अफगाणिस्तानवर दबाव आणतो. तसेच भारताने अफगाणिस्तानसोबत गुप्त करार केला आहे, असा आरोप पाकिस्तानतर्फे करण्यात येतो. मात्र, वास्तविकता वेगळी आहे. आम्ही या भेटीद्वारे अफगाणिस्तान आणि भारताची जुनी मैत्री अजून पक्की केली आहे. भारताचे आणि अफगाणिस्तानचे हजारो वर्ष जुने संबंध आहेत.'

काय म्हणाले होते नेहरू -

'मला असे वाटते की, मी परदेशात नसून आपल्या जवळच्या लोकांमध्ये आहे. आता हजारो वर्षांपासून असलेले आपले संबंध विस्तारण्याची गरज आहे. यादरम्यान आपल्या संबंधांमध्ये संघर्षही बघायला मिळाला आहे. मात्र, राजकीय संबंधांपेक्षा संस्कृतीचे एकत्रीकरण महत्त्वाचे आहे. दीर्घ काळापासून चालत आलेला वारसा आम्हाला प्रेरणा देतो. मात्र, असे असले तरी दोन देशातील संबंध अधिक जवळ येण्यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागतील. गेल्या 13 वर्षात आम्हाला अनेक देशांशी संबंध विकसीत करण्याचे स्वातंत्र मिळाले आहे. यावेळी आम्ही प्रामुख्याने अफगाणिस्तानचा विचार केला. भारताचा आणि अफगाणिस्तानचा दृष्टीकोन सारखा आहे, हे कालांतराने कळले. स्वातंत्र्यानंतर भारतीयांना स्वातंत्र्याची जाणीव करून देणं आणि त्यांचा जीवनमान उंचावणं, हे आमच्यापुढे सर्वात मोठे आव्हान होते. हेच आव्हान अफगाणिस्तानपुढेही होते. त्यासोबतच आशिया आणि आफ्रिकेतील अनेक देशांपुढेही अशा प्रकारची आव्हाने होती. प्रत्येक देशाने आपआपल्या परीने हे आव्हान पेलण्याचा प्रयत्न केला. आंतरराष्ट्रीय प्रकरणात आम्ही अलिप्त राहण्याचा निर्णय घेतला. मला वाटते की, अफगाणिस्तानेही याच नितीचा स्विकार करावा, हाच एक अतिरीक्त फॅक्टर आहे. जो दोन देशांना जवळ आणतो. आम्ही अफगाणिस्तानशी मैत्रीचा दृष्टीकोन ठेवतो. तसेच भविष्यातील चांगल्या संबंधासाठी आम्ही कटीबद्ध आहोत.'

हेही वाचा - 'मी नाराज हा शोध नारायण राणेंनी कुठून लावला माहित नाही; ते महाविकास आघाडीत संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करताहेत'

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.