हैदराबाद : दरवर्षी ४ मार्च हा दिवस आपल्या देशात 'राष्ट्रीय सुरक्षा दिन' म्हणून साजरा केला जातो. हा दिवस साजरा करण्यामागचे मुख्य कारण म्हणजे देशाच्या अंतर्गत आणि बाह्य सुरक्षेबाबत लोकांना जागरूक करणे, हे होय. जेणेकरून भविष्यात देशाच्या सुरक्षेबाबत नागरिक सदैव जागरूक राहील. ४ मार्च हा दिवस सध्या 'राष्ट्रीय सुरक्षा सप्ता' म्हणून साजरा केला जातो. या दिवसाच्या निमित्ताने लोकांना केवळ देशाच्या शत्रूंपासूनच नव्हे, तर रोगांपासूनही सुरक्षित राहण्यासाठी जागरूक केले जाते. यावर्षी ४ मार्च रोजी शनिवार हा दिवस येतो आहे.
राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह : भारतात दरवर्षी ४ मार्च रोजी, 'राष्ट्रीय सुरक्षा दिवस' साजरा केला जातो. हा दिवस साजरा करण्यामागचा मुख्य उद्देश म्हणजे आपल्या आयुष्यातील वेगवेगळ्या वेळी जागरूकता किंवा लक्ष नसल्यामुळे होणारे अपघात रोखणे. पूर्वी साजरा केला जाणारा राष्ट्रीय सुरक्षा दिवस आता, 'राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह' म्हणून साजरा केला जात आहे.
नॅशनल सेफ्टी कौन्सिल : हा दिवस अस्तित्वात आणण्यासाठी नॅशनल सेफ्टी कौन्सिलनेच पुढाकार घेतला होता. राष्ट्रीय सुरक्षा परिषद भारतात 04 मार्च 1966 रोजी स्थापन करण्यात आली, म्हणून हा दिवस 'राष्ट्रीय सुरक्षा दिन' म्हणून साजरा केला जातो. 'नॅशनल सेफ्टी कौन्सिल' ही एक स्वायत्त संस्था आहे, जी निस्वार्थ भावनेने कार्य करते.
'नॅशनल सेफ्टी कौन्सिल' या संस्थेची स्थापना १९६६ साली मुंबई सोसायटी कायद्यांतर्गत करण्यात आली, ज्यामध्ये ८ हजार सदस्य होते. यानंतर 1972 मध्ये या संस्थेने 'राष्ट्रीय सुरक्षा दिन' साजरा करण्याचा निर्णय घेतला. आणि त्यानंतर लगेचच तो राष्ट्रीय सुरक्षा दिना ऐवजी 'राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह' म्हणून साजरा करण्यात आला.
सुरक्षा हा मुद्दा महत्वाचा : हा दिवस पहिल्यांदा 4 मार्च 1966 रोजी साजरा करण्यात आला, ज्यामध्ये 8 हजार सदस्यांनी सहभाग घेतला होता, त्यावेळी देशातील जनतेला सुरक्षेसाठी जागृत करण्याच्या उद्देशाने हा दिवस आणण्यात आला होता, ज्यामध्ये त्यांना प्रत्येकाचे संरक्षण कसे करावे? हे माहित असले पाहिजे. देश आणि समाजातील इतर लोकांच्या सुरक्षेचे भान ठेवून काम केले पाहिजे, त्या दिशेने प्रवृत्त केले.
राष्ट्रीय सुरक्षा दिवस का साजरा केला जातो? : राष्ट्रीय सुरक्षा दिनादरम्यान, औद्योगिक अपघात टाळण्यासाठी लोकांना जागरूक करण्यासाठी अनेक प्रकारचे कार्यक्रम आयोजित केले जातात. राष्ट्रीय सुरक्षा दिन विशेषत: देशाच्या सुरक्षेसाठी सीमेवर तैनात असलेल्या हजारो सैनिकांना समर्पित आहे.
हेही वाचा : International Mother Language Day 2023: मातृभाषेतूनच आपली होते खरी ओळख, तिचा करा सन्मान