पाटना- बिहारमधील मुझफ्फरपूर जिल्ह्यातील काझी मोहम्मदपूर पोलीस स्टेशन परिसरात सीएची तयारी करणाऱ्या अंजली या विद्यार्थिनीने गुरुवारी रात्री ( Student Commits Suicide In Jaipur ) आत्महत्या केली. या घटनेची माहिती मिळताच तिच्या प्रियकरानेही आत्महत्या केली आहे. अंजलीचा प्रियकर विवेक याने जयपूरमध्ये आठव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या ( Student Commits Suicide In Muzaffarpur ) केली आहे. दोघांच्या आत्महत्येवरून दोन्ही कुटुंबात वाद सुरू झाला आहे.
सीएची विद्यार्थिनी अंजलीने ( Muzaffarpur girl Anjali suicide ) आत्महत्या केल्यानंतर पोलिसांचा तपास सुरू आहे. अशातच तिच्या प्रियकरानेही आत्महत्या केली आहे. याबाबत विवेकच्या कुटुंबीयांचा आरोप आहे की, मुलीच्या (अंजलीच्या) भावाच्या धमकीला घाबरून विवेकने आत्महत्या ( Boyfriend Vivek Commits Suicide In Jaipur ) केली आहे.
शेवटच्या फोन कॉलचे गूढ उलगडले!
विवेकचा भाऊ राहुलने सांगितले की, आज सकाळीच अंजलीच्या भावाने विवेकला फोन करून तिने आत्महत्या केल्याची माहिती दिली होती. अंजलीच्या आत्महत्येबाबत फोनवर बोलत असतानाच विवेकने जयपूरमधील इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली. याबाबतची माहिती तेथील पोलिसांनी कुटुंबीयांना दिली. विवेकचे शेवटचे कॉल डिटेल्स काढले असता त्यात ही माहिती मिळाली आहे. राहुलचे म्हणणे आहे की, अंजलीच्या भावाने विवेकला असावे. यामुळे विवेकने इमारतीवरून उडी मारली.
हेही वाचा-Food Delivery Controversy : 10 मिनिट फूड डिलिव्हरी झोमॅटो च्या घोषणेवर वाद
विवेक-अंजलीमध्ये रात्री फोनवर वाद
बुधवारी रात्री अंजली आणि विवेकचे बोलणे झाले. संवादादरम्यान, मुझफ्फरपूरमधील दोघांची मैत्रिण असलेली एक मुलगीही कॉन्फरन्स कॉलमध्ये सामील होती. घटनेनंतर त्यांनी राहुलला फोन करून माहिती दिली. कॉन्फरन्स कॉलमध्ये सहभागी झालेल्या मुलीने सांगितले की, कॉल दरम्यान विवेक-अंजली यांच्यात भांडण झाले. परंतु विवेकने कॉल डिस्कनेक्ट केला. कॉल डिस्कनेक्ट केल्यानंतर विवेकने मोबाईल बंद केला. काही वेळाने अंजलीने आत्महत्या केली.
हेही वाचा-Petrol Prices Hiked : चार दिवसांत पेट्रोल-डिझेलच्या दरात 2.40 रुपयांनी वाढ
विवेक आणि अंजलीचे आठव्या वर्गापासून होते अफेअर
विवेकचा भाऊ राहुलने सांगितले की, भावाचे अफेअर अंजलीसोबत 8 व्या वर्गातच होते. त्यांनी एकत्रितपणे ओरिएंट क्लबमधील शाळेत शिक्षण घेतले. विवेक चार वर्षांपूर्वी जयपूरला इंजिनीअरिंग करण्यासाठी गेला होता. एप्रिलमध्ये तो घरी येणार होता. विवकचे काका संजय साह यांनी सांगितले की, त्यांना दोघांच्या अफेअरची माहिती होती.
कोण आहे अंजली?
अंजली ही सीएची तयारी करणाऱ्या विद्यार्थिनी होती. सकाळी उशिरापर्यंत खोली बंद असल्याचे पाहून कुटुंबीयांनी पोलिसांना माहिती दिली. कुटुंबीयांच्या माहितीच्या आधारे काझी मोहम्मदपूर पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक शशी कुमार भगत घटनास्थळी पोहोचले. खोलीचा दरवाजा तोडून पोलिसांनी घरात प्रवेश केला. विद्यार्थिनीचा मृतदेह खाली उतरवून शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविला. काझी मोहम्मदपूर पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे