चमोली (उत्तराखंड): प्रवाशांनी भरलेली टाटा सुमो जोशीमठ ब्लॉकच्या मूळ-पल्ला जाखोला मोटारवेवर अनियंत्रित होऊन रस्त्यापासून सुमारे 700 मीटर खोल दरीत Tata Sumo fell into ditch in chamoli कोसळली. या गाडीत 12 जण प्रवास करत असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याचवेळी अपघाताची माहिती मिळताच एसडीआरएफ आणि जोशीमठ पोलिसांचे पथक घटनास्थळी रवाना झाले आहे. Road accident in chamoli
मिळालेल्या माहितीनुसार, वाहनातील सुमारे दहा जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र, त्याची पुष्टी होणे बाकी आहे. अपघाताची माहिती मिळताच डीएम चमोली आणि एसएसपीही घटनास्थळी रवाना झाले आहेत. दरी खोल असल्याने बचाव कार्यात काही अडचणी येत आहेत. दोन्ही जखमींना उपचारासाठी उरगाव प्राथमिक केंद्रात आणण्यात आले आहे.
-
UPDATE | Chamoli, Uttarakhand: Dead bodies of 2 women & 10 men travelling in vehicle have been recovered by the team: SDRF
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) November 18, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">UPDATE | Chamoli, Uttarakhand: Dead bodies of 2 women & 10 men travelling in vehicle have been recovered by the team: SDRF
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) November 18, 2022UPDATE | Chamoli, Uttarakhand: Dead bodies of 2 women & 10 men travelling in vehicle have been recovered by the team: SDRF
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) November 18, 2022
त्याचवेळी दरी खोल आणि अंधारामुळे पोलीस पथकाला बचाव कार्यात काही अडचणी येत आहेत. पण बचाव पथकाने आतापर्यंत दोन महिला आणि 10 पुरुषांचे मृतदेह बाहेर काढले आहेत. उत्तराखंड SDRF ने आपल्या ट्विटर हँडलवर याची पुष्टी केली आहे. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी या अपघाताची दंडाधिकारी चौकशी करून मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी दोन लाख रुपयांची मदत देण्याच्या सूचना दिल्या. यासोबतच अपघातातील जखमींवर मोफत उपचार करण्यात यावेत, असेही सांगण्यात आले आहे. घटनास्थळी अजूनही बचावकार्य सुरू आहे. घटनास्थळी जिल्हा दंडाधिकारी हिमांशू खुराना, पोलीस अधीक्षक प्रमेंद्र डोबल यांच्यासह एसडीआरएफ, एनडीआरएफ, पोलीस आणि प्रशासनाचे पथक बचावकार्यात गुंतले आहे.